Type Here to Get Search Results !

इ. 5 वी व 8वी वार्षिक परीक्षा मराठी माहिती | Std.5 and 8 annual examination In Marathi Information

 इ. 5 वी व 8वी वार्षिक परीक्षा मराठी माहिती | Std.5 and 8 annual examination In Marathi Information 

प्रस्तावना

मित्रांनो ,Std.5 and 8 annual examination In Marathi Information  , इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा मराठी माहिती या विषयाबाबत सविस्तर माहिती या लेखातून पाहूया.

पुढील शैक्षणिक वर्षापासून 2024- 25 मध्ये इयत्ता पाचवी व आठवी साठी शासकीय स्तरावरून वार्षिक परीक्षा घेण्याचे ठरवण्यात आले आहे. बालकाच्या मोफत व शक्ती अधिनियम 2009 यामध्ये बदल करून वार्षिक परीक्षा घेण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहेत.

केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण 2020 मंजूर करण्यात आले असून भारतातील सर्व घटक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यासाठी वर्ष 2024 -25 इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी ची वार्षिक परीक्षा घेण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

Std.5 and 8 annual examination In Marathi Information
Std.5 and 8 annual examination In Marathi Information 


Std.5 and 8 annual examination In Marathi Information(toc)

वार्षिक परीक्षा धोरण

पुढील 2024-2057 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता आठवी व इयत्ता पाचवी ची आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत. आणि या वार्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या प्रकारची मूल्यमापन पद्धती असेल व कोणत्या प्रकारच्या उत्तर पत्रिका तसेच कोणत्या प्रकारची मूल्यमापन पद्धती असेल व त्याचबरोबर वार्षिक परीक्षेसाठी इयत्ता पाचवी आणि आठवी या विषयासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या विभागाने  योग्य मूल्यमापनासाठी आदर्शनमुना प्रश्नपत्रिका, आदर्श नमुना संविधान तक्ते आणि आदर्शनमुना उत्तर पत्रिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी पालक  शिक्षक आणि शैक्षणिक  संस्थेसाठी त्याचबरोबर सर्वांसाठी नमुना प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका आदर्श उत्तर पत्रिका तसेच आदर्श प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाच्या असतील याचे संपूर्ण मार्गदर्शन करून त्याबाबत पीडीएफ स्वरूपात नमुना आदर्श प्रश्नपत्रिका  , नमुना आदर्श संविधान तक्ते आणि नमुना आदर्श उत्तर पत्रिका इयत्ता पाचवी व आठवी साठी एस सी ई आर टी पुणे मार्फत पुढील वर्षाच्या 2024- 25 च्या वार्षिक परीक्षेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी बालकाच्या मोफत व सक्तीचा अधिनियम 2009 अन्वये शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2010 रोजी निर्गमित करून या हक्काच्या नियमानुसार व शासन निर्णयाच्या नियमानुसार सुधारणा करून मूल्यमापन प्रक्रिया निश्चित केली असून त्याबाबत सर्वांना माहिती प्राप्त व्हावी म्हणून इयत्ता पाचवी व आठवी विषयाच्या संदर्भात संपूर्ण मूल्यमापन पद्धती इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी ची वार्षिक परीक्षा घेण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.या लेखांमधून ब्लॉगर ने ब्लॉक पेज लिहिताना सर्व माहिती स्पष्ट स्वरूपात ' Std.5 and 8 annual examination In Marathi ' Information या लेखात स्पष्टपणे नमूद केली त्या संदर्भाने येथे माहितीचा अभ्यास आपण करत आहोत.मधून मी आपणास स्पष्ट करत आहेत.


Std.5 and 8 annual examination In Marathi Information शासकीय धोरण

भारत सरकारने देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे देशा त लागू करण्यात सुरुवात झाली आहे. तर महाराष्ट्र सरकारने देखील या नवीन धोरणास मंजुरी दिल्यामुळे येणाऱ्या येत्या जून 2024 या महिन्यापासून राज्यात सर्व माध्यमांच्या सर्वच शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे इयत्ता पाचवी आणि आठवी ची परीक्षा वार्षिक परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहेत. त्यामुळे राज्यात सर्वच शाळात धोरण लागू केले जाणार असल्याची माहिती शासनाने दिली आहेत.

सरकारने सध्या सुरू असलेल्या धोरणानुसार Std.5 and 8 annual examination In Marathi Information  इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करता येणार नसल्याचे धोरण आहे. परंतु आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे काही परवडणारे नसल्याने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इयत्ता पाचवी व आठवी ला वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. ज्यामध्ये गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास किंवा नापास करता येणार आहे. नापास न करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इयत्ता पाचवी व आठवीला परीक्षा घेण्याचे धोरण ठरवले आहे.

Std.5 and 8 annual examination In Marathi Information नापास झालेल्या फेरपरीक्षा

जर विद्यार्थी हा इयत्ता पाचवी व आठवी वर्गामध्ये वार्षिक परीक्षेला नापास झाल्यास, सदर विद्यार्थ्याला वार्षिक परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. हे महत्त्वाचे असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून गुणवत्ता वाढीसाठी योग्य धोरण शासनाने ठरवले आहे. वार्षिक परीक्षेचा निकाल लागताच नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा दोन महिन्याच्या आत निकाल जाहीर झाल्यापासून पुनर्परीक्षा इयत्ता आठवी आणि पाचवीची घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे प्रयत्न शासनाचे आहेत. परंतु प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नसल्याची तरतूद सुद्धा केलेली आहेत.


Std.5 and 8 annual examination In Marathi Information शासकीय धोरणाची क्रमवारी

"Std.5 and 8 annual examination In Marathi Information" इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी साठी वार्षिक परीक्षा त्यानंतर नापास झाल्यास पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी शासन स्तरावरून दिनांक 7 डिसेंबर 2023 नुसार अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सात डिसेंबर 2023 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयाची लिंक आपण या लेखात देत आहोत ती पुढील प्रमाणे आहेत. शासन निर्णय दिनांक 7 डिसेंबर 2023.इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी केलेले बदल दर्शक धोरणे खालील अधिनियमात स्पष्टही सुद्धा केले आहेत.

1) केंद्र सरकारच्या बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 महाराष्ट्रात हा अधिनियम 10 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आला आहे.

2) शासकीय धोरणात महत्त्वाचा एक शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2010 ला शासन निर्णय क्रमांक पीआर इ/2010/(136)10 प्राथमिक शिक्षण विभाग शासन निर्णय निर्गमित केला आहे.

3) बालकाच्या मोफत शक्ती अधिनियमात महाराष्ट्र शासनाने दिनांक 11 ऑक्टोबर 2011 महत्त्वाचे महत्त्वपूर्ण बदल केले आहे.

4) दिनांक 16 ऑक्टोबर 2018 रोजी शासन निर्णय क्रमांक सहा डी. एस./17/118/2017 याच दृष्टिकोनातून महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

5) दिनांक 11 जानेवारी 2019 ला बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमात सुधारणा 2019 ला सुद्धा करण्यात आली आहे.

6) बालकाच्या मोफत सक्ती अधिनियमात दिनांक 29 मे 2023 रोजी सुधारणा दर्शक शासन निर्णय निर्गमित करून काही कलमे दुरुस्त करण्यात आली आहे.

7) याच संदर्भाने दिनांक सात डिसेंबर 2023 रोजी शासन निर्णय क्रमांक/276 प्रक/2022-आरटीईएस निर्गमित करण्यात आला आहे

8) दिनांक 28 डिसेंबर 2023 ला एस सी ई आर टी मार्फत पत्र क्रमांक जावक क्रमांक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद ,पुणे/ मार्फत मूल्यमापन पाचवी आठवी/परीक्षा सूचना-2023/24/06297 हा सुद्धा शासन निर्णय महत्त्वपूर्ण निर्गमित केला आहे.

9) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी याच संदर्भाने पत्र क्रमांक जावक क्रमांक एस सी आर इ टी/वि. वाटप/आस्थापना-1/2/2023/0897 चे पत्र या संदर्भातच निर्गमित करण्यात आले आहेत

वरदर्शिवल्याप्रमाणे बालकाच्या मोफत शक्ती अधिनियमाच्या आधी सूचनेनुसार इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी मूल्यमापन पद्धती वर्ष 2023 - 24 पासून लागू करण्याच्या संदर्भात क्रमांक सात नुसार निश्चित केली असून नियमाची अंमलबजावणी राज्य नियंत्रक समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचबरोबर संदर्भ क्रमांक आठ नुसार सनियंत्रण समितीचे संपूर्ण वृत्तांत आणि सूचना तसेच संदर्भ क्रमांक सातच्या शासन निर्णयानुसार योग्य कार्यवाही करण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया स्पष्टपणे शासन निर्णयात दर्शविण्यात आली आहे. संदर्भ आठ महाराष्ट्र राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमातून संस्थांना इयत्ता आठवी आणि इयत्ता पाचवी साठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार आहेत. संदर्भ क्रमांक आठ व नऊ अन्वे शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळा स्तरावर तयार करण्यात याव्या असेही नमूद केले असल्याने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्याबाबत संपूर्ण शाळांनी हे सर्व शासन निर्णय अवगत करणे आवश्यक असून त्यानुसार सराव करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वेबस स्तरावर नमुना सराव प्रश्नपत्रिका संविधान मूल्यमापन तक्ते तयार करण्यात आले असून निर्गमित ही सुद्धा केले आहेत आणि याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या संस्थेने या उपरोक्त दर्शविलेल्या संदर्भ क्रमांक एक ते नऊ नुसार योग्य ती कार्यवाही संस्था स्तरावरून करण्यात यावी असे नमूद केले आहेत.

  मूल्यमापन प्रक्रिया

इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी च्या वार्षिक परीक्षा करिता एस सी ई आर टी, पुणे मार्फत आदर्श प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात ऍनिमल एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर तयार केले आहेत. याच्या लिंक पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत.

शासन निर्णय लिंक इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा बाबत  शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सारांश

उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून 2024 पासून 2025 पर्यंत इयत्ता पाचवी आणि आठवी ची वार्षिक परीक्षा घेऊन त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या शासन निर्णया बद्दल करून योग्य कार्यवाहीस्तव संपूर्ण महाराष्ट्रात ही माहिती शाळेंपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबवण्याचे निश्चित करून येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा तसेच पुनर्परीक्षा आयोजित करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची प्रक्रिया आणि गुणवत्ता टिकवण्याची प्रक्रिया राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. त्या संदर्भाने हा लेख ब्लोगर ने ब्लॉक पोस्ट साठी लिहिलेला आहेत. यामध्ये आपणास काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्यास ब्लोगरला कॉमेंट बॉक्स मध्ये त्वरित कळवावे म्हणजे पुढील प्रमाणे आवश्यक व योग्य बदल करण्यात येईल मित्रांनो आपणास हा लेख आवडल्यास इतरांनाही सुद्धा शेअर करा.

वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका लिंक


 इयत्ता पाचवी चे वार्षिक मूल्यमापन

        पीडीएफ प्रश्नपत्रिका


इयत्ता आठवीचे वार्षिक मूल्यमापन

        पीडीएफ प्रश्नपत्रिका

पाचवी वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका

वार्षिक परीक्षा


FAQ

1) शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये कोणत्या वर्गाची वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे?

इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी

2) नापास विद्यार्थ्यांना पुन्हा केव्हा परीक्षा केव्हा घेण्यात येणार आहे?

वार्षिक परीक्षेनंतर नापास झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत इयत्ता आठवी व पाचवी ची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे.

3) इयत्ता पाचवी आणि आठवीची परीक्षा घेण्याचा मुख्य उद्देश काय आहे?

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून शिक्षण प्रवाहात टिकून ठेवणे.

4) याबाबत शासन निर्णय केव्हा निर्गमित झाला आहे?

07 डिसेंबर 2023

5) कोणत्या धोरणामुळे परीक्षा घेण्यात येणार आहे?

नवीन शैक्षणिक धोरण आराखडा 2020 नुसार परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.

गोपनीय अहवालाबाबत सविस्तर मराठी माहिती


या माहितीसाठी आपण आमचा एज्युकेशन युट्युब चा व्हिडिओ नक्की हमखास पहा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation