तलाठी सहाय्यक
कोतवाल मराठी माहिती | Talati Helper
Kotwal Marathi Information
1)प्रस्तावना
तलाठी सहाय्यक कोतवाल हा ग्राम विभागात काम पाहत असल्यामुळे कोतवालास " ग्राम नोकर " ह्या नावाने सुद्धा ओळखल्या जातो. कोतवाल पदाच्या नावामध्ये आता महाराष्ट्र राज्य सरकारच्या दिनांक 05/03/ 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार त्याच्या नावात बदल करण्यात आलेला आहेत. कोतवाल पदास "तलाठी सहाय्यक "हे नवीन नाव देण्यात आले आहे. कोतवाल म्हणजे तलाठी सहाय्यक यांच्या कार्याला सहाय्य करण्याची काम त्यामुळे त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
![]() |
Talati Helper Kotwal Marathi Information |
2) तलाठी सहाय्यक कोतवाल मराठी माहिती Talati Helper Kotwal Marathi Information
अ)नेमणूक पद्धत.
ग्राम पातळीवर ग्राम नोकर म्हणून तलाठी सहाय्यक कोतवाल या पदाची नियुक्ती प्रशासन विभागातील प्रमुख तहसीलदार यांच्यामार्फत नियुक्ती केली जाते. तलाठी सहाय्यक कोतवाल पदाच्या नियुक्तीसाठी होण्यासाठी संबंधित व्यक्तीला रुपये 100 तारण म्हणून ठेवावे लागतात. त्याचबरोबर त्याला दोन व्यक्तीचे जामीनदार म्हणून द्यावे लागतात. कोतवालाची नेमणूक करताना त्या गावातील अधिकार कक्षा अंतर्गत पोलीस स्टेशन मधील पोलीस सब इन्स्पेक्टर ची परवानगी घ्यावी लागते. त्याची पहिली नियुक्ती ही अस्थाई असते. सुरुवातीला अस्थाई म्हणून नियुक्ती पहिल्या सहा महिन्यासाठी करण्यात येते. त्यानंतर सहा महिने परिविक्षा कालखंड संपल्यानंतर त्यांनी केलेल्या कामगिरीची गुणवत्ता तपासून त्याला कायमस्वरूपी त्या गावचा कोतवाल “Talati Helper Kotwal Marathi Information “म्हणून नियुक्ती करतात.
ब)
तलाठी सहाय्यक कोतवाल पदाची संख्या
तलाठी सहाय्यककोतवाल
पदाची संख्या ही सर्वसामान्यपणे गावातील
लोकसंख्येवर आधारित असते. म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणात कोतवाल पदाची नेमणूक केली जाते.
क)गावाच्या लोकसंख्येनुसार कोतवालाची संख्या
गावाची लोकसंख्या 0001 ते 1000 पर्यंत असेल तर एक तलाठी सहाय्यक कोतवाल नियुक्त केला जातो. गावाची लोकसंख्या 1001 ते 3000 पर्यंत असेल तर 02 कोतवाल नियुक्त केले जातात. गावाची लोकसंख्या तीन हजारावरून जास्त असेल तर कोतवाल नियुक्त केले जातात. एखाद्या गावामध्ये जास्त कोतवाल गावच्या लोकसंख्येच्या आधारावर नियुक्त करण्याचा अधिकार हा अतिशय महत्त्वपूर्ण असून त्या गावात जास्त तलाठी सहाय्यककोतवाल नियुक्त करायची असल्यास जिल्हाधिकाऱ्यास शासनाची परवानगी घेऊनच जिल्हाधिकारी मार्फत शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी दोन किंवा त्यापेक्षा जास्त तलाठी सहाय्यक कोतवाल नियुक्त करतो. ही नियुक्ती शासन मान्यतेनंतर जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याचा प्रतिनिधी म्हणून तहसीलदार मार्फत नियुक्ती Talati Helper Kotwal Marathi Information करण्यात येते.
