Type Here to Get Search Results !

संत सेवालाल महाराज मराठी माहिती | Sant Sevaalaal Maharaj In Marathi Information


संत सेवालाल महाराज मराठी माहिती |Sant Sevaalaal Maharaj In Marathi Information


प्रस्तावना

मित्रांनो, आज आपण बंजारा समाजाचे धर्मगुरू किंवा '   ' संत सेवालाल महाराज मराठी माहिती ' 'Sant sevaalaal Maharaj In Marathi Information ' या विषयावर सविस्तर माहिती आपल्या लेखातून स्पष्टपणे नमूद करणार आहे. कारण या वर्षी सत्र 2024 या वर्षात आणि फेब्रुवारी महिन्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यावर्षी रोज गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी, 2024 मध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती असल्यामुळे हा लेख आपण संत सेवालाल महाराज बाबत सविस्तर माहिती या लेखातून लिहिणार आहोत.

| Sant Sevaalaal Maharaj In Marathi Information
| Sant Sevaalaal Maharaj In Marathi Information


Sant Sevaalaal Maharaj In Marathi Information(toc)

संत सेवालाल महाराज मराठी माहिती 

बंजारा समाजामध्ये एक महान शूरवीर समाज सुधारक आणि धर्माची शिकवण देणारे महान संत म्हणून भारतातील एक समाज सुधारक म्हणून संपूर्ण भारतभर त्यांना ओळखण्यात येते. बंजारा संस्कृतीचे अति प्राचीन क्षेत्रीय वंशाचे गोर बंजारा म्हणून प्रसिद्ध संत होऊन गेले. सेवालाल महाराज बंजारा समाजासाठी सद्गुरु म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण धर्माची शिकवण देणारे म्हणून भारतभर सर्वांना परिचित आहे. संत सेवालाल महाराज शूरवीर असल्यामुळे त्यांना "क्रांतिसिंह "अशी ही पदवी प्राप्त झाली होती. म्हणून आपण आज या लेखातून त्यांच्याबाबत संपूर्ण माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. " Sant Sevaalaal Maharaj In Marathi Information "

 

संत सेवालाल महाराज जन्म आणि जीवन परिचय

आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यातील गुठी या तालुक्यातील डोडी या गा गांवात संत धर्मगुरू क्रांती सिंह आणि एक महान संत यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 झाली सोमवारी बंजारा या समाजातील कुटुंबात जन्म झाला. संत सेवालाल महाराजांच्या जन्मानंतर डोडी या गांवाचे नांव बदलण्यात आले आहेत. कारण संत सेवालाल महाराज यांनी केलेल्या शिकवणीमुळे आता हे गांव सेवागड या नावाने ओळखले जाते. संत सेवालाल महाराज यांच्या वडीलाचे नाव भीमा नाईक(भीमसिंह नाईक) असे होते. बंजारा समाजामधील प्रमुख व्यक्तींना नाईक ही पदवी देण्यात आली आहे. तर त्यांच्या आईचे नाव धर्मळीमाता(धर्मणीमाता) असे होते. ज्या समाजात त्यांचा जन्म झाला तो समाज म्हणजे बंजारा समाज होय. हा समाज भारतभर वेगवेगळ्या गावी तांडे करून राहतात. बंजारा समाजातील वस्तीला तांडे असे म्हणतात. त्यांची बोलण्याची मुख्य भाषा बंजारा ही होती. बंजारा समाजाला भारतात गोरमाटी समाज म्हणूनही सुद्धा ओळखण्यात येतात. मात्र प्रमुख भाषा त्यांची बंजारा असून त्या भाषेची विशिष्ट लिपी कोणतीही नसल्यामुळे बंजारा भाषेचे रूपांतर मराठी भाषेत करून ग्रंथ लिहिले जातात. बंजारा समाजाला ( गौर समाज) म्हणून समाजाला जातो आणि हा समाज राजघराणे म्हणून समजला जातो. संत सेवालाल महाराज यांच्या अगोदर त्यांचा कोणताही पूर्व अधिकारी नव्हता मात्र  उत्तराधिकारी म्हणून संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचे काम रामराव महाराज यांनी केले. संत सेवालाल महाराज हे सामाजिक आणि धार्मिक सुधारणावादी प्रेरणादायक म्हणून बंजारा समाजाला आणि इतर समाजांना सुद्धा त्यांचे कार्य महान वाटले. त्यांनी अध्यात्म वादावर सर्वात महत्त्वाचे गावोगावी फिरून बंजारा भाषेतून प्रवचन केले. संपूर्ण बंजारा समाज हा त्यांना धर्मगुरू म्हणून मानतात. संत सेवालाल महाराज हे जगदंबेचे परम शिष्य होते अशी इतिहासात नोंद आढळते. संपूर्ण आयुष्यभर ते संत रामदास प्रमाणे ब्रह्मचारी राहिले. विवाह बंधनात कधीच अडकले नाही. भीमसिंह यांना बारा वर्षानंतर पुत्र प्राप्ती झाली. तेच जन्माला आलेले पुत्र म्हणजे संत सेवालाल महाराज हे भीमसिंह नाईक यांचे चिरंजीव होते. जगदंबेच्या कृपेने आपणास पुत्रप्राप्ती झाली म्हणून संत सेवालाल महाराज यांचे आई वडील जगदंबा मातेचे नियमित पूजन करत असे. बंजारा समाजातील भीमा नाईक हे अतिशय श्रीमंत होते. सात पिढ्या एकत्र बसून काम न करता आयुष्य आरामांमध्ये घरी बसून जीवन जगू शकत होते. संत सेवालाल महाराज यांना त्यांच्या आईने लहानपणापासूनच त्यांना शूरवीरांच्या गोष्टी तसेच संतांच्या गोष्टी ऐकवल्या त्यामुळे त्यांच्या लहानपणापासूनच त्यांची ओढ धार्मिकतेवर प्रेरणादायी स्थान म्हणून निर्मिती झाली.Sant Sevaalaal Maharaj In Marathi Information


