बाल संगोपन व शिक्षण मराठी माहिती | Bal Sangopan and Education In Marathi
प्रस्तावना
मित्रांनो, Bal Sangopan and Education In Marathi याबाबत माहिती आपण आज प्रस्तुत ब्लॉक पेज मध्ये बाल संगोपन व शिक्षण याविषयी सविस्तर माहितीचा अभ्यास पाहूया. Bal Sangopan and Education In Marathi प्रस्तुत लेखामध्ये प्रारंभिक बाल्यावस्थेत करण्यात येणारे संगोपन त्याचबरोबर शिक्षण याबाबत माहिती विषय करण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहेत. बाल संगोपन व शिक्षण याची संपूर्ण नाव भारतीय परंपरेची विविध अंगांना स्पर्श करणारी आहे.
बाल विकासाची भूमिका व रूपरेषा या संदर्भाने येथे शैक्षणिक विचार स्पष्ट करणार येणार आहेत त्याचप्रमाणे भारतीय नवीन शैक्षणिक धोरणानुसार मूलभूत घटक म्हणून या घटकाकडे जाणीवपूर्वक लक्ष शासनाने दिले आहेत.
भारतीय संस्कृतीमध्ये बालकाच्या आयुष्यातील जन्म घेतल्यापासून सुरुवातीचे आठ वर्ष बाल्यावस्था म्हणून अत्यंत महत्त्व असल्यामुळे याच अवस्थेमध्ये मुलाच्या शिक्षणाला खरी सुरुवात होते. त्यामुळे बाल संगोपन व शिक्षण ' Bal Sangopan and Education In Marathi ' या संदर्भाने संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण स्पष्टपणे या लेखात नमूद केली आहे.
![]() |
Bal Sangopan and Education In Marathi |
बाल संगोपन व शिक्षण याबाबत परिचय Bal Sangopan and Education In Marathi
बालकाच्या जीवनातील सुरुवातीच्या अवस्थेत त्याच्या विविध पातळीचा खरा विकास येथेच होतो. शारीरिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्याचा विकास खऱ्या अर्थाने याच पातळीवर येथेच होत असतो. बालकाच्या विकासातील आणि जीवनातील इतर कोणत्याही टप्प्यातील विकासापेक्षा किंवा गती पेक्षा जास्त विकास वयाच्या आठव्या वर्षापासून सुरुवात होत असते. जीवनाच्या पहिल्या आठ वर्षांमध्ये बालकाच्या मेंदूच्या विकासाची गती इतर अवयवापेक्षा अधिक वेगवान पद्धतीने होत असते. मानसशास्त्राप्रमाणे मेंदू शास्त्राचा विकास संशोधनाअंती 85% पेक्षा जास्त विकास वयाच्या सहा वर्षापर्यंत जलद गतीने होत असतो. येथेच बाल संगोपन व शिक्षण' Bal Sangopan and Education In Marathi ' मुलाचे योग्य प्रकारे होणे मानसशास्त्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
बाल संगोपनात होणारा मेंदूचा विकासBal Sangopan and Education In Marathi
Bal Sangopan and Education In Marathiबाल संगोपनात होणारा मेंदूचा विकास त्याच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामावर अवलंबून असतो. बाल्यावस्थेत मेंदूच्या विकासाची गती अतिशय वेगवान असते. बाल्यावस्थेतील
मेंदू शास्त्र संशोधनात प्रारंभिक बाल्यावस्थेतील सुजान संगोपनाचे महत्व मेंदू शास्त्राशी संबंधित आहे. मेंदू शास्त्राचे संशोधन केल्यानंतर मानसशास्त्राने हे सिद्ध केले की अवस्थेतील मेंदूचा विकास व होणारा चिरंतर विकास त्याच बरोबर बालसंगोपन आणि शिक्षण व मेंदू हे एकमेकांवर आधारित विकसित होणारे घटक आहे. वयाच्या पहिल्या वर्षापासून तर वयाच्या आठव्या वर्षापर्यंत बालके आपल्या मेंदू प्रमाणे एका विशिष्ट सरळ रेषेत विशिष्ट टप्प्याने शिकत नसतात तर बहुतांश बालके अध्ययन प्रक्रिया निश्चित टप्प्याने मार्ग आक्रमण करून शिकत असतात. बाल संगोपनामध्ये बालकाचा विकास अरेखीय पद्धतीने कमी जास्त वेगाने सतत चालू राहतो आणि त्यातूनच बालकाचे संगोपन तसेच वाढ आणि विकास कसा होतो आहे हे दिसून येत नाही परंतु विकास मात्र विशिष्ट आंतरक्रियाने सुरूच असतो. बालकाच्या संगोपनामध्ये सुकृत दर्शनी विचार करताना पहिल्या आठ वर्षापर्यंत एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे विकासाचा बिंदू संक्रमण बिंदू म्हणून कार्यरत अहोरात्र सुरू असतो म्हणूनच या गोष्टीकडे लक्ष देऊन विशेष वयाच्या आठव्या वर्षीच बालके अध्ययन प्रक्रिया स्वतःशी जुळून घेताना दिसून येतात. म्हणूनच आपल्याला या लेखात मित्रांनो बाल संगोपन व शिक्षण Bal Sangopan and Education In Marathi याविषयी सविस्तर माहिती प्राप्त करण्याची गरज आहे.
