वासुदेव बळवंत फडके मराठी माहिती |Vasudev Balwant Fadke in Marathi Information
प्रस्तावना
मित्रांनो, आज आपण आपल्या लेखातून ' महान आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ' ' ' 'Vasudev Balwant Fadke in Marathi Information 'यांच्या विषयी सविस्तर माहिती पाहूया कारण दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी दिन असल्यामुळे त्यांच्याबाबत माहिती या लेखातून सविस्तर स्पष्टपणे नमूद करणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान आद्य क्रांतिकारक वसुदेव बळवंत फडके यांचा कालखंड 1845 ते 1883 भारतीय इतिहासातील अतिशय महान क्रांती पर्व म्हणून इतिहासात हा कालखंड सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्यास अभिवादन! करून आपण जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी माहितीचा अभ्यास करणार आहोत.
![]() |
|Vasudev Balwant Fadke in Marathi Information |
Vasudev Balwant Fadke in Marathi Information(toc)
वासुदेव बळवंत फडके यांचा परिचय
"वासुदेव बळवंत फडके " "Vasudev Balwant Fadke in Marathi Information " तसे पाहिले तर त्यांचे मूळ घराणे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी या गांवाचे होते. वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. हा कर्नाळा किल्ला त्यांनी अठराशे अठरा मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला. कर्नाळा किल्ल्याजवळच वासुदेव फडके यांचे जन्मगाव आहेत. येथेच त्यांनी त्यांचे वास्तव्य केले. आणि या गावीच त्यांचा जन्म झाला. " Vasudev Balwant Fadke in Marathi Information "
बालपण व शिक्षण
"Vasudev Balwant Fadke in Marathi Information " " महान आद्य क्रांतिकारक श्री वसुदेव बळवंत फडके "यांचा जन्म महाराष्ट्र रायगड (जुना कुलाबा जिल्हा) जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात शिरढोण या गावी झाला. त्यांचा जन्म ब्राह्मण हिंदू कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बळवंत फडके असे होते. त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात त्यांच्या जन्मगांवी शिरढोण येथे वयाच्या सातव्या वर्षी पासून सुरू झाले. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावीच पूर्ण त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्रजी विषयाचे शिक्षण घेण्यासाठी मुंबई येथे आले. मुंबई येथे शिक्षण घेत असताना गिरगावातील जगन्नाथ चाळीत फणसवाडी येथे वास्तव्य करत असत.त्यांचे माध्यमिक शिक्षण कल्याण आणि मुंबई येथे त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. " Vasudev Balwant Fadke in Marathi Information "
वैवाहिक जीवनाची माहिती
" Vasudev Balwant Fadke in Marathi Information " "वासुदेव बळवंत फडके " शिक्षण शिकत असताना विद्यार्थी दशेतच विवाह 1859 मध्ये सोमन घराण्यातील मुलीशी पहिला विवाह संपन्न झाला. त्यांच्या वैवाहिक जीवनात त्यांनी एका मुलीचे जन्म दिला. त्यांच्या त्या मुलीचे नांव मथुरा असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची पत्नी सोमन घराण्यातील मुलगी सुसंस्कृत होती पण अचानक दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचे निधन 1873 मध्ये झाले. फडके यांनी दुसरे लग्न अगदी नऊ वर्षाच्या मुलीशी केले. त्या नऊ वर्षाच्या मुलीचे नाव गोपिकाबाई असे होते. गोपिकाशी त्यांचा विवाह 1873 सालीच झाला. त्यापुढेही त्यातूनच त्यांना फार मोठे वैवाहिक प्राप्त झाले नाहीत किंवा मिळाले नाही. त्यांच्या दुसऱ्या पत्नी गोपिकाबाई यांचेही सुद्धा निधन झाले.1855 ते 1860 या कालावधीत इंग्रजी विषयाचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले मुंबई येथील शिक्षण घेतल्यानंतर वसुदेव बळवंत फडके पुढील शिक्षण घेण्यासाठी ते पुणे येथे आले. पुणे येथे आल्यानंतर त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील इंग्रज सरकारने स्थापन केलेल्या संस्थेतून उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. उच्च शिक्षणामध्ये त्यांनी पदवीधर पदवी प्राप्त केली. बॉम्बे प्रेसिडेन्सी संस्थेतून सुरुवातीला झालेल्या पदवीधरापैकी एक महान पदवीधर ठरले. पदवी डिग्री संपादन केली." Vasudev Balwant Fadke in Marathi Information "
व्यावसायिक माहिती सेवा विषयक
" वासुदेव बळवंत फडके " "Vasudev Balwant Fadke in Marathi Information" यांनी शिक्षण सोडल्यानंतर रेल्वे विभागांमध्ये नोकरी केली. तेथे नोकरी करत असताना वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्यामध्ये नेहमी वाद होऊ लागले म्हणून रेल्वे विभागातील नोकरी सोडून नंतर त्यांनी मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरी करण्यास सुरुवात केली. लेखनिकाची नोकरी फार काळ टिकली नाही. त्यांनी लेखनिकाची नोकरी सुद्धा सोडली. शेवटी नोकरी करायची म्हणून पुण्यातील मिलिटरी स्कूलमध्ये 1863 मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी मिलिटरी स्कूलच्या हिशोब खात्यांची जमाखर्चाची नोंद ठेवणाऱ्या खात्याची नोकरी नाईलाज असतो शिवकारली व लेखा नियंत्रक म्हणून महत्त्वपूर्ण काम करू लागले.