बंजारा समाजाची संस्कृती

मुळातच बंजारा समाज अतिशय प्राचीन डोंगरदऱ्या खोऱ्यात आणि नदीच्या काठी वस्ती आणि तांडे निर्माण करून तेथे राहणारा समाज म्हणून आजही ओळखल्या जातो आणि त्याही काळात ओळखल्या गेला होता. भारताची सर्वात जुनी सिंधू संस्कृती सुसंस्कृत आणि प्राचीन संस्कृती बंजारा समाज यांनी मांडली. काही प्रदेशांमध्ये बंजारा समाज यांना लमानी या नावाने सुद्धा ओळखण्यात येते. पूर्वीच्या काळी लमानी म्हणूनच ओळखले गेले. बंजारा समाजाचा सिंधू संस्कृतीची वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखण्यात येणारा हा समाज आहे. " Sant Sevaalaal Maharaj In Marathi Information "

वेगवेगळ्या प्रदेशातील ओळखण्यात येणाऱ्या बंजारा समाज

महाराष्ट्र राज्यामध्ये या समाजाला बंजारा समाज असे म्हणतात. कर्नाटक राज्यांमध्ये या समाजाला लमानी समाजाचे म्हणतात. आंध्र प्रदेशामध्ये या समाजाला तल्लडा म्हणून ओळखण्यात येते. पंजाबी या राज्यांमध्ये बाजीगर या नावाने हा समाज ओळखण्यात येतो. उत्तर प्रदेश मध्ये नाईक समाज म्हणून ओळखण्यात येतो.


संत सेवालाल महाराज कार्यात्मक माहिती

लहानपणापासूनच धार्मिकतेचे धडे घेऊन समाजामध्ये आपल्या हातातून समाज सुधारणा करण्याच्या उद्देशाने त्यांनी समाज सुधारणेवर सुरुवातीला भर दिला. समाजामधील समाज सुधारणात्मक कार्य हे त्यांनी केवळ बंजारा समाजासाठीच केले नाही तर संपूर्ण भारतातील मानव जातीसाठी समाज सुधारणा चे कार्य हाती घेऊन समाजातील अंधश्रद्धा आणि रुढी याबाबत मोलाचे कार्य केले आहे. म्हणूनच संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजातील युगपुरुष म्हणून मानवतावादी, उदारमतवादी आणि पुरोगामी विचार यांच्या साह्याने त्यांनी प्रतिगामी विचारावर विजय मिळवला. समाज सुधारण्यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहेत. " Sant Sevaalaal Maharaj In Marathi Information "