बाल संगोपन व शिक्षण याबाबत पायाभूत स्तर Bal Sangopan and Education In Marathi
बाल संगोपन व शिक्षण याबाबत शास्त्रीय दृष्टीने दोन स्तर दर्शविण्यात आले आहेत म्हणजेच दोन स्तरात वर्गीकरण केले आहे. त्या दोन्ही स्तराची माहिती खालील प्रमाणे या लेखात स्पष्टपणे नमूद केली आहे.
१) वय वर्ष 0 ते 3 स्तर क्रमांक एक
पहिल्या स्तरांमध्ये सर्वसामान्यपणे बालकाच्या जन्मापासून तर त्याच्या वयाच्या तीन वर्ष पर्यंतचा काळ हा पहिला पायाभूत स्तर असून या पायाभूत स्तरात बालकाचे बाल संगोपन त्याच्या घरातील कुटुंबासमवेत आणि कौटुंबिक वातावरणात बाल्य शिक्षण पूर्ण करीत असतात. काही बालके हे आपल्या कुटुंबासमवेत असतात तर काही बालके यांचा काही काळ पहिल्या स्तरात पाळणा घरात ठेवले असतात.बालके जन्मापासून तर वयाचे तीन वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचे सर्व बाल शिक्षण हे त्यांच्या कुटुंबात आई-वडिलांकडून पूर्ण केले जात असतात. त्याच्या कानावर जे शब्द ज्या भाषेचे कानी पडतील ती भाषा तो याच काळात शिकत असतो. म्हणजेच या या कालखंडात मूल ऐकणे आणि बोलणे ही प्रक्रिया पूर्ण करत असतो म्हणून या स्तरालाही अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहेत. बालकाचा ज्या कुटुंबात जन्म झाला त्या कुटुंबातील वातावरण ज्या प्रकारचे असेल त्या प्रकारच्या वातावरणातील बाल संगोपन व शिक्षण ही प्रक्रिया पूर्ण होत असते. पाळणाघरातील मुलांवर पाळणा घरातील वातावरण ज्या प्रकारचे असेल त्याचा प्रभाव त्याच्या संगोपनावर व शिक्षणावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच असे म्हटले जाते की, बाल्यावस्था संगोपन व शिक्षण हा बालकाचा मूळ पाया त्याचे कुटुंब असते. तीन वर्षापर्यंत बालकाची संगोपन प्रक्रिया पूर्ण करून त्याला प्राथमिक अवस्थेतील शिक्षण देण्याचे काम करणारी महत्त्वाची संस्था त्याची कुटुंब असते. या अवस्थेत मुख्यतः त्याला पोषण युक्त आहार प्राप्त झाला पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाकडून त्याच्या आरोग्याची सोय येण्याचा हा कालावधी असल्यामुळे चांगल्या सवयी लावण्याचे काम त्याच्या सुजाण आई-वडिलाला याच कालखंडात पूर्ण करावी लागतात. तसेच या वयामध्ये मुलाला सुरक्षा देऊन संरक्षण करण्याची प्रक्रिया त्याच्या कुटुंबाला पूर्ण करावी लागते. याच बाल्यावस्थेत पुढील अध्ययनासाठी बालकाला उत्तेजन प्राप्त करून देणारी पायाभरणी बालकाच्या आई-वडिलांना पूर्ण करावी लागते. पहिल्या स्तरातील अवस्थेत बाल संगोपन व शिक्षण त्याच्या कुटुंबात पूर्ण होत असल्यामुळे सुरुवातीला त्याच्या कुटुंबाकडून बालकाला काही लहानसे खेळ, सुरक्षितता व पोषण याचाही समावेश त्याच्या पालकावर अवलंबून असतो. या अवस्थेत मूल संभाषण करण्यास शिकत असते, याच अवस्थेमध्ये काही खेळ आणि हालचाली पूर्ण करण्याचे काम बाल वयात त बालसंगोपनात पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी कुटुंबावर असते. म्हणूनच मुलाची हालचाल वेगवेगळ्या आवाजाचे श्रवण करून तशा प्रकारचे बोल बाळ पूर्ण करीत असते. म्हणजेच बाल संगोपन व शिक्षण " Bal Sangopan and Education In Marathi "याच्या पायाभूत स्तरावर श्रवण कौशल्य विकसित होणे हे महत्त्वाचे तत्व आहेत. याच अवस्थेत मूल स्पर्धेत ज्ञान आणि दृष्टी ज्ञान चांगल्या प्रकारे प्राप्त करत असतात. स्पर्शाचे संवेदन व उत्तेजन त्याला प्राप्त होत असते. संगीताचे श्रवणही सुद्धा बाल्यावस्थेत ऐकवणे आवश्यक आहे त्याचबरोबर काही दृष्टी युक्त गोष्टी चे वाचन पालकाकडून पहिल्या स्तरात पूर्ण होत असतात. या पाया स्तरावरच संपूर्ण पुढील प्रक्रिया ही अवलंबून असते. बालकाच्या बाल संगोपन व शिक्षण यातील पहिल्या स्तरात बालकाचा सर्वांगीण विकास हा शारीरिक किंवा कारक बदल होत असतो. याच अवस्थेत बोधात्मक सामाजिक व भावनिक संख्याज्ञान व भाषा ज्ञान विकासाची क्षेत्रे आणि त्यातून प्राप्त होणारी निष्पत्ती यातून महत्त्वाच्या गोष्टी साध्य होत असते हे या ठिकाणी पालकांनी लक्षात घेऊन बालकाच्या सर्वांना विकासासाठी सर्व क्षेत्रे परस्पर व्यापी अर्थात परावलंबी असतेत. स्पष्ट साध्या शब्दा त सांगायचे झाले तर बाल क पहिल्या तीन वर्षात परावलंबी असते. ते आपल्या आई वडिलावर आणि घरातील वातावरणावर अवलंबि असते. घरात जशा प्रकारची वातावरण त्याला प्राप्त होईल प्रकारच्या वातावरणाचा वेध भविष्यात बालकांकडून पूर्ण होतो याची जाणीव पालकाला पहिल्याच अवस्थेत येण्याची गरज असल्यामुळे ब्लॉगर ने या विषयावर पोस्ट लिहिण्यासाठी हाती घेतली आहेत. बालकाच्या वय वर्ष झिरो ते तीन या वयोगटात बालक घरामध्ये उच्च गुणवत्तेचे प्राथमिक बाल्य संगोपन आणि शिक्षण सक्षम करण्याची मार्गदर्शक तत्वे आपल्याला शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे कशा प्रकारे विकसित करावे याचे संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे याबाबत पालकांना प्रशिक्षण देत असते.
२) वय वर्ष 3 ते 8 स्तर क्रमांक दोन
बाल संगोपन व शिक्षण या अवस्थेतील हा दुसरा स्तर असून या स्तराला मुलाचे वय तीन वर्षापेक्षा जास्त आणि आठ वर्षापेक्षा कमी वर्षांची किंवा वयोगटांची मुले या स्तरात समाविष्ट झालेली असतात. हाच तर मुख्य ते करून संस्थात्मक स्थळ व्यवस्थेतील व्यतीत होणारा कालावधी दर्शक कालखंड मानला जातो कारण या वयोगटात मुले हे बालक मंदिरामध्ये आपले शिक्षण पूर्ण करीत असते. बालकाचे आई-वडील म्हणजे पालक बालकाला कोणत्यातरी एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या किंवा त्याच्या मातृभाषेच्या बालक मंदिरामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेत असतात. म्हणून तीन वर्षानंतर बालकाला संपूर्ण घडवण्याचे काम बालक मंदिर हे कार्य पूर्ण करीत असतात. बालकाला बालक मंदिरात प्रवेश दिल्यानंतर ती एक संस्थाच असल्यामुळे हा काल संस्थेत व्यतीत होणारा काल म्हणून समजण्यात येतो. या ठिकाणी संस्थात्मक व्यवस्थेतर्फे वय वर्ष तीन ते आठ वयोगटातील बालक यांना योग्य प्रकारच्या आधुनिक शिक्षणावर आधारित सेवा उपलब्ध करून देण्याचे काम बालक मंदिराचे असून बालकाला सुयोग्य रीतीने गुणवत्तापूर्वक प्राथमिक बाल्यावस्थेत संगोपन आणि शिक्षण उपलब्ध करून देऊन त्या बालकाच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास करण्याची ही एक महत्वपूर्ण प्राथमिक बालसंगोपन व शिक्षण Bal Sangopan and Education In Marathi व्यवस्थेतील पहिली पायरी म्हणावी लागेल. बालक मंदिराकडून त्याला ज्या प्रकारचे शिक्षण आणि वातावरण प्राप्त होईल त्याप्रमाणे बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास येथेच दिसून येतो. या वयोगटात नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे शासनाने बाल संगोपन व शिक्षण व्यवस्था या मध्ये सहा ते आठ वयोगटाचे दोन उपभाग किंवा दोन उपप्रकार करण्यात आले आहे त्याबाबतसविस्तर माहिती खालील प्रमाणे मित्रांनो, पाहूया
स्तर क्रमांक दोन चे दोन उपभाग
अ) पहिला उपप्रकार वय वर्ष तीन ते सहा
ब) दुसरा उपप्रकार वय वर्ष सहा ते आठ
या दोन्ही उपघटातील बालकाच्या शैक्षणिक व्यवस्थेचे व अवस्थेचे वर्णन या लेखात पुढील प्रमाणे नमूद करण्यात आले आहेत.
अ) वय वर्ष तीन ते सहा
Bal Sangopan and Education In Marathi मित्रांनो, हा वयोगट म्हणजे अतिशय क्षमताक्षिल वय गट आहे. या वयोगटातील बालकांना पालक निरनिराळ्या प्रकारच्या स्थापन झालेल्या सरकारद्वारे किंवा संस्थाद्वारे चालवण्यात येणाऱ्या अंगणवाड्या , बालवाड्या , बालक मंदिर किंवा पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत बालकांना प्रवेश पालक देतात. बालकाला या पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश दिल्यानंतर बालकाच्या शिक्षणाची खरी सुरुवात आता येथूनच सुरुवात होते असे म्हटले तर त्यात काहीसे वावगे होणार नाहीत. या वयोगटातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्था लहान लहान खेळ व भाषा ज्ञान काही अंक ज्ञान तर निरनिराळ्या प्रकारची दृश्य दाखवून आजच्या डिजिटल युगात दर्शविल्याप्रमाणे ऑनलाइन गोष्टी ऐकवल्या जातात. याच बालक केंद्रातून मुलाचे शिक्षण घडण्याचे कार्य सुरू आलेले असते. बालकाची श्रवण ग्रहण करण्याची क्षमता वर आधारित संपूर्ण शिक्षण व्यवस्था याच गटातून त्याच्या सुप्त गुणाला विकास देण्याचे काम करत असते. बालक खेळ गट, जूनियर केजी, सीनियर केजी किंवा लहान बालक गट व मोठा बालक गट यामध्ये शिक्षण पूर्ण करत असते.
