छत्रपती शिवाजी महाराज मराठी माहिती | Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi
प्रस्तावना
नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात जाणता राजा, कुलभूषण, कुलवंत ' छत्रपती शिवाजी महाराज मराठी माहिती ' ' Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi 'यांच्या संपूर्ण जीवन कार्याबद्दल सविस्तर माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करू या. छत्रपती शिवाजी महाराज हे एक मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील एक महान राजे म्हणून महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासात अजरामर झाले. त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित सविस्तर माहिती या लेखातून आज आपण लिहिणार आहोत. " Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi "
छत्रपती शिवाजी महाराज मराठी माहिती Chhatrapati Shivaji Maharaj Marathi information
![]() |
Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi |
Chhatrapati Shivaji Maharaj Marathi information(toc)
भोसले घराण्याची कौटुंबिक माहिती
राष्ट्रमाता जिजाबाई यांचा विवाह लखुजी जाधव यांची कन्या जिजाबाई यांचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये दौलताबाद येथे झाला. जिजाबाई यांच्या वडीलाचे नाव लखुजी जाधव होते व आईचे नाव माळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टी यासाठी ओळखल्या जात होत्या त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशलतेने तलवार सुद्धा चालू शकत होत्या. लहानपणापासूनच शूरवीर चे धडे त्यांनी आपल्या वडिलांकडून संपादन केले. जिजाबाई चे माहेर म्हणून सिंदखेड राजा प्रसिद्ध आहेत. जिजामाता आणि शहाजी यांचा हा विवाह शूरवीर मराठा कुळात संपन्न झाला. यांच्या विवाह संबंधातून त्यांना एक मुलगा जन्माला आला आणि तोच मुलगा म्हणजे " छत्रपती शिवाजी महाराज होय." "Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi "
शिवाजी राजे यांचे वडील शहाजीराजे हे शूरवीर होते. शहाजी हे प्रथम निजामशाहीच्या पदरी एक सरदार म्हणून अहमदनगर येथे होते. निजामशाहीच्या दरबारात प्रभावी वजीर म्हणून मलिक अंबर नावाचा पण शूरवीर होता. या अहमदनगर च्या निजामशाही वर मोगल सम्राट शहाजनच्या सैन्याने सन 1636 मध्ये अहमदनगर येथे चालू करून मोठे युद्ध केले. मलिक अंबर ह्या निजामशाहीच्या प्रभावी वजीराच्या मृत्यूनंतर ही लढाई घडून आली. या लढाईमध्ये मोगल सम्राट शहाजन यांचा विजय होऊन अहमदनगर शहर त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे यांना विजयपूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू करून घेतलं. आदिलशहाने शहाजीराजे यांच्याकडे पुण्याची जागीरदारी बहाल केली. त्याच वेळेस शहाजीराजे भोसले यांचा दुसरा विवाह तुकाबाई यांच्याशी झाला. त्यामुळे जिजाबाई यांनी लहान बाल शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्यात राहायला आल्या. शहाजीराजे यांचा दुसरा मुलगा म्हणजे तुका बाई यांचा सख्खा मुलगा व्यंकोजी भोसले हा तुकाबाई व शहाजी राजां सोबत राहिला आणि पुढे याच एकोजी भोसले किंवा व्यंकोजी भोसले ह्या पुत्राने आपल्या सामर्थ्याच्या बळावर तंजावर येथे मोठे साम्राज्य निर्माण केले त्यालाच आता आपण सध्या तामिळनाडू असे म्हणतो.