पुणे येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी पुणे येथे सैनिकी शाळेमध्ये लेखा नियंत्रक म्हणून मिलिटरी स्कूलच्या कार्यालयात नोकरी करू लागले. मिलिटरी स्कूल मध्ये नोकरी करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची सुट्टी मिळत नव्हती. त्यांना जर त्यांच्या आईला भेटायला जायचे असेल तरीसुद्धा मिलिटरी स्कूलच्या प्रमुख विभागाच्या प्रमुखांनी अनेक वेळा त्यांना सुट्ट्या न देता सुट्ट्या नामंजूर केल्या. सुट्या नामंजूर झाल्यानंतर त्यांना आपल्या आईला भेटायला सुद्धा जाता येत नव्हते. आई अत्यंत आजारी असून सुद्धा त्यांना सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे ते अतिशय नाराज होऊन जर आपल्याला आपल्या आईला भेटायला मिळत नसेल तर नोकरी काय कामाची असाही विचार त्यांच्या मनात आला. आई खूप आजारी असल्यामुळे त्यांचे लक्ष नेहमी घराकडे लागत होते. त्यांच्या आईचे आजारामुळे निधन झाले. पण शेवटचे दर्शन वसुदेव बळवंत फडके यांना आपल्या आईचे घेता आले नाही. कारण नोकरीचही त्या स्वरूपाची होती की तेथे कोणती सुट्टी दिल्या जात नव्हती. शेवटी मिलिटरी स्कूल प्रमुखाने अगदी उशिरा आईस भेटण्यास जाण्यास वासुदेव फडके यांची सुट्टी मंजूर पण सुट्टी देण्यात एवढा उशीर झाला होता की, शेवटच्या क्षणी ते आईचे अंतदर्शन घेऊ शकले नाही".Vasudev Balwant Fadke in Marathi Information"
आईच्या निधनानंतर चा टर्निंग पॉईंट
आईचे निधन झाल्यानंतर परिस्थिती अगदी उलट झाली आणि या घटनेने म्हणजे आईच्या निधनाने त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा प्राप्त झाली. त्यावेळी हिंदुस्थानामध्ये फार मोठा दुष्काळ पडलेला होता. परंतु परिस्थिती अशी होती की हिंदुस्थानावर इंग्रजांची राजवट होती. इंग्रजांची राजवट ही आपणास माहित आहे .हुकूमशाही पद्धतीची होती. फार मोठ्या पडलेल्या दुष्काळात इंग्रजांनी दुष्काळाकडे दुर्लक्ष करून फार मोठा हलगर्जीपणा केला त्याचा परिणाम असा झाला की, असंख्य नागरिक दुष्काळी परिस्थिती त मृत्युमुखी पडले. या सर्व गोष्टीचा परिणाम वासुदेव बळवंत फडके यांच्यावर झाला. अठराशे सत्तावन च्या उठावाची प्रेरणा घेऊन इंग्रज राजवटी विरुद्ध उठाव करण्याचा निर्धार मनात निर्माण केला. पुढील कार्यवाहीची वाटचाल सुरू केली. आपल्या हिंदुस्थानाला आणि आपल्या भारत मातेला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी हिंदुस्थानात इंग्रजा विरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचे किंवा बंड करण्याचे धोरण निश्चित केले ." Vasudev Balwant Fadke in Marathi Information"
अध्यात्मवादी वासुदेव बळवंत फडके
'वासुदेव बळवंत फडके' यांच्यावर अध्यात्म व धार्मिक प्रवृत्तीचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडलेला होता. मुळातच ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यामुळे त्यांनी धार्मिकतेचा आधार घेतला.वासुदेव बळवंत फडके यांचे खरे मार्गदर्शक श्री स्वामी समर्थ हे होते. स्वामी समर्थ यांना भेटण्यासाठी ते अक्कलकोट येथे गेले. स्वामी समर्थाची भेट घेऊन आराध्य दैवत म्हणून ते स्वतः श्रीदत्त यांची पूजा करून दर्शन घेतले. श्री दत्त यांचे चित्र एका महान चित्रकाराकडून मुद्दाम त्यांनी तयार करून घेतले. कोणत्याही कार्याला सुरुवात करताना दत्ताच्या फोटोचे दर्शन घेऊन नवीन नवीन योजना आखून आपले कार्य करू लागले. श्री दत्त यांच्या जीवनावर आधारित असणारे पुस्तक 'दत्तलहरी 'हे पुस्तक होते. या पुस्तकाचे त्यांनी मराठीत भाषांतर गंगाधर शास्त्री दातार यांच्याकडून करून घेतले. या पुस्तकाचे ते नेहमी वाचन करत असत.त्यांच्या विचारामुळे त्यांच्यावर थोडा धार्मिकतेचा प्रभावही पडला होता.|Vasudev Balwant Fadke in Marathi Information
राजकीय , सामाजिक जीवन आणि क्रांतिकारक विचार
राजकीय व सामाजिक जीवनाचा प्रभाव त्यांच्यावर महादेव गोविंद रानडे यांचा पडला. आज बरोबर क्रांतिकारक विचार लहुजी साळवे यांच्याकडून प्रेरणा घेऊन क्रांतिकारक जीवन उभे करण्याचे प्रयत्न त्यांनी केले .त्यांच्यावर खरा महत्त्वाचा प्रभाव भारत मातेला मुक्त करण्यासाठी जर कोणाचा पडला असेल तर तो प्रभाव म्हणजे महादेव गोविंद रानडे आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा पडला होता त्यामुळे त्यांनी क्रांतीची ज्योत हाती घेतली. सर्व गोष्टीला एकच मार्ग म्हणजे स्वराज्य हा एकमेव उपाय होय. असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी हिंदू समाजातील लोकांच्या मदतीने ब्रिटिश राजवटी विरुद्ध फार मोठी चळवळ उभी करण्याचे धोरण निश्चित करून त्यासाठी ते इंग्रज सरकारची सत्ता सशस्त्र क्रांती शिवाय दुसरा मार्ग नाही. सशस्त्र क्रांती हा एकच मार्ग आहे. सशस्त्र क्रांती झालीच पाहिजे. असे त्यांचे मत होते हे करण्यासाठी वसुदेव बळवंत फडके यांनी सुरुवातीला महादेव गोविंद रानडे यांचे अनेक भाषण स्वतः उपस्थितीत राहून ऐकले. पुणे येथे पंधरा वर्षे मिल्ट्री स्कूल मध्ये नोकरी करत असताना त्यांची मुख्य ओळख एका महान व्यक्तीशी झाली. तो महान व्यक्ती म्हणजे क्रांतिवीर राघोजी साळवे. पुण्यातील एक सामाजिक व्यक्तिमत्व असणारा मागासवर्गीय मांग समाजातील लहुजी राघोजी साळवे हे त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख गुरु त्यांनी त्यांना मानले. क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्याकडून त्यांनी एक तज्ञ म्हणून कुस्तीपटू चे प्रशिक्षण घेतले. लहुजी साळवे यांनी त्यांना चांगले कुस्तीचे प्रशिक्षण दिले त्यामुळे वासुदेव बळवंत फडके फार मोठे प्रचंड पुस्तिका सुद्धा बनले. इंग्रजाची वसाहतवाद संपवण्यासाठी आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक अस्पृश्य समाजातील मांग समाजाच्या व्यक्तीने फार मोठे प्रभावित होऊन मागासलेल्या समाजासाठी व त्यांना स्वातंत्र्याच्या प्रवाहात आणण्यासाठी महादेव गोविंद रानडे आणि क्रांतिवीर राघोजी साळवे ह्या दोन महान व्यक्ती मुळे त्यांचे प्रचंड मनोधैर्य वाढले. महादेव गोविंद रानडे यांच्या व्याख्यानातून भारतीय अर्थव्यवस्थेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही व भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही याकडे लक्ष देऊन भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणे हा एक महत्त्वाचा पर्याय वासुदेव बळवंत फडके यांनी रानडे यांच्याकडून घेतला.देशात पडलेल्या दुष्काळामुळे ते खूप दुःखी झाले. भारतात पडलेल्या या दुष्काळाचा परिणाम सर्वसामान्यावर होत असल्यामुळे त्यांनी अनेक मिळावे घेतले आणि लोकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुण्यातील सार्वजनिक आंदोलनात ते सामील सुद्धा झाले होते. 'Vasudev Balwant Fadke in Marathi Information'
तरुणांसाठी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था
पुण्यामध्ये असताना त्यांनी तरुणांना शिक्षण देण्यासाठी एक संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेचे मुख्य उद्देश म्हणजे तरुण मुलांना शिक्षण देणे स्वातंत्र्य चळवळीसाठी समुदाय उभा करणे हा मुख्य उद्देश होता. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नांव "ऐक्य वर्धनी होय".ही संस्था समाजामध्ये समानता, ऐक्य आणि समन्वय निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती.