ब) वय वर्ष सहा ते आठ
Bal Sangopan and Education In Marathi शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत शासन निर्णय निर्गमित करून ज्या बालकाचे वय पूर्ण सहा होईल त्याला इयत्ता पहिली प्रवेश देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित ही सुद्धा केला आहे. भारतातील सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात संपूर्ण ठिकाणी इयत्ता पहिलीत प्रवेश देण्याचे समान धोरण हे तत्व अंगीकारले आहेत. त्यामुळे या वयोगटात तीन मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी तयार केलेला हा दुसरा वयोगट आहे. या वयोगटात बालकाला प्राथमिक शिक्षण दिले जाते. या प्राथमिक शिक्षणामध्ये इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी याच येते चा समावेश नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे करण्यात आला आहे. म्हणून आपणास या वयोगटातील प्राथमिक शिक्षणाबद्दल मित्रांनो, माहिती आपण या लेखातून पाहूया.
बालकाचे वय वर्ष सहा ते आठ वयोगटातील प्राथमिक शिक्षण वर्ग पहिला आणि वर्ग दुसरा या वर्गातून संस्थांमार्फत किंवा सरकारमार्फत शिक्षण देण्यात येते.
बालकाच्या या वयोगटातील बालकाचे प्रारंभिक बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षण यामध्ये आरोग्य सुरक्षितता संगोपन आणि पोषण या बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे काम पहिल्या स्तरात अंगणवाड्या किंवा बालवड्याद्वारे सक्षम रीतीने पूर्ण केल्या गेले पाहिजे तरच पुढील काळात मुलाचे शिक्षण किंवा बालकाचे शिक्षण योग्य रीतीने होत असते.
दुसऱ्या स्तराचा आपण येथे विचार करत असताना बालकाचे वय लक्षात घेता बालकांसाठी विशिष्ट प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करून बालकांना इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहेत. आणि शासनाने याच गोष्टीवर मुख्य भर देऊन शिक्षण व्यवस्थेच्या आराखड्यामध्ये याचा समावेश केला आहे. वय वर्ष सहा ते आठ या वयोगटातील मुलांना किंवा बालकांना व्यक्तिगत पातळीवर विशिष्ट मार्गदर्शनाखाली देखरेखी खाली अनेक खेळावर आधारित विशेष शिक्षण देणे महत्त्वाची संकल्पना पुढे आली आहे. म्हणजेच बालकाच्या सुप्त गुणाला विकसित करण्याचे कार्य शिक्षण संस्थेद्वारे पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे. बालकांमध्ये जन्मजात अनेक प्रकारची सुप्त शक्ती दडलेली असते. ती दडलेली सुप्त शक्ती बाहेर काढण्याचे काम शिक्षण संस्थेतील शिक्षक वर्गांकडे सोपवण्यात आलेली असते. बालकांमध्ये पुढील प्रकारच्या सुप्त शक्ती असतात. उदाहरणार्थ कुतूहल, सर्जनशीलता, चिकित्सर विचार करण्याची शक्ती, सहकार्य करण्याची भावना, गटकार्याच्या साहाय्याने शिक्षण पूर्ण करण्याची क्षमता, सामाजिक आंतरक्रिया, मित्राबद्दल सहानुभूती, सर्वांबरोबर करुणा भावना, सर्व समावेशकता, संवाद करण्याची कला, आपल्या संस्कृतीची ओळख व आदर, खेळकर वृत्ती, आपल्या सभोवतालच्या वातावरणाबद्दल ओळख प्राप्त करून घेण्याची क्षमता कौशल्य अशा प्रकारच्या विविध क्षमता ला विकसित करण्याचे काम शिक्षण संस्थेमार्फत या वयोगटाला पूर्ण कराव्या लागतात. त्याशिवाय आपल्या शिक्षकांबद्दल आदर बाळगणे, राष्ट्रीय वृत्ती निर्माण होणे आणि इतरासी यशस्वीरित्या आदरपूर्वक आंतरक्रिया साधण्याची क्षमता आणि त्या क्षमतेचे संवर्धन व विकास याच वयोगटात शिक्षण व्यवस्थेमार्फत साध्य करता येतो म्हणून प्राथमिक शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे आहेत.