छत्रपती शिवाजी महाराज जन्म कथा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म वेगवेगळ्या बखरकारांनी बखर लिहीत असताना दोन जन्म तिथि दर्शविल्या आहेत.शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीय शेके पंधराशे 51 म्हणजेच 16 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. तर एका बखर मध्ये अशी नोंद दिसून येते की, शिवरायांचा जन्म बखरीमध्ये व शकावलीनुसार 1627 किंवा 1630 ठरवण्यात आली असून जन्मा बाबत दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. एका जुन्या बखरकारांच्या मते शिवाजी महाराजांचा जन्म 1627 मध्ये झाला असून ही जन्म तिथी मान्य करणारा एक प्रवाह आजही सुद्धा अस्तित्वात आहे. तर नवीन बखरकारांच्या मते शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये झाला असा मतप्रवाह निर्माण होऊन ही जन्म तिथी सुद्धा आजही एक समाजात प्रवाह मानणारा अस्तित्वात आहे. इतिहासात उपलब्ध असलेली सभासद बखर एक आहेत त्यामध्ये तर जन्मतारखेची कोठेच नोंद करण्यात आली नाही.51 कलमी बखर मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म वैशाख मास शुद्ध चार चंद्रावरी 1959 अशी ही नोंद आढळून येते. त्यामुळे नेमके 1959 किंवा 1949/1951 असे विविध मतप्रवाह जन्माची कथा सांगतात. चिटणीस बखर मध्ये शेके 1959 वैशाख शुद्ध दोन गुरुवार ला जन्म झाला अशी नोंद दिसून येते. इतिहासात शिवाजीच्या जन्माविषयी अनेक बखरकारांनी अनेक तिथी दर्शविल्या आहेत. परंतु आज आपण आपल्या शासनाने मान्य केलेली जन्म तिथि ग्राह्य धरली आहेत.शिवाजी महाराजांची शासनमान्य जन्म तिथि इंग्रजी तारखेप्रमाणे किंवा कॅलेंडर प्रमाणे 19 फेब्रुवारी मान्य केली असून महाराष्ट्र शासनाने याबाबत सार्वजनिक सुट्टी ही दरवर्षी 19 फेब्रुवारी ला देण्यात येते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे जन्मतारीख 19 फेब्रुवारी 2024 ला सोमवारी येत असून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी सुद्धा शासनाने जाहीर केलेली आहेत. यावर्षी मराठी कॅलेंडर प्रमाणे माग शुद्ध दशमी सौर वसंत ऋतु शेके 1945 या दिवशी येत आहे. आणि शासनातर्फे याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात यावर्षी येणार आहे. जन्म वर्ष सुद्धा दोन वेगळे नोंदवण्यात आले 1627आणि1630. जन्म दिनांक वाद न घालता शिवाजी महाराजांचे कार्य पाहणे महत्त्वाचे आहेत. Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi
शिवाजी महाराजांचे बालपण बाबत सविस्तर माहिती
मराठी राज्याचे संस्थापक शिवराय यांचा जन्म शासनमान्य तिथीनुसार 19 फेब्रुवारी 1630 ला मान्य केला असून त्याप्रमाणे त्याच जन्म तिथिला इतिहासात महत्त्व प्राप्त झाले आहेत. शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. लहानपणापासूनच त्यांना राष्ट्रमाता जिजामाता म्हणजेच जिजाबाई यांनी शिवाजी यांना धार्मिक रामायण आणि महाभारत या विषयातील अनेक कथा. मुळातच जिजाबाई यांचा स्वभाव धार्मिक वृत्तीचा असल्यामुळे धार्मिकतेचे धडे ही बाल शिवाजी वर बिंबवण्यात आले. महाभारतातील आणि रामायणातील शूरवीर युद्धकर्त्यांच्या कथाही जिजाबाई यांनी शिवाजी यांना सांगून त्यांना धार्मिक आणि शूरवीर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले. छत्रपती शिवाजी हे धार्मिक तर झालेच पण शूरवीर आणि अत्यंत शूरवीर राज्यकर्ता म्हणून शिवाजीला घडवले. शिवाजी राजे यांनी आपल्या मातेकडून असंख्य विषयावर खूप कथा ऐकल्या आणि सर्व कथा ऐकल्यानंतर शिवरायावर त्या कथेंचा प्रभाव पडला आणि या प्रभावातूनच नवचैतन्य जागृत करत एक महान स्वप्न डोळ्यासमोर ठेवून शिवराय बालपणापासून कार्य करू लागले. त्यांचा जन्म ज्या वर्षात झाला त्या वर्षांमध्ये भारतावर मुस्लिम शासकांची सत्ता असल्यामुळे मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या तसेच महाराष्ट्रावरही अनेक स्वाऱ्या केल्या अक्षरशः झालेल्या अनेक मुस्लिम सत्तेकडून आक्रमणात भरपूर अशी लूट झाली व धार्मिक भावना यांची मुस्लिम राज्यकर्त्याकडून विटंबना होऊ लागली. त्याबाबत काही सुद्धा सर्व इतिहासात जाधव घराण्याच्या कन्येने म्हणजेच लखोजीराव जाधव यांच्या कन्या जिजाई यांनी मुस्लिमाचा होणारा अत्याचार बाल शिवाजी यांच्या मनावर बिंबवण्यात येऊन शिवाजी वर फार मोठा प्रभाव जर घडवण्यामध्ये कोणाचा झाला असेल तर तो प्रथम त्यांच्या माता जिजामाता यांचाच प्रभाव पडला. व शिवाजी राजे त्यातून घडले. बाल शिवाजीचे वडील शहाजी भोसले यांनी शिवराय लहान असतानाच त्यांना व जिजाबाई यांना दादाजी कोंडदेव यांच्या जवळ सोडून दिले. कारण ते आदिलशहाच्या दरबारी एक सैनिक म्हणून कार्य करत होते तेथे निघून गेले. जिजाबाई ने बाल शिवाजी ला स्वतःजवळ घेऊन पुणे येथे राहण्यास आल्या. त्यावेळी पुण्याची परिस्थिती व अवस्था पाहता अत्यंत दूर व्यवस्था झाली होती. पुणे येथे राहायला आल्यानंतर छोटा शिवाजी राजा आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात शेतकरी म्हणून प्रतिका दाखल सोन्याचा मुलाम्याचा नागर फिरवून, जिजाबाई नी दादोजी कोंडदेवच्या मदतीने पुण्याची पुनर्वसन स्थापना करण्यास सुरुवात केली. हळूहळू शिवाजी राजे लहानाचे मोठे होत असताना त्यांना मोठे झाल्यावर तुला काय करायचे आहे? याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन खंबीरपणे जिजाबाईंनी शिवाजीला मार्गदर्शन केले. शिवाजी राजे यांचे आद्य ग्रुप कोण असेल तर त्यांच्या माताच त्यांच्या आद्य गुरु ठरल्या. आणि इतर बाबतीतील सर्व प्रशिक्षण आणि शिक्षण आणि युद्धाचे डावपेच ,कला आणि सैनिकाचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी त्यांना दिले आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवाजी महाराजांना स्फूर्तीदायक स्फूर्ती राष्ट्रमाता जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांनी दिली.
शिवाजी महाराजांनी दादाजी कोंडदेव यांना आपले गुरु मानले.शिवाजी महाराजांचे गुरु दादाजी कोंडदेव यांनी बाल शिवाजी यांना युद्ध कला, युद्धाचे प्रसंग शत्रु वर वार कसा करावा, गनिमी कावा, घोडेस्वार, तलवारबाजी आणि नेमबाजी त्याचबरोबर आदर्श राजनैतिकतेचे धडे दिले आणि कुशल प्रशासक निर्माण करण्याची संपूर्ण कलागुणासह त्यांना मार्गदर्शन करून मराठ्याचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे खरे बळ जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांनीच दिले. त्यामुळे ते कुशल प्रशासक शूरवीर बनले. बाल शिवाजीने स्वतःच्या डोळ्याने मुस्लिम शासकाने भारतीयावर होत असलेली आक्रमणे आणि लूट आणि धार्मिक सक्ती बाबतचे चित्र पाहून वयाच्या सोळाव्या मराठ्याचे साम्राज्य निर्माण करण्याचा किंवा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी तो पूर्ण केला.
Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi
शिवरायांचा प्रथम विवाह सोहळा
बाळ शिवाजी लहान असतानाच त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचा प्रथम लग्न सोहळा प्रथमच संपन्न झाला. हा बालविवाच मानण्यात येतो. वयाच्या दहाव्या वर्षी 14 मे 1640 रोजी शिवाजी महाराजांचे लग्न लाल महल पुणे येथे सईबाई यांच्याशी झाले. शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी चे पूर्ण नाव माहेरचे सईबाई निंबाळकर असे होते.
इतिहासात असे मानले आहे की शिवाजी महाराज यांना आठ पत्नी होत्या. त्या आठ पत्नीचे नाव पुढील प्रमाणे इतिहासात नमूद केलेले येथे लेखात स्पष्ट करत आहे.पहिली पत्नी सईबाई,दुसरी पत्नी सोयराबाई,तिसरी पत्नी पुतळाबाई,चौथीपत्नी काशीबाई,पाचवी पत्नी सकवार बाई,सहावी पत्नी लक्ष्मीबाई,सातवी पत्नी सगुनाबाई,आठवी पत्नी गुणवंतीबाई
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य
बाल शिवाजी राजे यांनी आपले कार्य वयाच्या सोळाव्या वर्षापासून सुरू केले. कुठे आहे बाल शिवाजी वर हिंदू आणि मराठा साम्राज्यांना पुढे नेण्याची जबाबदारी क्रमाक्रमाने हळूहळू त्यांच्यावर येऊन पडली. जबाबदारी मुळे शिवाजी महाराजांची शक्ती आणि बुद्धिमत्ता दोन्ही गोष्टींमध्ये अतिशय तल्लक आणि ती क्षण असल्यामुळे प्रत्येक गोष्ट नियोजनाने पूर्ण करण्याचा निर्धार करून मराठ्याचे साम्राज्य स्थापन करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली. शिवाजी राजे यांनी वयाच्या सतराव्या वर्षी महत्त्वपूर्ण पहिली लढाईमध्ये भाग घेतला. त्यांच्या जीवनातील पहिली लढाई ही वयाच्या 17 व्या 1646 यावर्षी मुरला अहमद यांच्याबरोबर केली. आणि लढाई जिंकून त्यांनी अतिशय महत्त्वाचे किल्ले ही जिंकले. या लढाईत त्यांनी कोंडणा, तोरणा, चाकण, ठाणे, भिवंडी आणि कल्याण यासारखे बलाढ्य किल्ले स्वतः आपल्या ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. जणू काहीही स्वराज्याची एक नांदीच ठरली. शिवाजी महाराजांनी हे कार्य बालपणीच केल्यामुळे आदिलशहाच्या साम्राज्यात शिवाजीच्या पराक्रमाबद्दल फार मोठी खळबळ उडाली. शिवाजीच्या या पराक्रमाची आणि शक्तीची ताकद पाहून आदिलशाही देखील घाबरला.परंतु परिस्थिती अशी होती. छत्रपती शिवाजी राजे यांचे वडील शहाजी भोसले हे आदिलशाहीच्या लष्कर प्रमुख असल्याने आदिलशहाने शहाजी यांना बंदी बनवले होते. हा संपूर्ण प्रकार घडून आल्यानंतर शिवाजी राजे यांनी प्रथम काही अनेक वर्ष आदिलशाही युद्ध केले नाहीत. आदिलशहाची लढा देणे शिवाजी राजांना म्हणावे तेवढे सोपे नव्हते त्यामुळे त्यांनी प्रथम आपले सैनिक बळकट केले. प्रचंड दर्या खोऱ्यातील मावळे आणि देशमुखांना आपल्या आपल्या सैनिकात त्यांच्या बाजूने प्रचंड बळ वाढवण्यासाठी सैन्यात समावेश केला. हळूहळू शिवाजीचे सैन्य वाढत गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी डोंगरदऱ्यातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना आपल्या सैनिकात समावेश करून घेतला. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी मनाची पूर्ण तयारी केली. सैन्य वाढत गेल्यानंतर छत्रपती शिवाजीराजे यांनी आपल्या सैन्याचे दोन गट केले किंवा सैन्य दोन गटात विभागणी केली.
सैनिकांची दोन गटात विभागणी
छत्रपती शिवाजी राजे यांनी मुघलांशी प्रचंड शक्तीने लढा देण्यासाठी तसेच आदिलशहांशी विरोध करण्यासाठी आणि लढा देण्यासाठी सैनिकाचे दोन भागात वर्गीकरण करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळ असलेले जिवाभावाचे सर्व सैनिक पुढील प्रमाणे विभागणी केली.
एक घोडदळ
घोडदळ म्हणजे घोड्यावर बसून लढाई करणारे एकदल होय. घोड्यावरूनच लढाई करावी आणि ती कशी करावी त्याबाबतही संपूर्ण शिवाजी राजे यांनी त्यांच्या सैनिकांना कुशल बनवले. घोडदलाचे कमांड म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी या विभागाचा प्रमुख म्हणून संपूर्ण नेतृत्व करण्याची जबाबदारी नेताजी पालकर यांच्या हातात दिली. व नेताजी पालकर यांना घोडदलाचे प्रमुख कमांड ही पदवी दिली.
पयदल
पयदल म्हणजे जमिनीवरून लढाई करणारे सैनिकाचे दल म्हणजे पयदल होईल. शत्रुशी जमिनीवर युद्ध करताना संपूर्ण युद्धाचे डावपेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी या दलांनाही सुद्धा संपूर्ण प्रशिक्षण देऊन परिपूर्ण बनवले . सैनिकांमध्ये परिपक्वता आल्यानंतर पयदल या सैनिकाच्या तुकडीचे शिवाजी राजे यांनी प्रमुख येसाजी कंक यांच्याकडे दिले.
वरील प्रमाणे सैनिकांची वर्गीकरण किंवा विभागणी आजच्या आधुनिक काळापेक्षाही वेगळी असे रूप असणारी कर्तव्यदक्ष सैनिक निर्मिती असणे गरजेचे असल्यामुळे शिवाजी राजे यांनी त्यांना सैनिकांचे गुण पाहून नेतृत्व प्रदान करत राहिले.
शिवाजी राजांच्या साम्राज्यात आता जवळजवळ त्यांच्या सैनिकाने अनेक लढाया करून आपल्या साम्राज्यास एकूण 40 किल्ले जिंकण्याचे पराक्रम युक्त कार्यक्रम करून हे सर्व किल्ले आपल्या साम्राज्याला जोडण्यात आले.
तरुण छत्रपती शिवाजी महाराज यांनी अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आपल्या सैनिकात समाविष्ट केले. येथे काही व्यक्तींचे किंवा सैनिकांचे नांव समाविष्ट करणे आवश्यक आहे
यशाची कंक, सूर्याजी काकडे, बाजी पासलकर आणि तानाजी मालुसरे यांच्यासह दऱ्या खोऱ्यातील दूरवरच्या डोंगरातून मावळांच्या प्रदेशातून शिवाजी महाराजांनी बरेच साथीदार युक्त सैनिक जीवाला जीव देणारे युवक सैनिक भरती केले. सह्याद्रीच्या डोंगराच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि संपूर्ण जंगलाचा प्रवास करून संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातल्या येणाऱ्या दर्या खोऱ्यातील प्रदेश मावळ्याच्या साह्याने छत्रपती ने ओळख करून घेतली आणि या प्रदेशांमध्ये लढाई कशी करावी याचे तंत्र आणि मंत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सैनिकास दिले. लाखोच्या संख्येत असणाऱ्या मुघल सत्तेशी लढा देणे साधी सोपी गोष्ट नव्हती त्यामुळे ह्या लढाया आपण सह्याद्रीमध्येच डोंगर दर्या खोऱ्यात गनिमी कावा करून मुघल सैनिकांना पराभव करण्याची योजना दररोज नियोजन करून आखली जात होती. त्यासाठीच त्यांनी लष्करी कारकिर्दीत उपयुक्त ठरेल अशा भूमीची ओळख करून घेतली. Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi
छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वतंत्र आत्मा आणि मावळ्या सैनिकाची असलेले संबंध याकडे लक्ष देण्यासाठी मुघलांनी हळूहळू प्रचंड हालचाल सुरू केली. या संपूर्ण गोष्टीचा परिणाम किंवा संबंध शहाजी कडे येस न आलेले दादोजी यांच्याशी चांगले बसले नाही. विजयनगरच्या साम्राज्याच्या निधनानंतर 1639 मध्ये शहाजी बंगलोर येथे तैनात झाले. विजयनगरच्या लढाईनंतर राजाने शहाजीला ताब्यात घेतले आणि त्यांचे क्षेत्ररक्षण करण्यास एक वैशिष्ट्यपूर्ण तोडगा काढण्यास सांगितले किंवा सांगण्यात आले.Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi
ठरलेल्या नियोजनानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांना बंगलोर येथे घेऊन जाण्यास किंवा नेण्यात आले. शिवाजी राजे यांना बंगलोर मध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मोठा भाऊ संभाजी आणि त्याचा सावत्र भाऊ इकोजी यांना प्रथम लढाईचे प्रशिक्षण देण्यात 1640 मध्ये सैनिकातील प्रमुख निंबाळकर कुटुंबातील सईबाईसी लग्न करण्यात आले. सोळाशे 45 च्या सुरुवातीला बाल शिवाजी महाराज यांनी एका पत्रात स्वतंत्र भारताच्या कल्पनेविषयी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची संकल्पना व्यक्तही केली यात शिवाजी महाराजांची दूरदृष्टीपणा नक्की दिसून येतो. स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे ही त्यांची कल्पना अतिशय त्या काळात महत्त्वाची होती.
शिवकालीन लढाया
छत्रपती बाल शिवाजी यांनी आपली पहिली लढाई किंवा पहिले युद्ध वयाच्या सोळाव्या वर्षा पासून सुरू केले. काही ठिकाणी इतिहासात नोंद आहे की शिवाजी राजे यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून लढाई कार्यास सुरुवात केली. पण नक्की यातून लक्षात येते की शिवाजीने किशोर वयात लढाया सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली लढाई करून तोरणा किल्ला जिंकला. त्यानंतर त्यांनी लागोपाठ राजगडही सुद्धा जिंकला त्याचबरोबर कोणाला किल्लाही जिंकला आणि या जिंकलेल्या संपूर्ण किल्ल्यावर विजयाचा झेंडा लावला आणि झेंडा फडकवला. एका मागून एक विजय प्राप्त करत शिवाजी महाराजांची गोडधोड सुरू असल्यामुळे मुघल सैनिक यांच्यामध्ये अत्यंत घबराट उडाली. याचा परिणाम असा झाला की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी यांना विजयपूरच्या सुलतानाने कैदी बनवले. आपल्या वडिलाला विजयपूरच्या सुलतानाने कैद केल्यामुळे शिवाजी महाराज त्यांचे भाऊ संभाजी महाराजांनी सुलतानाला कोंडाणा किल्ला परत केला व आपल्या वडिलांची कैदेतून सुटका केली. या कारणास्तव काही काळ शहाजीराजे अस्वस्थ झाले. शहाजीराजे अस्वस्थ झाल्यामुळेच 1964 किंवा 65 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी यांचे निधन झाले. छत्रपती शिवाजी राजे आणि माता जिजाबाई यांनी झालेल्या दुःखाबद्दल किंवा निधनानंतर त्या गोष्टीतून आपणा सावरले परंतु विजयाची यशस्वी परंपरा सुरुवात केली. आणि पुन्हा स्वाऱ्या करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला जिंकला त्याचबरोबर त्याच भागाला लागून असलेला जावली जावळीच्या हवेलीतील मराठ्यांचा झेंडा फडकवला. मात्र मुघल संपूर्ण शिवाजी च्या शक्ती ला आव्हान देण्यासाठी पुढे सरसावले. विजयपूरच्या सुलतानाने 1659 मध्ये शिवाजी महाराजा विरुद्ध मोठी फौज उभी केली. शिवाजीला जिंकण्यासाठी विजयपूरच्या सुलतानाने अफजलखानाची मोठी फौज पाठवली. आणि विजयपूरच्या सुलतानाने अफजलखाना स्पष्ट सूचना केल्या की, एक तर शिवाजी महाराजाला जिवंत पकडून आणा नाहीतर जिवंत मारून टाका. या दृष्टिकोनातून अफजलखानाची फौज शिवाजीला पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी पुढे सरसावली. शिवाजी महाराजाला मारण्यासाठी किंवा पकडण्यासाठी अगदी हुशारीचे तंत्र वापरून राजनैतिक तंत्रज्ञानयुक्त राज्यास मारण्यास अफजल खान सिद्ध झाला. अफजल खान यांनी शिवाजीला मारण्याचा उचललेला विडा अखेर छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना धडा शिकवून अफजलखानाचाहीसुद्धा शिवाजी महाराजांनी व केला. या वधाबाबतची संपूर्ण माहिती एका विशिष्ट लेख लिहून त्यात स्पष्ट करण्यात येणार आहे कारण ही फार मोठी झालेली लढाई या लेखात नमूद करायचे म्हटले तर लेख फार मोठा होईल म्हणून फक्त आपणास एवढेच स्पष्ट करून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी काव्याच्या सहाय्याने अफजलखानाच्या पोटात वाघ नखे चालवून जागच्या जागी ठार केले. शिवाजी महाराज तेथेच थांबले नाही तर त्यांनी प्रतापगडावर स्वारी केली आणि प्रतापगडावर विजयपूरचा सुलतान याचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याला अनेक शस्त्र शस्त्र मिळाली त्यामुळे मराठ्याचे सैन्य अधिक शक्तिशाली झाले. विजयपूरच्या सुलतानाची संपूर्ण शस्त्रास्त्रे शिवाजी यांनी मिळवल्यामुळे महिन्याची ताकद वाढली.Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi
शिवाजींच्या विजयाबद्दल आणि लढाया बद्दल संपूर्ण माहिती लेखात देणे अशक्यप्राय गोष्ट आहे त्यामुळे काही ठळक मुद्दे या लेखात समाविष्ट करत आहे.प्रथम शिवाजीने अफजलखानाचा वध केला.त्यानंतर शाहिस्तेखाना बरोबर युद्ध झाले व शाहिस्तेखानाची बोटे कापून तेथेही सुद्धा त्यांचा पराभव केला. पुढे शिवाजीने सिद्धी जोहार यांच्याशी पराभव केला. विजयपूरच्या सुलताना कडे सामर्थ्य शिल्लक नसल्यामुळे विजयपूरची बडी बेगणे शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध सल्तनत काहीतरी करण्यासाठी सहा मुघल शासक औरंगजेब ची मदत मागण्यास गेली. आणि औरंगजेबने बडी बेगने हिला वचन दिले की मी मदत करतो. शिवाजीला मारण्यासाठी औरंगजेब यांनी एक लाख पन्नास हजार सैनिकासह त्यांचे मामा शाहिस्तेखान यांना शिवाजी बरोबर युद्ध करण्यासाठी पाठवण्यात आले. शाहिस्तेखानाच्या फौजा पुण्यात दाखल झाल्या. शाहिस्तेखानाच्या फोजा पुण्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांचे निवासस्थान लाल महल शाहिस्तेखानाच्या फौजेने काबीज केला. बाबतची माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांना मिळताच त्यांनी ताबडतोब एक तुकडी 400 सैनिकाची मिरवणूक घेऊन पुण्याला गेली. सैन्य पुण्याला जाताना रात्री लाल महालात गेले. तेथे त्यांना असे आढळून आले की शाहिस्तेखानाचे सैनिक विश्रांती घेत आहेत. विश्रांती घेत असताना, शिवाजीच्या 400 सैनिकांनी लाल महालातील जागृत असलेल्या शाहिस्तेखान आणि त्यांच्या सैनिकावर हल्ला चढवला. मालाच्या आत होणाऱ्या लढाईत शाहिस्तेखान यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पळून जात असताना एका खिडकीमध्ये त्याचा हात दिसला त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या तलवारीने शाहिस्तेखानाची बोटे कापली आणि शाहिस्तेखानाला पराभूत केले.विजयपूरचा संघर्ष ही महत्त्वाचा आहे.पन्हाळगड सुद्धा ताब्यात घेतला.पावनखिंडीमध्ये सुद्धा फार मोठी लढाई झाली . पन्हाळगड ते विशालगड पर्यंतचा रात्रीचा पळता प्रवेश करून पन्हाळगडाकडे शिवाजी राजांना सुखरूप पोहोचवून देण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोळखिंडीमध्ये 300 सैनिकासह शत्रूला रोखून छत्रपतीचा जीव वाचवणारे बाजीप्रभू देशपांडे या लढाईत मारल्या गेले. घोडखिंड ही आता पावनखिंड म्हणून प्रसिद्ध आहे. पन्हाळगडावरून शिवाजी राजांना विशाल गडापर्यंत सुखरूपरीत्या पोचल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला प्राण सोडला.छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेवटपर्यंत मोगलाशी संघर्ष केला त्याचबरोबर इंग्रजांशी संघर्ष केला. त्याचबरोबर सुरत येथे सुद्धा सुरत लुटीचा प्रकार झाला. जुन्नर मध्ये छापा टाकीत अहमदनगर मधील मुगल हद्दीत छापा टाकला आणि शिवाजी महाराजांनी तीस हजार रोक आणि 200 घोडे घेतले हाही प्रसंग फार महत्त्वाचा आहे. कितीतरी संघर्ष महत्त्वाची आहे.औरंगजेब यांनी अहमदनगर येथे शिवाजी महाराजांच्या सैनिकांचा पराभव करण्यासाठी मुघल सैनिक प्रत्युत्तर पाठवले तथापि सर्व सैनिक शिवाजी महाराजांच्या विरुद्ध प्रतिक्रियांचा पाऊस पाडून बादशहांच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मुगल गादी साठी भावाबरोबर वारसदार लढाई यामुळे खंडित झाली.शाहिस्तेखान व सुरतेवरील लढाई सुद्धा इतिहासात अजरामर आहेत.शिवाजी महाराजांची आग्रा येथून होणारी अटक आणि सुटका हाही एक रोमांचकारी प्रसंग आहेत त्याबाबत स्वतंत्रपणे एका लेखात स्पष्टपणे माहिती नमूद करण्यात येईल.आता या लेखाचा शेवट आपण एका मुख्य प्रसंगाच्या साह्याने करणार आहोत. तो प्रसंग म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
मराठ्याचे सार्वभौम राज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची घडलेली महत्त्वपूर्ण घटना आहेत. इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व. इतिहासात घडलेल्या घडामोडीचा भविष्य काळावर नक्कीच परिणाम होत असतो आणि त्यातून किंवा त्या घटनेतून एक प्रेरणा प्राप्त होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातून स्वराज्याचे ध्येय समोर येऊन मराठ्याचे साम्राज्य स्थापन करणारा कुलवंत कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक मुळे मराठ्याचे साम्राज्याचे राजे बनले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक मराठी कॅलेंडर प्रमाणे ज्येष्ठ शुद्ध तृदशी शालिवाहन शके पंधराशे 96 म्हणजेच मराठी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सहा जून सोळाशे 74 ला स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन मराठी साम्राज्याचा पाया रचून जयघोष केला भारताच्या इतिहासातील हा एक महत्वपूर्ण प्रसंग सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे आणि लिहिल्या गेला आहे. शिवाजीचा राज्याभिषेक म्हणजे मराठ्याचे सार्वभौम राज वैभवच मानावे लागेल. खरे जनतेचे राज्य जर कोणी निर्माण केले असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांनीच केले. आपण त्यांना जाणता राजा असे म्हणतो. सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांनी मोगलासी आणि आदिलशाही लढा देऊन स्वतः जनतेचे रयतेचे राजू उभारले आणि त्या राज्या ंचा प्रमुख म्हणून राज्याभिषेक करून घेतला व शिवाजी राजांनी राज्याभिषेक गागाभट यांच्या यांच्या विधीनुसार सुवर्ण युक्त असण्यावर आरमान होऊन मंत्रविधीन राज्याभिषेक संपन्न केला आणि आपल्या राज्यासाठी आर्थिक व्यवहारासाठी मराठी भाषा अर्थात मोडी स्वरूपात चालनात असणारी भाषा वापरात आणली आणि त्याचबरोबर होऊन नाणी विकसित केली.सर्व गोरगरिबांना दानधर्म करून राज्याभिषेक संपन्न केला. कसेल त्याची जमीन याप्रमाणे सर्वांना जमीन प्राप्त करून दिली.