3) तलाठी सहाय्यक कोतवाल पद पात्रता Talati Helper Kotwal Marathi Information
आ)
त्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असून 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
इ)
शारीरिक दृष्ट्या फिजिकल फिटनेस म्हणून सक्षम असावा.
ई)
त्या गावातील त्याची वागणूक म्हणजेच वर्तन आणि चारित्र्य हे
चांगले असावे लागते. त्या विरुद्ध कोणतेही
प्रकरण न्याय प्रविष्ट नसावे. किंवा वादांकित नसावे.
उ)
कमीत कमी इयत्ता चौथी
उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
ए)
नियुक्ती करतेवेळी शंभर रुपयाची तारण
द्यावे लागते.
ऐ)
नियुक्तीसाठी दोन जामीनदार सुद्धा
द्यावे लागतात.
ओ)
तलाठी सहाय्यक कोतवाल पदावर नेमणूक होण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे कुळ कायद्यानुसार नमूद
केलेल्या शासन निर्णयापेक्षा अधिक
जमीन मालक नसावा. म्हणजेच
कुळ कायद्याने मालक धारक म्हणून
त्याने जमीन धारण केलेली
नसावी.
4) तलाठी सहाय्यक कोतवाल पद रजा Talati Helper Kotwal Marathi Information
5) तलाठी
सहाय्यक कोतवाल पदास वेतन व
भत्ते Talati Helper Kotwal Marathi Information
तलाठी सहाय्यक कोतवाला अगदी पूर्वीच्यकाळी दरमहा वेतन पाच हजार रुपये एवढे देण्यात येत होते. या वेतनात सुधारणा 08 जानेवारी 2019 रोजी शासनाने वेतन वाढ करून 7500 रुपये एवढे वेतन मंजूर करून देण्यात येत होते. या वेतना त सुधारणा होऊन आता दिनांक 01 एप्रिल 2023 पासून तलाठी सहाय्यक कोतवालाचे दरमहा वेतन वाढ करण्यात आली असून आता दरमहा तलाठी सहाय्यक कोतवालास 15000 हजार इतके वेतन देण्यात येत आहे.
6) तलाठी सहाय्यक कोतवाल पद कार्यकाल Talati Helper Kotwal Marathi Information
6)कोतवाल
किंवा तलाठी सहाय्यक यांचे कार्य Talati Helper
Kotwal Marathi Information
अ) अधिकार कक्षेतील गावाचे दप्तर वरिष्ठ कार्यालयात ने- आण करणे.
आ)
गावातील जन्ममृत्यू इत्यादी बाबत नोंदणी ची
माहिती ग्रामसेवकास देणे.
इ)
आवश्यक वेळप्रसंगी गरज भासल्यास गावकऱ्यांना
चावडी येथे बोलवण्याचे कार्य
करणे.
ई)
शासनाचे किंवा सरकारचे निर्णय आणि आदेश गावात
दवंडी देऊन जाहीर करणे.
दवंडीद्वारे शासन निर्णय जनतेपर्यंत
पोहोचवणे.
उ)
आपल्या अधिकार कक्षेतील गावात एखादा गुन्हा घडला असेल तर
त्या गुन्ह्याच्या संदर्भाने त्या गुन्ह्याबाबत संपूर्ण
माहिती गावातील पोलीस पाटलांना माहिती देणे.
ऊ)
पोलीस पाटलांच्या निरीक्षणाखाली असणाऱ्या कायद्यावर पहारा देण्याचे काम करणे.
ए)
गाव पातळीवर काम करत असताना
तलाठी सहाय्यक असल्यामुळे तलाठ्याच्या हाताखाली महसुलीचे काम करण्याचे कार्य
कोतवाला करावे लागते.
ऐ)
आपल्या गावा शेजारील एखादा
कोतवाल रजेवर असेल तर त्या
रजेची पर्यायी व्यवस्था स्वतः पाहणे.
ओ)
गावातील सभेचे ठिकाण म्हणजे चावडी व सज्जा या
कार्यालयाची दैनंदिन स्वच्छता ठेवणे.
औ)
गावातील तलाठ्यांच्या कार्यालयाची स्वच्छता ठेवून दिवसभर त्या कार्यालयात थांबणे.
क)
ग्रामसेवकाने सांगितलेले कार्य करणे.
ख)
पोलीस पाटलाने सांगितलेले कार्य करणे.
ग)
पोलीस स्टेशन कडून आलेल्या कार्याची
अंमलबजावणी करणे किंवा पोलीस
स्टेशन ने सांगितलेली त्या
गावातील कामे करणे.
घ)
आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कामाची अंमलबजावणी करणे.
च)
जनगणनेच्या वेळेस जनगणना अधिकाऱ्यास मदत करणे.
ज)
निवडणुकीच्या काळात मतदान केंद्रावर मतदान अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी
यांनी दिलेल्या प्रमाणे काम करणे.
छ)
सरकारी कार्यालयाकडून आलेल्या पत्रव्यवहाराबाबत संबंधित पत्र व्यवहार संबंधित
अधिकाऱ्याकडे पोहोचवणे.
झ)
शासन व गावकरी यामधील
महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम
करणे.
सारांश
तलाठी सहाय्यक कोतवाल हे पद गावातील महत्त्वपूर्ण पद आहे. गावात घडणाऱ्या प्रत्येक घटना शासन दरबारी तलाठी सहाय्यक कोतवाल पदा स पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे शासनाने प्रत्येक गावात तहसीलदारामार्फत तलाठी सहाय्यक कोतवाल पदाची नियुक्ती करून गावात घडणाऱ्या हालचाली या पदामार्फत दैनिक प्राप्त केलेल्या आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अंदाजे 13 पेक्षा जास्त तलाठी सहाय्यक कोतवाल प्रत्येक गावात पगारी स्वरूपात कार्यरत आहेत. महसूल यंत्रणेतील गाव पातळीवरील अतिशय खालच्या स्तरांमध्ये लोकसंख्येच्या आधारावर या पदाची नेमणूक करण्यात आली आहेत.उपरोक्त लेखात या पदाबाबत संपूर्ण माहिती या ब्लॉग पोस्ट लेखांमधून स्पष्ट करण्यात आली असून जर आपणास याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा काही त्रुटी आढळल्यास ब्लॉगर सी संपर्क कॉमेंट बॉक्स मधून सूचना देणे. आपण दिलेली सूचना योग्य असल्यास आपल्या सूचनेप्रमाणे आवश्यक ती त्रुटी तुरंत दुरुस्त करण्यात येईल. मित्रांनो आपणास हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांनाही सुद्धा तसेच वाचक मित्रांना आवश्यक शेअर करा.
FAQ
1) तलाठी
सहाय्यक कोतवाल यांना सध्या प्रतिमा किती पगार देण्यात
येतो?
15000 रुपये
2) तलाठी
सहाय्यक कोतवाल यांची नियुक्ती कोण करतो?
तहसीलदार
किंवा तालुका दंडाधिकारी
3) एका
पेक्षा जास्त तलाठी सहाय्यक कोतवाल नेमणूक पद्धत सांगा?
शासनाच्या
परवानगीने जिल्हाधिकारी नियुक्त करतो.
4) तलाठी
सहाय्यक कोतवाल किती वर्षापर्यंत कार्यरत
असतो?
वयाच्या
साठ वर्षापर्यंत कार्यरत असतो.
5) तलाठी
सहाय्यक कोतवाल यांना एका वर्षासाठी किती
अर्जित रजा मान्य असतात?
प्रति
वर्ष 30 दिवस अर्जित रजा
मान्य असतात
अधिक
माहितीसाठी आपण आमचे खालील
लेख आवश्यक वाचा.