प्राथमिक शिक्षणातील पायऱ्या
१) संख्याज्ञान व साक्षरता पायरी क्रमांक एक
या वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणामध्ये इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये प्रारंभिक बाल्यसंगोपन आणि शिक्षणामध्ये प्राथमिक साक्षरता आणि संख्या ज्ञानाच्या विकासासह त्याला महत्त्वाचे खालील गोष्टीबाबत ज्ञान प्राप्त करून देणे हे कार्य शिक्षण संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाद्वारे पूर्ण करता येते. या पायरीमध्ये मुलांना किंवा बालकांना अध्यापन करून त्यांच्याकडून अध्ययन करून घेण्यासाठी त्याला खालील गोष्टी चे अध्यापन करणे गरजेचे आहे.Bal Sangopan and Education In Marathi
प्राथमिक साक्षरता, संख्या ज्ञानाचा विकास त्याच बरोबर भाषेतील वेगवेगळे वर्णमाला व अंकज्ञान, भाषा ज्ञान, अंकाची मोजणी करणे, विविध रंगाची ओळख करून देणे, विविध आकाराची रेखाचित्रे आणि चित्रकला याबाबत ओळख करून देणे नुसते ओळख करून देणे नव्हे तर त्यांच्याकडून त्याबाबत कृती करून घेणे, काही मैदानावरील खेळ तर काही वर्गातील खेळ शिकवणे, वेगवेगळ्या प्रकारचे भाषेवर आधारित किंवा गणितावर आधारित कोडे देऊन त्यांच्याकडून सोडून घेणे, काही विषयावर तार्किक विचार मांडण्यास संधी उपलब्ध करून देणे, काही त्याला कला शिकवणे तर काही हस्तकलाही सुद्धा कार्यानुभव या विषयाच्या अंतर्गत बालकांकडून पूर्ण करून घेणे, संगीता बाबतचे ज्ञान देऊन संगीतातील हालचाली व हावभाव स्पष्ट करून सांगणे व त्यांच्याकडून कृती करून घेणे, मुलाला लिहिता वाचता येणारी साक्षरता संख्याज्ञान आणि आपल्या पर्यावरणाच्या जागृतीसाठी सभोवतालच्या परिस्थितीचे वर्णन करून त्याचे लक्ष या गोष्टीकडे केंद्रित करणे तसेच विविध क्षेत्रातील त्यांच्याकडून अध्ययन निष्पत्ती बांधणी पूर्ण करून घेणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान प्राप्तीसाठी विशेषता या वयोगटातील बालकांसाठी उपरोक्तपणे दर्शविलेल्या सर्व कृती पूर्ण करून घेणे आजच्या काळाची गरज ठरली आहेत. म्हणूनच शासनाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे स्थान आणि उद्दिष्टे लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणाची शासनाने सुद्धा आखणी केली आहेत आणि ही आखणी आता यावर्षी 2024- 25 पासून सुरुवातही होणार आहे म्हणून आपण हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे.
२) पायाभूत स्तरावरील अभ्यासक्रम आराखडा पायरी क्रमांक दोन
नवीन शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे वयोगट वय वर्ष तीन ते आठ हा वयोगट महत्वाचा मानून या वयोगटाला 'पायाभूत स्तर' म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आली आहेत या पायाभूत स्तराप्रमाणे अभ्यासक्रमाचा आराखडा हा प्रारंभिक बाल्य अवस्था संगोपन आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये संस्थात्मक व्यवस्थेत या स्तराचा प्रामुख्याने विचार केलेला आहेत. शासनाने या अभ्यासक्रमावर विशेष लक्ष केंद्रित करून बालकाच्या घराबाहेरील म्हणजे कुटुंब, विस्तारित, कुटुंब शेजारी आणि समाज इत्यादी गोष्टीकडे सुद्धा विशेष प्रभावीपणे दुर्लक्ष कर न करता या गोष्टीकडे लक्ष देऊन बालकाच्या शिक्षणाबाबत सविस्तर विचार करून बालसंगोपन व शिक्षण या विषयावर महत्त्व दिले आहेत. म्हणून प्राथमिक स्तरावर विशिष्ट पैलूचा विचार या आराखड्यात करण्यात आला आहे.
३) राज्य अभ्यासक्रम आराखडा पायरी क्रमांक तीन
या पायरीमध्ये मुख्यता करून संपूर्ण समाजाच्या दीर्घकालीन विकासाचे धोरण डोळ्यासमोर ठेवून पायाभूत स्तर व या स्तराला अनन्य साधारण महत्व दिले आहेत आणि या वयोगटातील बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महत्वपूर्ण उद्दिष्ट अभ्यासक्रमात निश्चित केले आहेत. वय वर्ष तीन ते आठ वर्षे वयोगटाला नवीन वर्षापासून म्हणजे येत्या 2024 -25 या वर्षापर्यंत प्राथमिक बालसंगोपन आणि शिक्षण Bal Sangopan and Education In Marathi सहज उपलब्ध व्हावे म्हणून सुरक्षित गुणवत्ता पूर्वक आणि वैयक्तिक दृष्ट्या सुयोग्य वातावरण प्राप्त करून देण्याची जबाबदारी आता शासनाने घेतली आहे.
