1) प्रस्तावना
Letter Writing In Marathi मित्रांनो, आज आपण मराठीत पत्र लेखन या विषयावर आधारित माहितीचा अभ्यास या लेखातून करणार आहोत. अति प्राचीन काळापासून तर आज पर्यंत पत्र लेखन सुरूच आहे. प्राचीन काळात पत्र लिहिण्यासाठी वेगवेगळ्या नैसर्गिक साधनाचा वापर करण्यात येत होता. आता आजच्या आधुनिक डिजिटल युगात मोबाईल चा आणि इंटरनेटचा त्याचबरोबर ई-मेलचा वापर करणे सुरू असल्यामुळे आजच्या नवीन पिढीला Letter Writing In Marathi पत्र लेखन शैली बाबत अचूक माहिती प्राप्त होत नसल्याचे दिसून येत आहे.
आज आपण आपल्या लेखातून मराठी भाषेत पत्रलेखन म्हणजे काय व पत्र लेखन कसे करावे त्याचबरोबर पत्र लेखनाची प्रकार यासंबंधी सविस्तर माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद करण्यात येणार आहेत.
Letter Writing In Marathiबदलत्या तंत्र युगात दूरध्वनी आणि ईमेलचा वापर होत असला तरीही आपणास पारंपारिक पद्धतीमुळे पत्रलेखन या' Letter Writing In Marathi ' विषयावर मर्यादा आली आहे. पत्रलेखनाचे महत्त्व आजही कमी झालेले नाही अनेक प्रकारचे पत्र हे सर्व स्तरावर लेखन कौशल्य म्हणून पत्रलेखन करता येणे आवश्यक असल्यामुळे या विषयावर सविस्तर माहिती या लेखातून अभ्यासणार आहोत.
![]() |
Letter Writing In Marathi |
Letter Writing In Marathi(toc)
2)पत्रलेखन म्हणजे काय? The definition of The Letter Writing In Marathi
Letter Writing In Marathiआपल्यापासून अगदी दूर असणाऱ्या माणसांना किंवा व्यक्तींना त्याच बरोबर नातेवाईकांना तसेच विविध कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला संदेश प्रत्यक्षात लेखी स्वरूपात संदेश लिहून कळवण्याचे महत्वपूर्ण साधन म्हणजे पत्र होय.Letter Writing In Marathi अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या पेक्षा अतिशय दूर असणाऱ्या माणसाला ठरविक उद्देश समोर ठेवून तो उद्देश लेखी स्वरूपात उद्देशून लिहिण्यात आलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती म्हणजे पत्र लेखन होय.
3) पत्रलेखनाचा इतिहास The History Of The Letter Writing In Marathi
पुरातन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत पूर्वीच्या काळी एकमेकापासून दूर असणाऱ्या व्यक्तीला संदेश ज्या साधनाच्या साह्याने संदेश कळवण्यात येत होता त्या साधनासं पत्र असे म्हणतात. पूर्वीच्या काळी हा संदेश कधीकधी अतिशय उशिरा प्राप्त होत असे. आपला संदेश पत्रावर लिहून एका विशिष्ट व्यक्तीलाही सुद्धा तो लिहिलेला संदेश वजा पत्र स्वतः अतिशय दूर जाऊन त्यांना हस्त पोज देण्यात येत असे. पत्र पाठवण्यासाठी काही काळ पक्षाच्या मार्फतही सुद्धा पत्र पाठवण्यात आलेले आहेत . राजशाही घराण्यांतील एका राजाने दुसऱ्या राज्या राज्याच्या राजाला काही महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी संदेश लिहून आपल्या माणसामार्फत त्या राजाला तो संदेश पोहोचवणारा संदेश म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पत्रलेखनच Letter Writing In Marathi होय. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी राजे यांच्या काळामध्ये अशा प्रकारचे पत्र लिखाण करण्यात येत होते.