लहानपणापासूनच वासुदेव बळवंत फडके यांच्या अंगात सुप्त गुण कौशल्य म्हणजे शूर आणि वीर हे होते. ब्राह्मण कुटुंबामध्ये हिंदू धर्मात जन्म झाला तरीसुद्धा त्यांच्या सुप्त गुणाचे कौशल्य पुढे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्पष्टपणे कौशल्य दिसूनच आले. वसुदेव बळवंत फडके यांची शारीरिक कौशल्य महत्त्वाचे होते. लहानपणापासूनच त्यांनी कुस्ती व सवारी यासारखे शिक्षण घेण्याकडे स्वतः त्यांनी प्राधान्य दिले. कुस्ती शिकण्यासाठी त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण काही काळाकरिता सोडवाही लागले होते. नंतर त्यांनी ते पूर्ण केले. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी श्रीमंत नव्हती. संपूर्ण शिक्षण त्यांनी हलकीच्या गरिबीतच पूर्ण केले.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान सशस्त्र आद्य क्रांतिकारक म्हणून संपूर्ण भारतीयांना त्यांचा परिचय आहे.1 873 मध्ये त्यांनी आपल्या देशात बनवलेल्या स्वदेशी वस्तू वापर करण्याची शपथही घेतली होती. ते नेहमी दैनंदिन जीवनात स्वदेशी वस्तूंचा वापर करू लागले. त्यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुणही सुद्धा स्वदेशी वस्तूंचा शपथ घेऊन वापर करू लागले. शिवाय ते दत्त उपासक असल्यामुळे त्यांच्यातील धार्मिक पणा सुद्धा दिसून येतो. त्यांनी दत्त महात्मे या विषयावर एक ग्रंथाचे सुद्धा लिखाण केले आहेत. त्यांच्या जीवनातील संपूर्ण कहाणीचा सविस्तर अभ्यास केला तर आपणास दिसून येईल की, सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक आणि सैनिकी क्षेत्रात अत्यंत मोलाचे काम करणारे भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो ते अगदी तिवार सत्य आहे.'|Vasudev Balwant Fadke in Marathi Information '
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी स्थापना.
'Vasudev Balwant Fadke in Marathi Information ' 'क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके' यांनी पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या संस्थेचे ते सहसंस्थापक राहिले. या संस्थेचे ते पहिले सेक्रेटरी, कोषाध्यक्ष आणि सहसंस्थापक म्हणून काम पाहिले. तरुणांना शिक्षण देण्यासाठी आणि आपल्या भारत मातेला स्वातंत्र्यातून मुक्त करण्यासाठी महत्त्वाचे शिक्षण देण्याचे कार्य महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मार्फत सुरू झाले. त्यातून अनेक तरुणांनी शिक्षण घेऊन स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत आपला सहभाग नोंदवला आणि इंग्रज राजवटीच्या हुकूमशाही विरुद्ध लढा देण्यास तयार झाले. ही संस्था स्थापन करत असताना सहकारी समाज सुधारक त्याचबरोबर क्रांतिकारक लक्ष्मण नरहर इंदापूरकर तसेच वामन प्रभाकर भावे यांना आपल्याबरोबर घेऊन वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ची फार मोठी सुधारणा करून या सोसायटीचे नवीन नामकरण करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चे नवीन नांव पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट म्हणजेच पी एन आय सी स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांचे नाव (एम ई एस) ची सह संस्था म्हणून कार्य करू लागली. या संस्थेच्या माध्यमातून पुणे येथे पीएनआयच्या माध्यमातून भावे स्कूलची सुद्धा स्थापना केली. महाराष्ट्रामध्ये एम ई एस विविध भागांमध्ये आज सुद्धा जवळजवळ सुमारे 80 च्या पेक्षा जास्त संस्था चालवल्या जातात'.Vasudev Balwant Fadke in Marathi Information'
सशस्त्र क्रांती उठाव
इंग्रज सरकार विरुद्ध भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र लढा देण्याचा एकाकी प्रयत्न केला. सुरुवातीचा हा त्यांचा लढा एकाकी स्वरूपाचा होता. त्यांना फारसे त्याकाळी त्यांच्या मताशी जुळून येणारे अनुयायी मिळाले नाहीत. तसेच इंद्र सत्तेविरुद्ध लढण्यासाठी शस्त्रसामुग्री ही प्राप्त झाली नाही. तरीसुद्धा त्यांनी एकाकीपणे भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच सशस्त्र लड्यांची मुहूर्त मेन रचली. त्यांनी उभी केलेली सशस्त्र उठावातील सेनेची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्व अर्धा पर्यंत संपूर्ण भारतभर पसरली म्हणून काही लोक "सशस्त्र लढ्याचे लढ्याचे जनक "असे म्हणतात. तर काही लोक "लढाऊ राष्ट्रवादाचे जनक" असे म्हणतात. त्यांच्या खऱ्या कार्याचा गौरव त्यांच्या जन्म गावी शिरढोण येथे त्यांचे भव्य स्मारक स्तंभ उभारून करण्यात आला आहेत ते वर्ष 1940 चे वर्ष होते. त्यांनी केलेल्या कार्यांचे थोडक्यात सविस्तर पणे खाली नमूद केल्याप्रमाणे माहिती आपण पाहूया.Vasudev Balwant Fadke in Marathi Information
सशस्त्र क्रांती चे जनक
'Vasudev Balwant Fadke in Marathi Information ' सशस्त्र क्रांती उठावाची सुरुवात जर आपण पाहिली तर ती एका बंडखोरीतून सुरुवात झाली आहे. त्याकाळी बडोदा येथे एक मोठा संस्थानिक होता. त्याचे नांव मल्हारराव गायकवाड हे होते. मला राव गायकवाड यांच्या बडोदा संस्थानावर इंग्रज सरकारने खालसा करण्याचे धोरण आखले आणि बडोद्याचे गायकवाड यांना इंग्रजांनी पदच्युत केले. बडोद्याचे गायकवाड यांचे संस्थान खालसा झाल्यामुळे इंग्रज सत्तेच्या विरुद्ध वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांचा निषेध करणारे अनेक ठिकाणी मिळावे घेऊन भाषण सुरू केले. इंग्रजी सत्तेला विरोध करण्यास सुरुवात केली. इंग्रज सरकार विरुद्ध भाषणाची मालिका सतत सुरू झाली. पडलेल्या दुष्काळाच्या संदर्भामध्ये वसुदेव बळवंत फडके यांनी दख्खन प्रदेशाचाही दौरा केला. भारताला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी फार मोठे प्रयत्न करून समाजात उदयुक्त केले. परंतु त्यांना आलेला अनुभव वेगळाच आला. सुशिक्षित तरुण वर्गाकडून वसुदेव बळवंत फडके यांना पाठिंबा मिळाला नाही. तरीसुद्धा ते नाराज झाले नाही. आपला अखंड लढा सुरू ठेवण्यासाठी त्यांनी रामोशी जातीतील एकत्र गोळा केले. इंग्रज विरुद्ध सशस्त्र क्रांती करण्यासाठी रामोशी, धनगर, कोळी ,भिल ,गोंड आणि आदिवासी एकत्र गोळा करून भारत मातेला स्वातंत्र्यातून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांती करण्यास सुरुवात केली. जमा केलेल्या विविध समाजातील समुदायास प्रथम त्यांनी प्रशिक्षण दिले. शूट कसे करणे, सवारी कशी करणे आणि कुंपण घालणे. याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे अंदाजे जवळ जवळ भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने एक बंडखोर गट तयार करून त्या गटाला संघटित केले. अंदाजे या गटामध्ये एकूण 300 लोक बंडखोर होते. तीनशे बंडखोर यांना एकत्रित करून संघटित केल्यानंतर स्वतःची फौज स्थापन करण्याचा विचार मनात आणून आता आपण फौज स्थापन केली पाहिजे त्याशिवाय अत्यंत नाही याबाबत एकमेव पर्याय म्हणजे फौज तयार करणे हाच होय. परंतु फौजेकडे निधी किंवा पैसा अपुरा होता. तर आपल्या फौजेसाठी निधी कसा उभा करायचा याचे संपूर्ण नियोजन वासुदेव बळवंत फडके यांनी केले. पैसा उभा करण्यासाठी आपल्या फौजेसह त्यांनी पहिला छापा टाकण्यास सुरुवात केली. वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला छापा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील धामारी या गावात टाकण्यात आला. इंग्रज सरकारने जनतेकडून जमा केलेला प्राप्तिकर हा धामारी गावातील प्रसिद्ध व्यापारी बालचंद फजमल संकला यांच्या घरात जमा करून ठेवण्यात आला होता. वासुदेव बळवंत फडके यांनी याच घरावर पहिला हल्ला केला आणि दुष्काळग्रस्त गावकऱ्यांच्या फायद्यासाठी पैसे घेतले. त्यांनी त्या हल्ल्यात 400 रुपये प्राप्त केले. रुपये म्हणजे त्या काळातील त्याला डकैट असे म्हणत. त्यामुळे इंग्रज सरकार वासुदेव बळवंत फडके यांचा पाठलाग करू लागले. इंग्रज आपल्या पाठीमागे लागल्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी फडके यांनी निर्णया गावोगावी पळून जावे लागले. भारतातील काही सहानुभूतीदार व्यक्तीने त्याच बरोबर त्यांच्या हितचिंतक व्यक्तीने आणि बहुतेक खालच्या वर्गातील लोकांनी त्यांना प्रत्येक वेळी सहारा दिला. वसुदेव बळवंत फडके यांना नानागावचा लोकांनी फार मोठा सहारा दिला व जंगलात संरक्षण आणि आच्छादन दिले. ब्रिटिश सैनिकांचे दळणवळण खंडित करून त्यांच्यावर छापे टाकणे. या उद्देशाने दुष्काळग्रस्त लोकांना अन्नपुरवठा करणे हा एक मार्ग होता. यासंदर्भामध्ये शिरूर आणि खेड तालुक्यात ठिकठिकाणी अनेक छापे टाकले व इंग्रज सरकारला हैराण करून सोडले. त्याचबरोबर आपणास आणखी एका छाप्याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. तो छापा महत्त्वाचा आहे. वासुदेव बळवंत फडके यांचे रामोशी समाजाचे प्रमुख नेते की जे नेते फडके यांचे समर्थक होते यांनी कोकण विभागामध्ये निरनिराळ्या प्रकारची छापे टाकले. अनुक्रमे यांनी पहिला छापा 10 मे 1879 रोजी पळस्पे आणि चिखली या विभागात टाकून अंदाजे दीड ते दोन लाख रुपये लुटले. त्यामुळे इंग्रज सरकार खळबळून जागे झाले. घाटमाथ्याच्या भागात फडके यांचे सैनिक परतत असताना मेजर डॅनियल नाईक यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गोळीबारही झाला. मेजर डॅनियल यांनी गोळीबार केला. हल्ल्यात मुख्य नायकाचा मृत्यू झाला झाला. या मृत्यूमुळे फडके यांच्या बंडाने केलेल्या उठावाला फार मोठा धक्का पोहोचला. फडके यांचा खंदा पाठीराखा मृत्यू पावल्यानंतर फडके यांनी आपल्या उठावाची स्वारी दक्षिणेकडे वळवली. दक्षिणेकडे त्यांनी श्री शैला मलिकार्जुन तीर्थक्षेत्राकडे धाव घेतली. तेथे सुद्धा त्यांनी फार मोठा लढा सुरू करण्याच्या विचाराने आपल्या सैनिकांमध्ये सैनिक भरती केले. त्यावेळी त्यांनी जवळजवळ सुमारे पाचशे ते सहाशे रोहिल्या या समाजाच्या तरुणांची सैनिकात भरती केली. एवढे करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी पुण्याजवळील लोणीकंद येथे आपल्या सैनिकांची म्हणजे बंड वाल्यांची मुख्य कार्यालय स्थापन केली. या कार्यालया मधून त्यांनी सर्व प्रकारच्या हालचाली सुरू केल्या. श्रीमंत व्यापारी, सावकार आणि बनिया यांच्यावर धाडी घालून लूटमार करून भारत मातेला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी पैसा उभा करणार हा त्यांचा उपाय होता. आपल्या लोणीकंद येथील कार्यालयातून त्यांनी सर्व योजना आखल्या. इंग्रज सरकारची नाकेबंदी केली. नातेबंदी करून रेल्वे ,तुरुंग, तार आणि टपाल कार्यालय उध्वस्त करण्याचे ठरवले. वासुदेव बळवंत फडके यांनी 22 फेब्रुवारी 1879 च्या सायंकाळी रामोशी समाजातील आणि आपल्या सैनिकाला भोजनाचा कार्यक्रम नियोजित केला व आपल्या सैनिकाचे काही बक्षिसे देऊन ज सत्यविरुद्ध बंड उभारण्याची जाहीर केली. सशस्त्र बंडखोरांनी फडके यांच्या आदेशानुसार पैसा उभा करण्यासाठी आणि इंग्रज सरकारला जबरदस्त लढा देण्यासाठी सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातील अनेक गावांची लूटमार करून सशस्त्र दरोडे घालून निधी उभा केला. पैसा उभा करण्यापेक्षा अधिक महत्त्व जर कोणत्या गोष्टीला त्यांनी दिले असेल तर ते म्हणजे आपणास ठाऊक नाही राष्ट्रभक्ती आणि देशभक्त त्याचबरोबर देश प्रेम यासाठी सर्व सैनिक वेगवेगळ्या गावी जाऊन निधी उभा करू लागले. परंतु त्यांच्या सैनिकातील लोकांनी शेवटी देशभक्तीकडे आणि देश प्रेमाकडे दुर्लक्ष करून निधी घेऊन फरार झाले म्हणजे चांगले. फेब्रुवारी मध्ये सुरू केलेली मोहीम मार्च केली संपण्याच्या मार्गावर आली कारण त्यांच्याजवळ फार कमी रामोशी उरले होते. आर तर जीवाला जीव देणारे दहा ते पंधरा रामोशी शेवटी त्यांच्या जवळ होते. वासुदेव बळवंत फडके अगदी उदास होऊन पुण्यात परतली. पुण्यात आल्यानंतर त्यांनी उरुळी कांचन या गावी गेले. उरळी कांचन या गावी जाऊन त्यांनी रेल्वे मार्गाने नवीन शहर गाठले. ते नवीन शहर म्हणजे सोलापूर. सोलापूर वरून पुढे त्यांनी त्यांच्या जीवनाचा नवीन मार्ग बदलला ते गाणगापूर मार्गे श्री शैला मलिकार्जुन या पवित्र मंदिरात विपन्नावस्थेत विराजमान झाले. याच ठिकाणी 17 एप्रिल 1879 रोजी आत्मसमर्पण करण्याचे ठरवले. देशभक्ती ने प्रेरित झालेले महान क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची भेट त्याच दरम्यान आत्मसमर्पणाच्या वेळी रघुनाथ मोरेश्वर भट नावाच्या व्यक्तीशी भेट झाली. रघुनाथ मोरेश्वर भट्ट यांनी त्यांचे मन परिवर्तन करून आत्मसमर्पणाचा मार्ग योग्य नाही याबाबत मार्गदर्शन करून लागणारे सर्व मदतीचा हात पुढे केला. रघुनाथ मोरेश्वर भट्ट यांनी योग्य मार्गदर्शन केल्यानंतर फडके यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग मागे घेऊन पुण्याकडे जाण्याचा निर्धार केला. यावेळी रघुनाथ भट यांनी त्यांची एका महान व्यक्तीशी ओळख करून दिली. ज्या व्यक्तीची ओळख करून देण्यात आली तो व्यक्ती म्हणजे इस्माईल खान हा होय. त्या भागातील इस्माईल खान या रोहिल्याच्या पुढार्याशी ओळख करून दिली. यावेळी इस्माईल खान याने पाचशे रोहिल्यासह फडके यांना येऊन मिळाले. त्याचबरोबर रघुनाथ भट्टानेसुद्धा चारशे माणसांचे पाठबळ मिळून दिले. हे महान कार्य रघुनाथ भट यांनी केले. आता 900 माणसाचे पाठबळ फडके यांना मिळाले. इस्माईल खान आणि वसुदेव बळवंत फडके यांच्या वाटाघाटी पूर्ण होण्याच्या आधीच वसुदेव बळवंत फडके गंगापूरात गेले. ते गांगणापुरात आल्याची बातमी इंग्रजांना कळाली. गांगणापूर येथे आल्याची बातमी इंग्रजाला कळताच त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने बक्षीस जाहीर केले. वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मेजर डॅनियल यांच्याकडे ही कामगिरी सोपवली. ते गांगणापुरात आहे असे समजतात संपूर्ण गावाला ब्रिटिश लष्कराने वेडा दिला. इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन गाणगापूर येथून पलायन केले. त्यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने बक्षीसही ठेवले. ते भूमिगत होऊन पंढरपूर येथे जात असताना 20 जुलै1879 इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या विरुद्ध फार मोठी लढाई सुद्धा केली. ही लढाई कलादगी शहरात घडली.एक गोष्ट येथे सांगण्यासारखी आहे की ते पळून जाण्यात यशस्वी झाले परंतु त्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे इंग्रजांच्या हाती पडले. या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये पुढील प्रकारचे कागद पत्रे इंग्रजाच्या हाती लागले. मुंबईच्या लष्कराचा एक नकाशा, गव्हर्नर चा खून केल्याचा पुरावा दर्शक कागद, आणि त्यांचे काही महत्त्वाचे त्यांनी लिहिलेले प्रतिष्ठित व्यक्तीला पत्र आणि इतर काही पुरावा दर्शक कागदपत्रे इंग्रजाच्या हाती पडल्यामुळे त्यांना त्याबाबत फार वाईट घटना झाली असे वाटले. काही काळ फडके हे निजामाच्या सैन्यातील आरोप रोहिले आणि शिक यांच्या पलटणीचे मुख्य सेनाधिकारी होते. याबाबतचा सुगावा हाती आलेल्या कागदपत्रावरून इंग्रजांना प्राप्त झाला. म्हणून वासुदेव बळवंत फडके यांनी आपले सर्व कार्य गुप्त रीतीने करू लागले. काही काळ ते भूमिगत राहिले. निजामशाहीचि पोलीस आयुक्त अब्दुल हक यांच्या मदतीने मेजर डॅनियल ने त्यांचा सतत पाठलाग सुरू ठेवला. त्यांचा सतत पाठलाग होत असल्यामुळे निजामाच्या लष्करातील काही सैनिकाच्या फितुरीमुळे वासुदेव बळवंत फडके यांचा ठाव ठिकाणा इंग्रजांना मिळाला. आता त्यांचा जोरदार पाठलाग सुरू झाला. विजापूर जिल्ह्यातील नावढगी या गावी एका बौद्धविहार मंदिरात निद्रास्थितीत त्यांच्या साथीदारासह अनुयासह अखेर इंग्रजांनी 21 जुलै १८७९ मध्ये पकडलं. फडके यांना पुणे येथे आणून त्यांच्यावर दंडविधानाच्या संहितेप्रमाणे कलम क्रमांक 121 ए, 122 आणि कलम क्रमांक 124 एक या कलमा अंतर्गत त्यांच्यावर फार मोठा खटला चालवला. न्यायालयात खटला सुनावणी सुरू झाली. न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती न्यूनहॅम यांनी अखेर त्यांना शिक्षा देण्याचे फर्मान काढले. न्यायाधीशांनी त्यांना या खटल्यात काळ्यापाण्याची शिक्षा दिली. व त्यांना न्यायाधीशाच्या परवानगीने 1880 च्या जानेवारी महिन्यात एडन तुरुंगात रवानगी केली. आता ते काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना तेथून 13 फेब्रुवारी 1883 रोजी तुरुंगाचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा बेत तिला पण तो फसला. पण ते अशक्यप्राय होते. त्यांचा पळून जाण्याचा बेत फसला. तुरुंगातून पळून जाऊ शकत नव्हते कारण सैनिकाचा बंदोबस्त फार मोठ्या प्रमाणावर इंग्रजांनी वाढवला होता. पळून जाण्याचा प्रयत्न बसल्यानंतर त्यांनी तुरुंगात आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. एडन तुरुंगाची उष्ण आणि दमट हवा यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली. तुरुंगात असताना त्यांना फार मोठा एक रोग झाला. त्या रोगाचे नाव क्षयरोग होय. शेरो गाणे ते पिछाडल्या गेले. वासुदेव बळवंत फडके यांनी अखेरीस अनग्रहण सोडले. काही प्रकारचे भोजन घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. अन्नाचा त्याग केला. त्यामुळे त्यांची दिवसेंदिवस प्रकृती फारच खालावली. एडन तुरुंगात त्यांच्या ओळखीचे फक्त एकच व्यक्ती होते ते म्हणजे डॉक्टर बर्वे.शेवटी वासुदेव बळवंत फडके एडन येथील कारावासात मरण पावले. मग शुद्ध एकादशी शके 1804 या दिवशी महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक यांचे निधन एडन तुरुंगात झाले. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे त्यांचे निधन 17 फेब्रुवारी 1883 रोजी एडन तुरुंगात झाले.
सारांश
महान आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके म्हणजे त्यांच्या जीवनातील एक धगधगती मशाल होय. 1857 च्या उठावातून प्रेरणा आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र इंग्रज सत्य विरुद्ध क्रांतीचा वनवा पेटवणारे जर भारतीय इतिहासात कोण म्हणून प्रसिद्ध असेल तर ते वासुदेव बळवंत फडके. कधी सैनिका बरोबर तर कधी एकाकी इंग्रज सत्तेच्या विरोधात महत्वपूर्ण लढा दिला. स्वतःच्या जीवनाचा विचार न करता हिंदुस्थानाला म्हणजेच भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्या साठी एक महान अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे वासुदेव बळवंत फडके कधीही कोणास शरण आले नाही. देशासाठी त्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा सहन करून शेवटी तुरुंगातच त्यांच्या जीवनाचा शेवट झाला. त्यांनी केलेल्या सशस्त्र उठाव क्रांतीमुळे देशातील अनेक तरुणांनी वासुदेव बळवंत फडके यांची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यलढा सतत चालू ठेवण्यात आला. म्हणूनच सर्व भारतीय त्यांना 'सशस्त्र क्रांतीचे जनक' म्हणून संबोधतात.
या लेखांमध्ये काही तांत्रिक त्रुटी आपणास आढळल्यास लेखकाशी संपर्क साधावा. त्रुटी योग्य असल्यास आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल.
FAQ
1) वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?
04 नोव्हेंबर1 885
2) वासुदेव बळवंत फडके यांच्या आजोबाचे नाव सांगा?
आनंदराव फडके.
3) वासुदेव बळवंत फडके यांचे कार्यालय त्यांनी कोठे स्थापन केले होते?
पुण्याजवळील लोणीकंद येथे त्यांचे कार्यालय स्थापन केले होते.
4) महान आद्य सशस्त्र क्रांतीचे जनक कोण होते?
वासुदेव बळवंत फडके
5) वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपट केव्हा प्रदर्शित झाला.
डिसेंबर 2007 मध्ये गजेंद्र अहिरे दिग्दर्शित मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील अवश्य वाचा.