बंजारा समाजाचा व्यवसाय

बंजारा समाज यांचा मुख्य व्यवसाय पूर्वी राजे आणि राजगणारे यांना धान्य पुरवठा करण्याचे काम करीत होते. या समाजाचा प्रमुख व्यवसाय म्हणजे बैलगाडीने किंवा बैलाच्या पाठीवर धान्याच्या पोती किंवा गोणी वाहण्याचा होता. भीमा नाईक यांना चार पुत्र होते. या चार पुत्रा पैकी संत सेवालाल महाराज हे मोठे पुत्र होते. याचाच अर्थ त्यांना आणखीन तीन लहान भाऊ होते. व्यवसायाच्या निमित्ताने पूर्वीपासून हा समाज जगभर भटकत राहिला आणि जगातील सर्व गोष्टीचे निरीक्षण करून कोठे कोणते धान्य पुरवठा करायचे हे त्यांना समजत असल्यामुळे समाजातील अनेक लोक बंजारा समाज यांच्या व्यवसायावर आधारित त्यांच्याकडून धान्य घेत असत. म्हणूनच मुळात व्यवसाय धान्य पुरवठा करण्याचा हा मुख्य व्यवसाय बनला. परंतु संत सेवालाल महाराज यांनी या व्यवसायाकडे लक्ष न देता संपूर्ण भारतभर समाज समाज सुधारणा करण्याचे उद्दिष्ट यांचा संकल्प करून थोर समाज सुधारक ठरले. त्यांनी बंजारा आणि इतरही समाजात अनेक ठिकाणी सुधारणा केल्या आहेत. जन्मभर ते वैराग्याप्रमाणे आजन्म अविवाहित राहून समाजसुधारणा करण्याचे हेतू डोळ्यासमोर ठेवून सतत अहो रात्र कार्य करत राहिले. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले.संत सेवालाल महाराज यांनी अनेक परंपरा आणि महाराष्ट्र भर भव्य संस्कृतीचे दर्शन जगभर गळून बंजारा समाजाला आपल्या प्रवचनातून सुधारण्याचा मार्ग दाखवला आणि समाजात सुधारणा घडून आणल्या. त्यांनी वैराग्य पत्करल्यामुळे बंजारा समाजाचा पेहराव आणि बंजारा भाषा चा प्रचार भारतभर केला आणि बंजारा भाषा टिकून ठेवली. आजही आपणास बंजारा समाजाचा वेगळाच पेहराव दिसून येतो. बंजारा समाजाची आणि सर्व समाजाची ते चिंता करत असत. संत सेवालाल महाराज यांचे सेवेचे कार्य कल्याणकारी विचार स्थापना करणारे होते. आपल्या समाज प्रबोधनातून आणि अध्यात्मिक कार्यातून समाजाला नवीन दिशा देण्याची कार्य त्यांनी केले. त्यांनी फार पूर्वी भविष्यवाणी जी केली होती ती भविष्यवाणी त्याप्रमाणेच आज खरी ठरत आहे. बंजारा समाजाच्या लोकसाहित्यातून त्यांच्या शौर्य गाथेचा इतिहास आजही महत्त्वाचा ठरला. बंजारा समाज हा खरोखर अतिशय शौर्यशाली समाज आहे. आणि त्यांची शौर्यगाथा इतिहासात उल्लेखनीय आहेत.Sant Sevaalaal Maharaj In Marathi Information