सारांश
बालकाचा जन्म कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही वातावरणात जन्म झाला असला तरी कोणत्याही परिस्थितीत त्या बालकाचे गुणवत्ता पुरवणी प्रार्थमिक बालसंगोपन ,शिक्षण व बालकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बाल संगोपन व शिक्षण याबाबत सविस्तर माहिती ही शैक्षणिक नवीन धोरणामध्ये सरकारने स्पष्टपणे मांडलेली आहे त्यानुसार बालकाला संपूर्ण आपल्या आयुष्यभर शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी व स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी सक्षम होण्यासाठी पायाभूत स्तरातील गुणवत्ता पूर्ण प्राथमिक बाल संगोपन आणि शिक्षण हे महत्त्वाचे असून त्याला सुजाण नागरिक ,नैतिक मूल्य ,विचारशक्ती, सुरजनशीलता ,सहानुभूती आणि उत्पादित माणूस म्हणून बनवण्याची संधी नवीन शैक्षणिक धोरणात शासनाने उपलब्ध करून दिली आहे. आपल्या देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी जगातील महासत्ता बनवण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार बालकाच्या प्रगतीसाठी नवीन शैक्षणिक धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्या स सुरुवात होणार आहे. बालकाच्या विकासात कुटुंब, बालक मंदिरे, शाळा ,समाज धोरण ,करते प्रशासक आणि शासन हे अतिशय महत्त्वाचे घटक आहे. या सर्व घटकांना आणि सर्व सदस्यांना एकत्र आणून पायाभूत स्तरावर बालकाला सुयोग्य पोषण देण्यासाठी आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला विशिष्ट प्रकारचे उत्तेजन देण्याची खात्रीलायक हमखास दर्शवणारी प्रारंभिक बालसंगोपन आणि शिक्षणामध्ये गुंतवणूक का करावी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तात्विक विवेचन हे या लेखांमध्ये स्पष्टपणे ब्लॉगरने ब्लॉक पोस्ट लिहिताना केलेले आहेत म्हणून ब्लॉगर ने या ब्लॉग पोस्टमध्ये बाल संगोपन व शिक्षण याबाबत सविस्तर माहिती या लेखातून देण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहेत. जर आपणास माझा हा लेख आवडल्यास नक्की आपण इतरांनाही वाचण्यासाठी शेअर करू शकता किंवा जर आपणास याबाबत काही त्रुटी आढळून आल्यास ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य टिपणी करा. आपली सूचना व त्रुटी योग्य असल्यास हमखास विचारात घेऊन लेखात दुरुस्ती करता येईल. एवढा हा ब्लॉग पोस्ट साठी ब्लोगर ने लिहिलेल्या लेखास आता पूर्णविराम देत आहे. धन्यवाद.
FAQ
१)00 ते 03 या वयोगटातील बालकाचे शिक्षण कोठे होते?
जन्मलेल्या कुटुंबात होते?
२)03 ते 06 वयोगटातील बालकाचे शिक्षण कोठे होते?
बालक मंदिर किंवा अंगणवाड्या.
३) वय वर्ष सहा ते आठ या वयोगटात मुलाचे शिक्षण कोणत्या वर्गात पूर्ण केले जाते?
इयत्ता पहिली व दुसरी मध्ये पूर्ण केले जाते.
४) बाल संगोपन व शिक्षण याबाबत किती विभाग तयार केले आहेत?
तीन विभाग तयार करण्यात आले आहेत.
५) बाल संगोपन व शिक्षण याबाबत शैक्षणिक आराखडा कोणत्या नावाने शासनाने प्रसिद्ध केला आहे?
राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण 2020 या नावाने प्रसिद्ध केला आहे.
मित्रांनो. अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख नक्की हमखास वाचा.