मराठा साम्राज्याचा थोडक्यात सारांश
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकार काळ हा 6 जून सोळाशे 74 ते 3 एप्रिल 1680 पर्यंत गणण्यात आला आहे. शिवाजी राजे यांचे अधिकार रोहन पद छत्रपती पदाभिषेक म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणूनच शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक 6 जून सोळाशे 74 हा दिवस राज्याभिषेक दिवस म्हणून मानण्यात येतो. शिवाजी महाराज यांची राज्याची व्याप्ती पाहता पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगरांच्या रांगेपासून तर नागपूर पर्यंत त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतातील तंजावार पर्यंत पसरलेला होता. ह्या संपूर्ण प्रदेशावर एक छत्री आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अधिराज्य म्हणजेच जनतेचे राज्य निर्माण केले. शिवाजी राजांची राजधानी त्यांनी रायगड ही निवडली होती. छत्रपती साम्राज्याचा संपूर्ण व्यवहार हा रायगड किल्ल्यावरून चालत होता. शिवाजीच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांचे राज्य कोणालाही जिंकता आले नाहीत. अशा महान छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू हा दुःखद निधन एका छोटासा आजाराने 3 एप्रिल 1680 रोजी झाले. त्यानंतर या राज्यांचा उत्तर अधिकारी म्हणून छत्रपती संभाजी राजे भोसले म्हणजे शिवाजी राजे यांचे थोरले चिरंजीव होय. उत्तराधिकारी बनले. शिवाजी संतती म्हणजे आपत्ती पुढील प्रमाणे होऊन गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे अपत्य
छत्रपती संभाजीराजे भोसले,छत्रपती राजाराम भोसले,सखुबाई,राणूबाई,अंबिकाबाई,राजकुवर बाई,दीपाबाई,कमलाबाई हे होते.
राज्यांची ब्रीद वाक्य
"प्रतिपच्चंद्रलेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शहासुनो: शइवस्यऔषआ भद्राय राजते |"
चलन
छत्रपती शिवाजी राजे यांच्या काळात चलन म्हणून होन, शिवराई,( सुवर्ण होन, रूप्प होन)
सारांश
उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी शहाजी भोसले यांच्या कालखंडातील अगदी अतिशय थोडक्यात माहिती या लेखातून देण्याचं थोडक्यात प्रयोजन केले आहेत. छत्रपतीच्या संपूर्ण इतिहासावर माहिती एक लेखक लिहिणे अशक्यप्राय असल्यामुळे मुख्य मुख्य घटना आणि घडलेला इतिवृत्तान्त देण्याचा अल्पसा एक प्रयोग केला आहे. याबाबत आपणास काही बाबी आढळून आल्यास नक्की लेखकास कळवणे ही विनंती म्हणजे यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करणे सोपे होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपटातून सुद्धा आपण माहिती पाहिली आहेत त्याचबरोबर टीव्हीच्या दूरदर्शन वाहिनी वरून अनेक मालिकेतून भरपूर माहिती आपण पाहिली आहेत सर्वच गोष्टी नमूद करणे शक्य नसल्यामुळे जेवढे मला माहीत होते त्याबाबतचा इतिवृत्तांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत या लेखातून स्पष्टपणे नमूद केला आहे.
FAQ
1) राष्ट्रमाता जिजामाता यांचे जन्मगाव कोणते आहे ते सांगा?
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा.
2) छत्रपती राजाराम भोसले च्या आईचे नाव सांगा?
सोयराबाई
3) छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानी म्हणून कोणत्या गडाची निवड केली?
रायगड
4) 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार कोणाच्या बाबतीत इतिहासात लिहिल्या गेले आहेत.
तानाजी मालुसरे.
5) घोडखिंड कोणी लढवली?
बाजीप्रभू देशपांडे.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख वाचू शकता
क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद जन्मदिन मराठी माहिती