5)आधुनिक काळातील संदेश वाहन व्यवस्था Letter Writing In Marathi
Letter Writing In Marathi पत्रलेखन करून पाठवण्यासाठी आधुनिक काळात पोस्ट ऑफिस ची स्थापना झाली. आणि पोस्ट ऑफिस च्या मार्फत पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोस्ट केले जात होते. त्यासाठी पोस्ट कार्यालय व पोस्टमन हे कार्य आणि जबाबदारी पूर्ववक पार पडत असत.
आता नवीन पिढीला या आधुनिक डिजिटल युगात पत्र लिखाण म्हणजे काय ?आणि ते कसे करावे ? याबाबत संपूर्ण मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना पत्र लिहिता येत नाही. त्याचे मुख्य कारण तपासले असता मोबाईल इंटरनेट ई-मेल या साह्याने एका सेकंदात आपली माहिती दुसऱ्या सेकंदाला लांबच्या व्यक्तीला तोंडाने बोलून व्यक्त करता येते आणि आपला संदेश आपल्या नातेवाईकाकडे किंवा कार्यालयाकडे त्वरित देणे सोपे झाले आहेत. त्यामुळेच तर पत्र लेखन Letter Writing In Marathi ही एक शैली असून याबाबत कौशल्य आत्मसात करण्यासाठी मित्रांनो ह्या ब्लॉग पोस्ट मधून याबाबत आपण सविस्तर माहिती अभ्यासू या.
6) मराठीत पत्र लेखन Letter Writing In Marathi
मित्रांनो आपण मराठीत पत्रलेखन " Letter Writing In Marathi " कौशल्याबाबत सविस्तर अभ्यास या ब्लॉग पोस्ट लेखांमधून पाहूया.
मुख्यतः एका व्यक्तीचा संदेश दुसऱ्या लांबच्या व्यक्तीकडे किंवा नातेवाईकाकडे किंवा कार्यालयाकडे संदेश लेखी स्वरुपात पाठवण्याची शैली म्हणजे पत्र लेखन होय. आपण मराठी भाषेत पत्र लेखन शैलीचा अभ्यास करत आहोत. आजच्या विज्ञान डिजिटल युगात जगातील कोणत्याही देशात एका सेकंदात माहिती संदेश रूपाने मोबाईल द्वारे, ईमेल द्वारे संदेश पोहोच करता येतो. एवढेच नव्हे तर आता तर व्हिडिओ कॉल करून एकमेकांना मोबाईल मध्ये आमने-सामने पाहून संदेश देणे सोपे झाले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पत्रलेखन शैलीवर झाला आहेत. आजच्या विद्यार्थ्याला ठराविक विशिष्ट नमुन्यात आधारित पत्र लिहिणे अतिशय अवघड जाते. पण मुख्य मुद्दा असा आहे की. आजच्या युगात अनेक स्पर्धेसाठी तसेच विविध परीक्षेसाठी पत्र लेखन लिखाण करणे आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या विद्यार्थ्यांना या ब्लॉग पोस्ट लेखांमधून पत्र लेखनाबाबत पुढील प्रमाणे माहिती आपण पाहूया
7) मराठीत पत्र लेखनाचे प्रकार The Kinds Of The Letter Writing In Marathi
आपली मातृभाषा मित्रांनो मराठी असल्यामुळे आपण मराठी भाषेत पत्र लेखनाचे प्रकार या लेखातून अभ्यास करणार आहोत. पत्रलेखनाचे मुख्य प्रकार आणि मुख्य प्रकाराच्या अंतर्गत निरनिराळे उपप्रकार या सर्व पत्र लेखनाच्या बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहू या.
मित्रांनो, कधी आपणास आपल्या आई वडिलाला, आपल्या घरातील इतर आपले भाऊ-बहीण, काका, काकी यांना काही महत्त्वपूर्ण माहिती प्रत्यक्ष बोलून सांगता येत नाही ती माहिती पत्रलेखन करून सांगू शकतो. आपले मित्र मंडळी तसेच सर्व प्रकारचे नातेवाईक यांना विशिष्ट प्रकारची माहिती पत्र लेखन करून कळू शकतो. पत्र फक्त नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना त्याच बरोबर इतर आप्त जणांना पत्र लिहीत असतो. त्याचप्रमाणे विविध कार्यालय, विविध कार्यालयाचे अधिकारी, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच नोकरीसाठी वेगवेगळ्या प्रसिद्ध कंपन्यांना व अधिकारी वर्गांना पत्र लिहून आपल्या पत्रामार्फत आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे मराठीत पत्र लेखन Letter Writing In Marathi करूनच करता येते. म्हणूनच पत्र लेखनाचे मुख्य प्रकार आपणास अभ्यासणे आवश्यक आहे.
मराठी भाषेत पत्रलेखनाची मुख्य दोन प्रकार आहेत. या दोन्ही प्रकाराबाबत सविस्तर माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करणार आहेत.
मराठीत पत्र लेखन करण्याचे दोन प्रकार आहेत.
अ) अनौपचारिक पत्र Informal Letter Writing In Marathi
ब) औपचारिक पत्र Formal Letter Writing In Marathi
उपरोक्तपणे दर्शविलेल्या दोन्हीही पत्र प्रकाराबाबत सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे मित्रांनो, स्पष्ट करूया.
अ) अनौपचारिक पत्र मराठी पत्र लेखन Informal Letter Writing In Marathi
आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, सर्व अप्तगणांना, कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना, किंवा आपल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीस तसेच पतीने पत्नीस लिहिलेले पत्र किंवा पत्नीने पतीस लिहिलेले पत्र ज्या प्रकारात समाविष्ट केले जातात त्या प्रकारास अनौपचारिक पत्र असे म्हणतात. या अनौपचारिक पत्राची भाषा अगदी प्रेमळ मनमिळाऊ स्वरूपाची कधी दुःखाच्या स्वरूपाची तर कधी आनंददायक स्वरूपाची तर कधी अभिनंदन करणारी आणि शुभेच्छा व्यक्त करणारी माहिती या पत्राच्या माध्यमातून आपल्याच सोयऱ्यांना किंवा नातेवाईकांना पाठवत असतो. औपचारिक पत्रा मधून कधी अभिनंदन केले जाते तर कधी शुभेच्छा दिल्या जातात. तर कधी दुःखाची वार्ताही दिली जाते. नेमकी परिस्थिती ज्या प्रकारची उद्भवेल त्या प्रकारे आपल्या सर्व नातेवाईकांना लिहिण्यात येणारे आणि संदेश देणारे महत्त्वपूर्ण साधन म्हणजे अनौपचारिक पत्र होय.
या पत्राच्या माध्यमातून आपण खालील व्यक्तींना वेगवेगळ्या कारणास्तव पत्र लिहीत असतो
अनौपचारिक मराठीत पत्रलेखन Informal Letter Writing In Marathi
- खालील व्यक्तीस केले जाते.
- आईस पत्र लेखन
- वडीलास पत्र लेखन
- लहान भावास पत्र लेखन
- मोठ्या भावास पत्र लेखन
- लहान बहिणीस पत्र लेखन
- लहान भावास पत्र लेखन
- काकास पत्र लेखन
- काकीस पत्र लेखन
- मित्रमंडळीस पत्र
- पतीस पत्र लेखन
- पत्नीस पत्र लेखन
- आपल्या ओळखीच्या व्यक्तीस पत्र लेखन
- आपल्या सगे सोयऱ्या पत्र लेखन
Informal Letter Writing In Marathi आपल्या नातेवाईकांना लिहिलेल्या पत्राच्या पाठीमागचा ठराविक उद्देश आणि ठराविक संदेश पत्रलेखन Letter Writing In Marathi करून आपल्या आप्तजनाकडे संदेश वाहन करणे हा असतो.