संत सेवालाल महाराजांचे शिकवण युक्त कार्य

मुळातच हा समाज जंगलात  असल्यामुळे जंगलपरंपरेची ओळख खऱ्या अर्थाने या समाजाने जवळून पाहिली आहे म्हणून याबाबत संत सेवालाल महाराज यांनी शिकवण देताना काही महत्त्वाची मार्गदर्शनपर शिकवण दिली आहेत.जंगलाचे रक्षण केले पाहिजे.जंगलाच्या रक्षणाबरोबर पर्यावरणाचे ही सुद्धा रक्षण करा.समाजामध्ये भेदाभेद करू नका.समाजातील सर्वच लोकांना समानता युक्त वातावरण निर्मिती करून द्या.सर्वांनीच समानतेने आपले आयुष्य जगवा.इतरां बद्दल वाईट विचार मनात आणू नका.इतरांबद्दल आदरतेने वागा.कोणत्याही समाजाला इजा करू नका.भारतीय स्त्रियांचा सन्मान करा.देवाने आपणास जन्म दिला आहे म्हणून काळजी करू नका तुमचा पालन पोषण करता तोच आहे. तोच म्हणजे देव होय.मानवावर संकटे येतच असतात संकटांना निर्भयतेने तोंड द्या.आपले आयुष्य धैर्यवान बनवा.धैर्यवान आणि शौर्यवान होण्यासाठी व्यायामाकडे लक्ष द्या.स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने जीवन जगा.पृथ्वीवरील पाण्याचे रक्षण करा प्रत्येक पाण्याच्या थेंबा मध्ये मानवी जीवन कसे महत्वाची असते हे स्पष्ट करत असत. पाणी विकण्यास गुंतू नका आणि पाणी विकण्याचे पाप करू नका. पाणी हे निसर्गाची अमोल देणगी मानवाला मिळाली असल्यामुळे तिचा काटकसरीने वापर करा.तहानलेल्या माणसाला एक तांब्याभर पाणी द्या.भुकेल्या माणसाला थोडे अन्न द्या.समाजातील वडीलधाऱ्या माणसांचा आदर करालहान थोर व्यक्तीचा आदर करणे आवश्यक शाका.भारतातील सर्व पुरुष आपले बांधव आहेत त्यांच्यावर प्रेम करण्याचे शिका.जंगलातील प्राण्यांचा आदर करा.पर्यावरणाचे रक्षण करा.आपणास अध्यात्म प्राप्त करण्यासाठी आणि जीवन सुखी करण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष द्या व भरपूर अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपल्या ज्ञानाच्या आधारे इतरांना सुद्धा ते ज्ञान प्राप्त करून द्या. माणसातील माणुसकी वर माणूस अवलंबून असतो म्हणून त्याची माणुसकी जवळून अभ्यास करून त्याच्या माणुसकीवर आधारित प्रेम करा. आयुष्यातील तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानातील तर्क यांचा अंदाज बांधून समोरील भविष्य ओळखून वर्तमान काळात जगा. अंधश्रद्धेपासून दूर राहा. शक्यतो अंधश्रद्धा 100% दूर केली पाहिजे असे त्यांचे मत होते म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे सुद्धा कार्य हाती घेतले. आपल्या समाजातील सर्व बांधव आपले बांधवच आहे व त्यांच्यामध्ये बंधुत्व निर्माण करा आणि समतेने वागा. गांधीजी प्रमाणे समता बंधुता आणि तत्त्वज्ञान याकडे विशेष लक्ष द्या .असे त्यांचे मत होते व ते त्यांनी आपल्या प्रबोधन कार्यातून जगासमोर मांडले. प्रत्येकाने धैर्यवान बनले पाहिजे त्यासाठी शिस्त बाळगा.मानवाने नेहमी चिंतनशील राहून अंधकारात सापडलेल्या बंधूंना अंधकारातून बाहेर काढा. आपल्या संतांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे समाजाला मार्ग दाखवणारे आजीवन भूमिका त्यांनी त्यांच्या प्रबोधनातून लोकांना शिकवण दिली. त्यामुळे संत सेवालाल महाराज हे मानवतावादी संत होते. दूरदृष्टी दाखवणारे कल्याणकारी मार्गाचे रक्षण करते म्हणून संपूर्ण भारताला दिलेला संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. धर्माच्या रक्षणासाठी शूरवीर पणे त्यांनी विरुद्ध लढाई सुद्धा दिला आहेत. भारतीय साठी त्यांनी एक शौर्यगाथाच निर्माण केली आहे. त्यांची प्रत्येक भूमिका ही समाजसुधारणा साठीच होती. त्यांनी आयुष्यभर स्वतःचा विचार न करता आपल्या मानव जातीच्या कल्याणाचे दर्शन बंजारा समाजाला तसेच इतर समाजाला दर्शन घडवले.खोटे बोलू नका आणि प्रामाणिक रहा.लोभ आणि भौतिक लैंगिक छडा दाखवा.विषारी पदार्थाचे सेवन करू नका.मद्यपान करू नका.अवैद्य संबंधात गुंतवू नका. आणि कुणाला गुंतूही देऊ नका. अभ्यास करून भरपूर ज्ञान मिळवा. आणि इतरांनाही द्या. आधुनिक जीवनशैली शारीरिक कृती आणू नका. विनाकारण कुणाला आम्हीच दाखवू नका. कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या.सहकारी मित्रांबरोबर मित्र प्रेम दाखवा.आपल्या संस्कृतीचे आणि भाषेचे तसेच पेरावाचे रक्षण करा. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू नका. स्वतःची काळजी घ्या आणि समाजाची ही काळजी घ्या. निसर्गाशी संबंधित असणारे सर्व सणसमारंभ साजरे करा. नैसर्गिक प्राप्त असणाऱ्या वस्तू मर्यादित आहेत त्याला आणखीन मर्यादित करू नका. नैसर्गिक वस्तूचे जतन करा. एक महान चिंतनशाली विरुद्ध लढाई देणारे आणि मानवतेचा धर्म आणि शिस्त सांगून सदसद विवेक बुद्धीने आपल्या बुद्धीनुसार मानवाचे कल्याण करणारे महान थोर संत म्हणजे संत सेवालाल महाराज होय.

संत सेवालाल महाराज यांचे काही वचने 

कोई किनी भजो पूजो मत   ||

रपीयि कटोरे पांळी बक जाय   ||

कसाईन गावढी मत वचो   ||

जिवती धंणीरो बीर घरेम मत लावजो   ||

चोरी लबाडीरो धन घरेम  मत लावजो   ||

केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो  ||

जआणंजओ छाणंजो पछच माणजो  ||

ये जो वातेर पत मै तेरा रकाडीय वोन पाने तारलीयुंव  ||

 मराठी माहिती  वचनाचा भावार्थ

संत सेवालाल महाराज यांचे वरील वचन हे अतिशय महत्त्वाचे असून या   पुढील प्रमाणे या लेखात स्पष्ट करत आहे.


हा भावार्थ क्रमशः ओळीनुसार क्रमशा देण्यात आला आहे

कोणाची पूजा अर्चा करू नका देव मंदिरात नाही देव माणसात आहे.

एका रुपयाला एक वाटी पाणी विकेल

खाटीक ला गाय विकू नका. पशु प्राण्यावर प्रेम करा.

जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका.

चोरी करून खोटे बोलून पैसे कमवू नका किंवा तसा पैसा घरात आणू नका.

कोणाची निंदा चाडी चुकली लावू नका.

जाणून घ्या विचारमंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा.

ह्या गोष्टीचा जो कोणी आदर करेल, आचरणात आणले स्वीकार करेल.

मी त्याचा रक्षण करेल, पाना आड पान मी त्याला तारेल


शेवटचा श्वास

संत सेवालाल महाराज यांनी शेवटचा श्वास म्हणजे निधन रुईखेड येथे झाले. त्यांनी आपल्या जीवनातील अखेरचा शेवट चा श्वास 4 डिसेंबर 1773 सोडला. त्यांची समाधी महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे बांधण्यात आलेली आहे. जन्म आंध्र प्रदेश मध्ये तर अंत महाराष्ट्रात म्हणजे देशभर आपल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला व शेवटचा श्वास सोडला.

सेवालाल महाराज जयंती.

मित्रांनो, यावर्षी 15 फेब्रुवारी 2024 रोजी महान मानवतावादी मानवाचे कल्याण करणारे आणि मानवता धर्म निर्माण करणारे तसेच पर्यावरण रक्षण करणारे गोरक्षाचा संदेश देऊन धर्माचे रक्षण करणारे निजामशाही विरुद्ध लढा देणारे बंजारा समाजातील थोर समाज सुधारक संत सेवालाल महाराज यांच्या वाणीतून आणि वाणीतील प्रवाहातून समाज सुधारण्याचा आग्रह धरणारे संत सेवालाल महाराज यांची जयंती महाराष्ट्र आणि तेलंगणा येथे साजरी करण्यात येते.

सारांश

भारत हा संत आणि महंत यांना जन्म देणारा देश असून भारत भूमी पावन करणारे अनेक धर्मपंथ आणि अनेक जातीपथातून मानवतेचे रक्षण करणारे महान पुरुष यांनी भारतात जन्म घेतला. आणि समाजामधील वाईट अंधश्रद्धा आणि परंपरा तसेच जातीय निर्मूलन यासाठी प्रयत्न करणारे खरे संत भारतात होऊन गेले आहेत. म्हणून आपण आज आपल्या लेखातून संत सेवालाल महाराज बंजारा समाजाचे धर्मगुरू व महान प्रचारक पुरोगामी विचाराचे प्रचारक याबाबत या लेखातून माहिती नमूद करण्यात आली आहेत. या माहितीच्या संबंधात जर आणखी काही सुधारणा करायची असल्यास लेखकास जरूर सूचना करा.  आवश्यक माहितीत बदल करण्यात येईल. अशा महान थोर संत सेवालाल महाराज यांच्या कार्याला सलाम करून आजच्या लेखात पूर्णविराम देत आहे.

FAQ

1) संत सेवालाल महाराज कोणत्या समाजाचे धर्मगुरू म्हणून जयंती साजरी केली जाते?

बंजारा समाजाचे धर्मगुरू.

2) संत सेवालाल महाराज यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला.

आंध्र प्रदेश या राज्यात झाला. (15 फेब्रुवारी 1739)

3) संत सेवालाल महाराज यांच्या वडीलाचे नाव सांगा.

भीमा नाईक किंवा भिमसिंग नाईक

4) संत सेवालाल महाराज यांनी कोणत्या भाषेतून समाज प्रबोधन केले?

बंजारा भाषेतून.

5) संत सेवालाल महाराज यांची समाधी कोठे आहे?

महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे त्यांची समाधी आहे.(04 डिसेंबर 1806)


अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख वाचू शकता.


संत शिरोमणी रोहिदास मराठी माहिती 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation