तलाठी पदाची मराठी माहिती | Talathi Padachi Marathi Mahiti
1) प्रस्तावना
Talathi Padachi Marathi Mahiti या संदर्भात मित्रांनो, आज आपण तलाठी पदाची मराठी माहिती Talathi Padachi Marathi Mahiti बाबत सविस्तर माहिती पाहूया. ही माहिती तलाठी भरती साठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे या याबाबत माहिती प्राप्त करणे आजच्या स्पर्धा युगात काळाची गरज ठरली आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अधिनियमात Talathi Padachi Marathi Mahitiसुस्पष्टपणे सविस्तर माहिती दिली आहेत. महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7 मधील पोटनियम 3 नुसार एक किंवा एका पेक्षा अधिक तलाठी पदाची नेमणूक प्रत्येक "सजा " करिता नेमणूक केली जाते. "सजा" म्हणजे काय? हा प्रश्न प्रत्येकाला निर्माण झाला आहे. "सजा " म्हणजे तलाठ्यांची मुख्य कार्यालय होय.तलाठी हा ग्रामीण विभागातील मुलकी प्रशासनातील गाव पातळीवरील वर्ग 3 चा कर्मचारी महसूल खात्याचा एक प्रकारचा कर्मचारी 'Talathi Padachi Marathi Mahiti ' होय.
तलाठी हे पद अतिशय प्रारंभिक काळात ब्रिटिश राजवटीत अस्तित्वात आले आहेत. सोळाव्या शतकात ब्रिटिश अधिकाऱ्याने या पदाची नेमणूक करण्यास सुरू केले. ब्रिटिश राजवटी जमिनीसंबंधीचे सर्व रेकॉर्ड तयार करण्यासाठी एक कर्मचारी म्हणून त्याची नेमणूक ब्रिटिशांनी केली. तेव्हापासून तर आज पर्यंत महाराष्ट्रात हे पदTalathi Padachi Marathi Mahiti तृतीय श्रेणीतील महसुली विभागाचे गाव पातळीवरील अस्तित्वात आलेले पद होय.
![]() |
Talathi Padachi Marathi Mahiti |
Talathi Padachi Marathi Mahiti(toc)
2) तलाठी माहिती Talathi Mahiti
Talathi Padachi Marathi Mahitiमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नुसार महसूल खात्यातील गाव पातळीवर जमिनीच्या किंवा शेतीच्या नोंदी ठेवण्यासाठी अद्यावत स्थितीत ठेवणारा एक प्रकारचा अधिकारीच आहे. महसूल विभागात हा महसूल विभागातील गावासंबंधीची व घरापासून तर शेतीपर्यंत सर्व नोंदी अद्यावत करणारा प्रमुख घटक आहे. आपल्या अधिकार कक्षेतील महसूल विभागात काम करण्याची जबाबदारी महसूल विभागांनी त्याला प्रदान केलेली आहे.
आजच्या डिजिटल युगात जमीन किंवा शेतीसंबंधी किंवा गावातील घरासंबंधीत सर्व माहिती अद्यावत स्थितीत ठेवून शेतकऱ्याचं सातबारा किंवा गाव नमुना आठ देण्याकरिता तसेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या कार्य कक्षेत येणाऱ्या गावासंबंधीची अद्यावत माहिती प्राप्त करून देण्याचे करणारा ग्राम पातळीवरील प्रमुख महसूल विभागातील अधिकारी होय. महाराष्ट्रात काही विभागात तलाठी यांना पटवारी Talathi Padachi Marathi Mahitiम्हणूनही समजले जाते. तलाठ्याने आपल्या कर्तव्याबाबत काही गैर वर्तणूक केल्यास त्याला शिक्षा देण्याचा अधिकार हा उपजिल्हाधिकारी यांना असतो जिल्हा उप अधिकारी त्याला निलंबित करू शकतो.औ गैरवर्तुणूक सिद्ध झाल्यास निलंबन होते.
3) तलाठी नेमणूक Talathi Nemnuk
तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा मुख्य अधिकार जिल्हाधिकाऱ्यास आहेत. तलाठी पदाची नेमणूक आता स्पर्धा परीक्षा घेऊन नेमणूक केली जाते. Talathi Padachi Marathi Mahitiतलाठी पदाची नेमणूक करण्यासाठी शासकीय पातळीवरून तलाठी भरती कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी म्हणजेच तलाठी भरती 2023 प्रक्रिया मार्फत तलाठी भरती गुणवत्ता यादीनुसार बिंदू नामावली जात संवर्गातून केली जाते. मार्च 2024 मध्ये तलाठी नेमणूक भरती ची पहिली यादी जाहीर करून त्यानुसार तलाठी भरती करण्यात आलेली आहे. येथे सांगण्याचा मुद्दा स्पष्ट असा आहे की, तलाठी या पदासाठी निवड परीक्षेमार्फत स्पर्धा परीक्षेतून योग्य उमेदवाराची शासकीय नियमानुसार भरती प्रक्रिया राबवून तलाठी पदास अंतिम नेमणूक जिल्हाधिकारी करत असतो. तलाठी Talathi Padachi Marathi Mahiti पदासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. स्पर्धा परीक्षेतून नियुक्ती करण्यात येते.
4)तलाठी भरती पात्रता Talathi Bharti Qualification
तलाठी पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तलाठी पदाच्या भरती पात्रतेसाठी आपणास सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरून अर्ज सादर करावा लागतो. स्पर्धा परीक्षेतून गुणवत्ता प्राप्त मर्यादित संख्येच्या आधारावर पात्रता निश्चित करून भरती प्रक्रिया राबवण्यात येते. भारताचा नागरिक असावा. त्यावर कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ठ नसावे किंवा त्याच्या विरुद्ध कोणताही गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये करू नका वा. चारित्र्य व वर्तणूक चांगली असावी. वैद्यकीय दृष्ट्या फिजिकल फिटनेस असणे आवश्यक आहे.
5)तलाठी पदाचा अभ्यासक्रम 2024The Syllabus of Talathi Bharti 2024
तलाठी या पदासाठी भरती करताना शासनाने अभ्यास क्रम निर्धारित करून दिलेला आहे. परीक्षेसाठी 200 गुणाचा पेपर सेट केलेला असतो. या" Talati Padachi Marathi Mahithi "भरतीसाठी 200 गुणांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित अभ्यासक्रम पुढे दर्शविल्याप्रमाणे शासनाने निश्चित केलेला आहेत. दोनशे गुणांच्या परीक्षेसाठी निर्धारित अभ्यासक्रम आराखडा या ब्लॉग पोस्ट मधून स्पष्टपणे आपण नमूद करत आहोत.
क)ग्राम पातळीवरील शेतीच्या नोंदी बाबत सर्व माहिती
ख)भारतीय राजकारण व त्या संदर्भात सामान्य ज्ञान अथवा विज्ञान
ग)दैनिक चालू घडामोडीसामान्य ज्ञान किंवा जनरल नॉलेज
घ)संपूर्ण भारतीय भूगोलाचे ज्ञान
च)भारतीय इतिहास आणि ऐतिहासिक संस्कृती
छ)अंकगणित
ज)बीजगणित
झ)भूमिती
ट)भाषा ज्ञान व भाषा आधारित व्याकरण
ठ)गणिताबाबत तर्क व अंदाज याबाबत विश्लेषण
ड)भारतीय राज्यघटने बाबत सर्वसामान्य कल्पना
ढ)तांत्रिक युगातील संगणकावर आधारित वेगवेगळे ॲप्स
ण)संगणक म्हणजेच कॅम्पुटर बाबत एम एस ऑफिस, एक्सेल, वर्ड, मायक्रोसोफ्ट , पावर पॉइंट प्रेझेंटेशन
त)इंग्रजी ग्रामर व इंग्रजी भाषा बाबत सामान्य ज्ञान
थ)मराठी भाषा आकलन व मराठी भाषा व्याकरण
द)जनरल नॉलेज वर आधारित चालू घडामोडी
ध)बुद्धी मापन क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी
उपरोक्त विषयावर 200 गुणांची परीक्षा घेण्यात येते.
6)तलाठी पदाचे कार्य किंवा कर्तव्य किंवा कामे The Role of Talathi
अ )महसूल खात्याचे गाव पातळीवरील दप्तर सांभाळणे
आ) शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सातबारा (7/12)अद्यावत दप्तरात नोंद घेऊन त्वरित ऑनलाइन करणे.
इ) गावातील घरांचा गाव नमुना 8अ नोंदी अद्यावत करणे.
ई) ग्राम पातळीवरील सर्व नोंदी व नोंदवहया आणि गाव पातळीवरील संपूर्ण अभिलेखे यांच्या नोंदी पूर्ण करणे.
उ) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार ग्राम पातळीवरील महसुलीबाबत सर्व सविस्तर कामांची जबाबदारी युक्त कार्य पार पाडणे.
ऊ) गाव पातळीवरील प्राथमिक कर्तव्य म्हणून कुटुंब नियोजन शासकीय कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी पार पाडणे.
ए) ग्रामीण पातळीवरील महसूल कर, तगाई वसुली आणि दुष्काळ इत्यादी कार्याच्या संबंधित जबाबदारी पार पाडणे.
ऐ) आपल्या अधिकार कक्षेतील ग्राम पातळीवर जमीन महसूल कर थकीतदारांची यादी तयार करून अद्यावत नोंदी घेणे.
ओ) जमिनीच्या अधिकार पत्राच्या नोंदी अद्यावत ठेवणे.
औ) ग्राम पातळीवरील पीक पाण्याच्या नोंदी अद्यावत स्वरूपात ठेवणे.
क) गावातील महसूल जमा करणे
ख) शेत जमिनीचा आकार ठरवणे
ग) गावातील जमीन धारकांच्या नोंदी फेरफार करणे.
घ) पिकाची आणेवारी काढणे.
च) शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड यांचे आपल्या अधिकार कक्षेतील ग्राम पातळीवरील प्रत्येक कुटुंबाचे रेशन कार्ड वितरण करण्याचे काम करणे.
छ) निवडणुकीच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी सोपवलेली निवडणूक विषयी संपूर्ण कामे जबाबदारीने पार पाडणे.
ज) जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार त्यांनी सांगितलेले कर्तव्य पार पाडणे.
झ) पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे गावातील मरणोत्तर व्यक्तीची प्रतिवृत, फौजदारी प्रकरणातील जमाने व तपासणी इत्यादी कामासी तलाठी संबंधित असणारी बाब पूर्ण करणे.
ट) गाव पातळीवरील तलाठी च्या दप्तरात महसुली खात्याशी संबंधित माहिती 21 प्रकारच्या गाव नमुन्यात योग्य स्वरूपात ठेवू नये.
7)तलाठी पदाचा पगार Payment
Talathi Padachi Marathi Mahiti तलाठी पदास वेतन श्रेणी ही 25,500 ते 41, 100 महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत मान्य करण्यात आलेली ही वेतनश्रेणी आहे. सातव्या वेतन आयोगानुसार 5200 ते 20200 अधिक ग्रेड पे 2400 मान्य करण्यात आली आहेत. महागाई भत्ता तसेच वाहतूक भत्ता आणि घर भाडे भत्ता देय आहे. आता नवीन नियुक्ती ह्या ठराविक मानधनावर पहिल्या तीन वर्षाकरिता ठराविक मानधन म्हणून देण्याचा विचार शासनाचा आहे.
8)तलाठी पदास लागणारी प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे Documents
ज्या उमेदवाराला Talathi Padachi Marathi Mahitiतलाठी पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा असेल त्यावेळेस त्याच्याजवळ पुढील योग्य प्रकारचे ठराविक नमुन्यातील कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करण्यासाठी आवश्यक आहे त्या प्रमाणपत्राची यादी आपण खालील प्रमाणे या लेखात देत आहोत.
1) शालांत प्रमाणपत्र परीक्षा सनद.
2) शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणपत्र.
3) शाळा सोडण्याचा दाखला.
4) शाळा सोडली नसल्यास अंतिम वर्षाचे बोनाफाईड.
5) वयाचा पुरावा यासाठी आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, जन्म प्रमाणपत्र.
6) जातीचे प्रमाणपत्र.
7) मागासवर्गीय असल्यास जात वैधता प्रमाणपत्र.
8) नॉन क्रिमिलेअयर प्रमाणपत्र अधिकृत रित्या अद्यावत दिनांक प्राप्त केलेले प्रमाणपत्र असावे.
9) सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा पुरावा.
10) आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचा पुरावा.
11) प्राविण्य प्राप्त खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र जर खेळाडू असेल तर त्याला लागेल.
12) माजी सैनिक असल्याचा सैनिक बोर्डाचा पुरावा.
13) खेळाडू असेल तर खेळाडू आरक्षणाचा पुरावा.
14) असेल तर अनाथाचा पुरावा.
15) प्रकल्पग्रस्त असेल तर प्रकल्पग्रस्ताचा पुरावा.
16) भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्ताचा पुरावा.
17) शासकीय योजनेअंतर्गत अंशकालीन पदवीधर म्हणून काम केले असल्यास कोठे व केव्हा काम केले याबाबत जिथे काम केले असेल तेथील प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि पदवीधर म्हणून काम केलेलेच असले तरच ग्राह्य धरण्यात येईल.
18) महिला समांतर व अपंग समांतर आरक्षण पुरावा असेल तर
19) नावात बदल केला असल्यास बदल केल्याचा पुरावा.
20) विवाहित महिलेसाठी विवाहित प्रमाणपत्र किंवा नाव बदलल्याचे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजपत्रात नाव समाविष्ट केल्याचा पुरावा.
21) भारताचा रहिवासी असल्याचा पुरावा.
22) मराठी मातृभाषा असल्यास मराठीचे ज्ञान असल्याचा पुरावा. हा पुरावा आपणास शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम भाषा मराठी दाखवलेला कोड क्रमांक आवश्यक आहे.
23) पदवी परीक्षेचे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र म्हणजे डिग्री तसे पाहिले तर इयत्ता दहावी पासून तर शेवटच्या परीक्षेपर्यंतचे सर्व प्रकारचे प्रमाणपत्र जवळ असणे आवश्यक आहे.
24) आपले कुटुंब लहान असल्यास लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
25) संगणकीय क्षेत्रातील एम एस सी आय टी ही परीक्षा उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र
26) अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र
उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे आपणास तलाठी पदासाठी आवश्यक कागदपत्रे माहितीस्तव देण्यात आले आहे
9)सारांश
महसूल विभाग आणि शेतकरी यांच्यामधील घर व शेती या प्रकरणाबाबत योग्य प्रकारे काम करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे शासकीय अधिकारी या नात्याने तलाठी यांच्याकडे दुवा Talathi Padachi Marathi Mahitiम्हणून पाहिले जाते. तलाठ्याजवळ आपल्या अधिकार क्षेत्रातील ग्राम पातळी वरील सर्व प्रकारच्या कागदपत्राची कुंडली जर कोण असेल तर तो म्हणजे तलाठी होय यालाच आपण पटवारी सुद्धा असे म्हणतात. अनेक राज्यांमध्ये अनेक नावाने हे पद अस्तित्वात आहे. आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळे महाराष्ट्रात या पदाचा तलाठी किंवा पटवारी असे म्हटले जाते ते उपरोक्त आपण पाहिलेच आहे. महाराष्ट्र शासनाने तलाठी कडचे काही अधिकार काढून घेतले असून जवळ जवळ 36 प्रकारची दाखले देण्याची पद्धत पूर्वी पटवाऱ्यामार्फत पटवारी करत असे. वेगवेगळ्या घटकांना तो प्रमाणपत्र देत असे. आता ते अधिकार काढून घेतले आहेत म्हणून फक्त लक्षात असू द्या 36 प्रकारची प्रमाणपत्रे त्याला देता येत नाही आणि तो अधिकार त्याला आता नाही. उदाहरणार्थ अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र आता त्याला देता येत नाही. जमीन आणि शेत सारा सातबारा आणि गाव नमुना आठ आणि कर वसुली बाबत हे पण महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण पद आहे म्हणून आपण आपल्या ब्लॉक पोस्ट करिता या पोस्ट मधून उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे माहिती चे स्पष्टीकरण केलेले आहेत. जर आपणास यामध्ये लेक वाचल्यानंतर काही तांत्रिक अडीअडचणी आल्यास किंवा कोणत्याही प्रकारची त्रुटी दिसून आल्यास ब्लॉक वेबसाईटच्या कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा. आपली त्रुटी योग्य वाटल्यास त्वरित दुरुस्त करण्यात येईल व त्याबाबत ब्लॉकच्या कॉमेंट मध्ये प्रतिक्रिया ही सुद्धा नोंदवली जाईल. मित्रांनो आपणास हा लेख वाचल्यानंतर आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना त्याच्या उज्वल भवितव्यासाठी शेअर करा.
FAQ
1) तलाठी पदाची शैक्षणिक पात्रता सांगा?
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
2) तलाठी हे पद कोणत्या अधिनियमाने अस्तित्वात आले आहेत?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम सात पोट नियम तीन नुसार हे पद अस्तित्वात आले आहे.
3) तलाठ्यांना किती प्रकारचे प्रमाणपत्र देता येत नाही?
36 प्रकारचे प्रमाणपत्र तलाठी यांना आता देता येत नाही.
4) तलाठी पदे कोणत्या विभागाशी संलग्न असते?
तलाठी पदे महसूल विभागाशी संलग्न असते.
5) तलाठी पदाच्या कार्यालयाचे नाव सांगा.
सजा कार्यालय.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.
क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद जन्मदिन मराठी माहिती
.