उदाहरणार्थ. एक मुलगा मुंबईला कॉलेजमध्ये शिकत आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना त्याला पैशाची गरज भासल्यास तो आपल्या आई वडिलाला किंवा नातेवाईकाला पत्र लिहून पत्राद्वारे पैशाची मागणी व्यक्त करतो. अशा स्वरूपाचे जे पत्र लिहिले जातात ते सर्व अनौपचारिक स्वरूपात समाविष्ट करण्यात येतात.
अनौपचारिक पत्राचा उद्देश Informal Letter Writing In Marathi
- अनौपचारिक पत्राचा उद्देश पुढील प्रमाणे असू शकतो.
- हार्दिक शुभेच्छा देणे
- अभिनंदन करणे.
- शुभेच्छा कळवणे.
- प्रसंगी दुःखद माहिती प्रगट करणे
- कधी कधी प्रेम भावना व्यक्त करणे.
- आपल्या मनातील सुखदुःख कळवणे.
- पत्राद्वारे महत्त्वपूर्ण माहिती प्रगट करणे.
- प्राविण्य प्राप्त केल्याची माहिती देणे.
- केलेल्या चुका ची माहिती देणे.
- वाढदिवसासाठी आमंत्रण देणे.
- आपल्याकडील मंगल कार्या बाबत आमंत्रण देणे.
- परीक्षेत पास झाल्याबाबत आई वडिलांस माहिती देणे
असे कितीतरी अनौपचारिक पत्राचे उद्देश येथे समाविष्ट केले आहे. Informal Letter Writing In Marathi एखाद्या वेळप्रसंगी आपल्या नातेवाईकास जी माहिती पत्राद्वारे तुम्ही संदेश वाहन करता ती लिहिण्याची विशिष्ट अशी पत्र लेखनाची शैली Letter Writing In Marathi आहेत याबाबत सुद्धा आपण या लेखाच्या शेवटी थोडक्यात अनौपचारिक पत्र लिहून स्पष्ट करणार आहोत.
आ) मराठीत औपचारिक पत्र लेखन Formal Letter Writing In Marathi
या पत्राच्या संदर्भाने माहिती स्पष्ट करताना औपचारिक पत्र लेखन म्हणजे काय? याबाबत मित्रांनो, आपण सविस्तर माहिती या लेखांमधून पाहूया.
औपचारिक पत्र म्हणजे एका शब्दात सांगायचे झाले तर एखाद्या कार्यालयाला किंवा कार्यालयातील अधिकाऱ्यांना ठराविक बाबतीत माहिती देण्याच्या संदर्भात लिहिलेली निश्चित माहिती आपल्याकरिता महत्त्वाची असलेली माहिती संबंधित कार्यालयापर्यंत तुमच्या पत्राच्या आधारे कायदेशीर रित्या लिहिलेली माहिती म्हणजे औपचारिक माहिती होय. याच माहितीला इंग्रजी मध्ये आपण फॉर्मल लेटर (Formal Letter )असे म्हणतो. या पत्रातील माहितीचे स्वरूप कार्यालयीन व व्यावसायिक स्वरूपाचे विशिष्ट कामाच्या संदर्भात विशिष्ट व्यक्तीशी लेखी स्वरूपात पत्राद्वारे माहिती लिखाण करून संबंधित अधिकाऱ्याला किंवा व्यावसायिकाला किंवा एखाद्या संस्थेला आपल्या संदर्भात असणारी माहिती त्यांच्यापर्यंत ज्या पत्राच्या स्वरूपात संदेश वाहन करण्यात येते अशा प्रकारच्या पत्रास औपचारिक पत्र असे म्हणतात.
Formal Letter Writing In Marathi औपचारिक पत्राचे काही ठराविक उपप्रकार या लेखात आपण खालील प्रमाणे स्पष्टपणे नमूद करूया.
औपचारिक पत्राचे उपप्रकार Formal Letter Writing In Marathi
- मराठीत अर्ज अर्ज लेखन
- तक्रार दर्शक पत्र लेखन
- चौकशी दर्शक पत्र लेखन
- मागणी दर्शक पत्र लेखन
- विनंती दर्शक पत्र लेखन
- शुभेच्छा दर्शक पत्र लेखन
- अभिनंदन व्यक्त करणारे पत्र लेखन
- विशिष्ट व्यक्तीस मानपत्र लेखन
- अधिकारी वर्गांना आमंत्रणदर्शक पत्र लेखन
- आभार दर्शक पत्र लेखन
- सुट्टी मागणी दर्शक पत्र लेखन
- मुख्याध्यापकास पत्र लेखन
- वर्ग शिक्षकास पत्र लेखन
- नोकरी प्राप्तीसाठी विविध कंपन्यास पत्र लेखन
- शिष्यवृत्ती प्राप्तीसाठी पत्र लेखन
- सवलत दर्शक पत्र लेखन
- माफी दर्शक पत्र लेखन
- क्षमा याचना दर्शक पत्रलेखन
Formal Letter Writing In Marathi औपचारिक पत्रांचे पत्र लेखन चे अनेक प्रकार आपल्या दृष्टीस आढळून येईल. शालेय विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी एखाद्या कार्यालयाकडे केलेला अर्ज हा सुद्धा अर्ज औपचारिक पत्राचा एक भाग आहे. औपचारिक पत्राची भाषा ठराविक असते त्या सर्व बाबतीत माहिती आपण या लेखात नमूद करणार आहेत आणि शेवटी एक औपचारिक पत्र कसे लिहिले जाते ते उदाहरण दाखल या लेखात देणार आहोत.
पत्र कोणत्याही प्रकारचे असो त्या पत्राचा मुख्य उद्देश एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहितीचे संदेश वहन करून विशिष्ट प्रकारचा संवाद साधने हा मुख्य हेतू असतो.
मित्रांनो पत्र लिहीत असताना ते कोणत्याही प्रकारचे असो ते ठराविक नमुन्यात खालील पद्धतीने लिहिलेले असावे.
अनौपचारिक पत्र लेखनाचे मुद्दे Formal Letter Writing In Marathi
- स्वतःचा पत्ता पत्राच्या डाव्या विभागात लिहिणे.
- पत्र लेखन दिनांक स्वतःच्या पत्त्याखाली लिहिणे.
- उजव्या पत्रांच्या बाजूस नातेवाईकास नमस्कार पद्धती
- पत्रलेखनाचा मुख्य आशय नमूद करणे.
- पत्राच्या शेवटी डाव्या बाजूस कळावे आपला
- पत्राच्या शेवटी उजव्या बाजूस पत्र लिहिण्याची सही आणि दिनांक.
- पत्र ज्याला पाठवतो त्याचा पत्ता प्रति
एवढे मुद्दे लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक मुद्द्यास परीक्षेमध्ये गुण सुद्धा वेगवेगळे दर्शविण्यात आलेले असतात.
8)आदर्श मराठी पत्र लेखन नमुने
अ)आदर्श अनौपचारिक पत्राचा नमुना Letter Writing In Marathi
विनंती पत्र
अ ब क,
जनता विद्यालय मुंबई,
ता.जि. उत्तर मुंबई,
दिनांक 22 मार्च 2024.
प्रति,
तिर्थरुप आई- बाबा,
साष्टांग नमस्कार, विनंती विशेष.
तिर्थरूप आई बाबा माझ्याकडून साष्टांग नमस्कार. बाबा मी मुंबई येथे अगदी सुखरूप आहे. माझी परीक्षा अत्यंत जवळ आली आहेत. त्यामुळे मला इंग्रजी विषयाची शिकवणी इंग्रजी शिक्षकाकडे लावायची आहेत. परंतु शिकवणीस आवश्यक तेवढे पैसे सध्या माझ्याकडे नसल्यामुळे या पत्राद्वारे आपणास मी नम्र विनंती करतो की, परीक्षेच्या दृष्टीने इंग्रजी विषय शिकवणी लावण्यासाठी लागणारे दरमहा 1000 रुपये मला दोन महिन्याकरिता आवश्यक आहे. तरी आपणास मी या पत्राद्वारे कळकळीची विनंती करतो की, बाबा माझे पत्र मिळताच मला फोन पे नंबर वर पैसे त्वरित पाठवणे ही नम्र विनंती. करिता आपल्या चरण सेवेसी हे पत्र मी लिहीत आहे. पत्र मिळताच मला पैसे लवकर पाठवणे करिता पुनश्च नम्र विनंती. घरातील लहान थोर मंडळींना माझा नमस्कार. लहाना स आशीर्वाद तर मोठ्या मंडळीस शिरसाष्टांग नमस्कार. माझ्या पत्रातील आशयानुसार मला पैसे ही पुनश्च नम्र विनंती.
कळावे,
आपला आज्ञाधारक चिरंजीव,
अ. ब. क.
. सही
उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा स्वरूपाचे अनौपचारिक पत्र लिहिणे आणि अनेक पत्र लिहून सराव करणे. भविष्यामध्ये आपणास अशा स्वरूपाचे पत्र लेखन मराठीतून येणे आवश्यक आहे हाच या ब्लॉग पोस्ट चा मुख्य उद्देश आहे.
आता मित्रांनो , आपणास एक औपचारिक पत्राचा आदर्श नमुना खाली दर्शविल्याप्रमाणे स्पष्टपणे या लेखात नमूद करत आहेत.
आ) औपचारिक पत्र Letter Writing In Marathi
विनंती पत्र
अ. ब .क.
जनता विद्यालय ,उत्तर मुंबई,
ता. जि. उत्तर मुंबई,32,
दिनांक 22 मार्च 2024.
प्रति,
मा. मुख्याध्यापक साहेब,
जनता विद्यालय, उत्तर मुंबई, 32.
ता. जि. उत्तर मुंबई 32
विषय:-शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याबाबत.
माननीय महोदय,
उपरोक्त दर्शविलेल्या विषयानुसार ,सर मी आपणास हा विनंती अर्ज सादर करत आहे. मी आपल्या विद्यालयात जून 2022 ला वर्ग पहिला तुकडी मध्ये प्रवेश घेतला होता. माझे वर्गशिक्षक एक्स वाय झेड असून त्यांच्याकडेही सुद्धा मी अशाच प्रकारचा विनंती अर्ज सादर केला आहे. परंतु वर्ग शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे मुख्याध्यापकाकडे अर्ज सादर करून परवानगी घेणे नंतर आपणास शाळा सोडण्याचा दाखला देण्यात येईल. म्हणून मी माझ्या स्तरावरून आपणास विनंती अर्ज सादर करतो की, यावर्षी इयत्ता बारावी पास झालो असून पुढील शिक्षणासाठी मला नागपूर येथे आई वडील राहत आहे. तेथे त्यांच्याकडे बाहेरगावी शिक्षणासाठी जाणे आवश्यक आहे. तसेच या अर्जाद्वारे आपणास स्पष्टपणे विषय नमूद करतो की आपल्या विद्यालयाची सर्व फी मी आपल्या कार्यालयात भरलेली आहेत. आता माझ्याकडे कोणत्याही प्रकारची आपल्या विद्यालयाची फी देणे बाकी नसल्यामुळे आपणाकडे विनंतीपूर्वक हा अर्ज सादर करतो की मला आठ दिवसाच्या आत आपल्या विद्यालयाचा माझा शाळा सोडण्याचा दाखला देण्यात यावा ही आपल्या चरण सेवेशी नम्र विनंती. माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मला शाळा सोडण्याचा दाखला देणे ही नम्र विनंती आहे करिता आपल्याकडे हा अर्ज सादर करत आहे.
कळावे,
आपला विश्वासू,
आज्ञाधारक विद्यार्थी,
एक्स. वाय .झेड,
. इयत्ता बारावी, (अ)
सही........................
मो. नं.918888888888
प्रति,
To,
मुख्याध्यापक,
जनता विद्यालय उत्तर मुंबई ,32,
तालुका जिल्हा उत्तर मुंबई ,32.
मित्रांनो मराठी भाषेत पत्रलेखन कसे करावे याबाबत आदर्श नमुने औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही प्रकारचे एक एक आदर्श नमुना पत्र या लेखात आपल्या अभ्यासासाठी स्पष्टपणे नमूद केले आहे. आपण याच प्रमाणे पत्र लेखन दिलेल्या विषयावर आधारित परीक्षेत लिहिणे आवश्यक आहे.
9)सारांश
मित्रांनो, परीक्षेसाठी पत्र लेखन या विषयावर कृती प्रश्न पत्रिका आराखड्यामध्ये इयत्ता दहावी किंवा इयत्ता बारावी परीक्षेसाठी तसेच इतर सर्व परीक्षेसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी पत्रलेखन करणे एक आवश्यक प्रक्रिया असल्यामुळे मित्रांनो ,आपल्या मदतीसाठी योग्य पत्र लेखन कसे करावे? याबाबत माहिती देण्यात आली आहे. म्हणून आपण परीक्षेत या विषयावर आलेला प्रश्न बिनचूक परीक्षेत लिहिणे आवश्यक आहे. पत्र लेखन या क्रियेमध्ये प्रत्येक मुद्द्याला वेगवेगळे गुण देण्यात आलेले असतात. तुम्ही पत्र परीक्षेत लिहिल्यास जे काही तुमचे मुद्दे बरोबर आले असेल त्या मुद्द्याला शंभर टक्के गुण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही याची जाण आपणास असावी करिता या ब्लॉग पोस्ट मधून ब्लॉगर ने पत्र लेखन मराठी याबाबतीत नखशीकांत माहिती देण्याचा ऑटोकॉट प्रयत्न केला आहे. म्हणून आपण हा ब्लॉग पोस्ट लेख सविस्तर दिलेला आवश्यक वाचन करा. आपणास हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांनाही देखील वाचण्यासाठी हा लेख आवश्यक शेअर करा. जर काही या लेखा बाबत आपणास तांत्रिकदृष्ट्या त्रुटी आढळून आल्यास त्वरित ब्लॉगरला ब्लॉक पोटच्या कॉमेंट बॉक्स मध्ये लेखी स्वरुपात सूचना करा किंवा माहिती कळवा. आपली माहिती अगदी खरोखरच अचूक आहे असे आढळून आल्यास त्वरित लेखामधील त्रुटी त्वरित दुरुस्त करून लेख अद्यावत करण्यात येईल. म्हणूनच मित्रांनो अनेक मित्रमंडळी कडून मला या विषयावर माहिती ब्लॉक पोस्ट लेखाद्वारे पोस्ट करावी असे फोनवरून कळविण्यात आले होते म्हणून या मुख्य मराठीत पत्रलेखन या विषयावर हा ब्लॉग पोस्ट साठी लेख लिहिण्यात आला आहे. मित्रांनो आता आपण या लेखात येथे पूर्णविराम देऊया.
FAQ
1) मराठीत पत्र लेखन करण्याचे मुख्य किती प्रकार आहे?
उत्तर-मराठीत पत्र लेखन करण्याचे मुख्य दोन प्रकार आहेत.
2) अनौपचारिक पत्र म्हणजे काय?
उत्तर-नातेवाईकास लिहिलेले पत्र म्हणजे अनौपचारिक पत्र होय.
3) औपचारिक पत्र म्हणजे काय?
उत्तर-कार्यालयासस किंवा एखाद्या अधिकाऱ्यास लिहिलेले पत्र म्हणजे औपचारिक पत्र होय.
4) गावातील सरपंच यांना तक्रार देण्यासाठी लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारात समाविष्ट करण्यात आले आहेत?
उत्तर-औपचारिक पत्र प्रकारात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
5) पत्नीने आपल्या पतीस लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारात समाविष्ट करण्यात येते ?
उत्तर-अनौपचारिक पत्र प्रकारात समाविष्ट करण्यात येते.
अधिक माहितीसाठी मित्रांनो आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.