Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षण मराठी माहिती Maratha Aarakshan Marathi Information

 मराठा आरक्षण मराठी माहिती | Maratha Aarakshan Marathi Information

प्रस्तावना

मित्रांनो, ' मराठा आरक्षण मराठी माहिती 'Maratha Aarakshan Marathi Information '  प्रदीर्घ काळापासून  ' 'मराठा आरक्षण ' या संबंधात प्रलंबित असणारा प्रश्न अखेर सुटला आहे. या संदर्भात आपण आजच्या लेखातून सविस्तर माहिती स्पष्टपणे लेखात नमूद करणार आहेत. मराठा आरक्षण बाबत महाराष्ट्र शासनाकडून या प्रश्नावर प्रदीर्घ चर्चा व न्यायालयीन संदर्भ तसेच जुन्या वंशावळ या आधारे शासनाने संपूर्ण तपासणी केल्यानंतर प्रलंबित असणारा प्रश्न निकाली काढला आहेत.मराठा आरक्षण मराठी माहिती 

Maratha Aarakshan Marathi Information
  Maratha Aarakshan Marathi Information


Maratha Aarakshan Marathi Information(toc)

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष तः विभागाने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, असाधारण क्रमांक 49 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र अधिनियमानुसार तयार केलेले भाग एक,  भाग एक -ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त नवीन नियम व आदेश राजपत्रात आधी सूचना जारी करून महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र अखेर निर्गमित झाले. " Maratha Aarakshan Marathi Information "

महाराष्ट्र शासन राजपत्राचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील सर्व मागास वर्ग व प्रवर्ग यांचा अभ्यास करून अधिनियम, 2000 नुसार जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्या जातीची पडताळणी विनियमन लक्षात घेऊन क्रमांक सीबीसी-2024/प्र.क.2/सर्व मागास प्रवर्गातील जमातीचा विचार करून जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी याबाबत अधिनियम, 2000 नुसार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत सन 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 13 यामधील कलम 18 च्या पोट- कलम (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या सर्व जातींच्या बाबत अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील मागास जाती ,जमाती, मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग त्याचबरोबर भटक्या जमाती आणि इतर विशेष मागास प्रवर्गाचा विचार करता जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या बाबत व पडताळणी नियमाच्या बाबत नियमानुसार वेळोवेळी सुधारणा करून 2012 मध्ये सुधारण्यासाठी जे नियम तयार करण्यात आले आणि त्याचा वापर करून एक विशिष्ट प्रकारचा नियमाचा मसुदा तयार करून त्यामुळे कोणत्याही मागास जातीसाठी बाधा न पोचता उपरोक्त अधिनियमच्या कलम 18 पोट- कलम(1) द्वारे आवश्यक असणाऱ्या सर्व व्यक्तीच्या साठी प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि या द्वारे एक नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे राजपत्रात प्रथम भागात नियम, कलमे आणि पोट कलमे उपरोक्त दर्शविण्यात आल्याप्रमाणे विचारात घेतले आहेत. " Maratha Aarakshan Marathi Information "

Maratha  Aarakshan  Marathi Information

महाराष्ट्र शासन राजपत्रात दर्शविल्याप्रमाणे दिनांक पूर्वी, उक्त मसुद्याच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे असे म्हटले आहे की कोणत्याही व्यक्तीला जर काही हरकती, सूचना किंवा कोणतीही समस्या प्राप्त झाल्यास त्या संदर्भात सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ,दालन क्रमांक 136 व137, पहिला मजला, विस्तार इमारत मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई 32 यांच्याकडे उपरोक्त दर्शविलेल्या दिनांक पूर्वी प्राप्त होईल अशा रीतीने पाठवल्यास त्या सर्व सूचना व हरकती महाराष्ट्र शासन विचारात घेऊन योग्य निर्णय घेईल.


महाराष्ट्र शासन राजपत्राचा नियमाचा मसुदा

Maratha  Aarakshan  Marathi Information

राजपत्रात नियमाच्या मसुद्यात त मुख्य दोन भाग करण्यात आले असून त्या दोन विभागातील आणि उपविभागातील सर्व नियमाचे स्पष्टीकरण आपण आज या लेखात स्पष्टपणे नमूद करणार आहोत.


मसुदा नियम क्रमांक एक

(1)राजपत्रातील मसुदा नियम क्रमांक एक सुधारित नियमावली म्हणून समजण्यात यावी. या नियमांमध्ये जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनियमन करून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग सुधारणा नियम 2024 असे म्हणावे लागेल.

मसुदा नियम क्रमांक दोन

(2) या मसुदा नियमात मागास जाती आणि प्रवर्ग नियम क्रमांक 2012 च्या नियम दोन व्याख्या मधील उपनियम एक मधील खंड क्रमांक (ज) नंतर खाली दर्शविल्याप्रमाणे उपखंड समाविष्ट करण्यात आले आहेत ते उपखंड अतिशय महत्त्वाचे असून त्यातील सर्व नियम आणि उपनियम तसेच कलमे हे विचारात घेऊन मराठा आरक्षण निश्चित केले आहेत.

मसुदा नियम क्रमांक दोन चे उपनियम आणि कलमे

(ज) ( एक) या नियमात खालील सगेसोयरे विचारात घेण्यात आले आहेत.

सगेसोयरे म्हणजे या वर्गातील सर्व नातेवाईक समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा. त्याच्या पलीकडे जाऊन त्या पूर्वीच्या अनेक पिढ्यातील पिढ्यामध्ये जातीमधील समाविष्ट झालेले लग्न आणि लग्नानंतर निर्माण झालेले सर्व नातेवाईक क समाविष्ट करण्यात येईल आणि असेल तसेच आपल्याच जातीतील विवाहातून जे नातेसंबंध निर्माण झाले त्यांचाही या नियमात स्पष्टपणे समावेश गृहीत धरून जातीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

Maratha  Aarakshan  Marathi Information

राजपत्रातील दुसऱ्या मसुद्यामध्ये नियम क्रमांक पाच मधील उपनियम क्रमांक सहा यांच्याही तरतुदी क्रमाक्रमाने विचारात घेऊन सर्व जोडण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद केले आहे. या नियमाच्या संदर्भाने आपण पुढील माहितीचे स्पष्टीकरण आपल्या लेखात स्पष्टपणे नमूद करणार आहे.

कुणबी समाजाचे स्पष्टीकरण

कुणबी समाजाची नोंद मिळवलेल्या नागरिकांच्या बाबतीत खालील नातेसंबंधात जात प्रमाणपत्र देण्यासाठी सर्व नोंदी विचारात घेऊनच मराठा आरक्षण संदर्भात कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

कुणबी समाजाच्या खालील नोंदी विचारात घेण्यात येणार आहे.

नागरिकाच्या रक्ताच्या नात्यातील काका, पुतणे, भाव -

भावभावकी  नातेवाईक, पितृसत्ताक पद्धतीतील सगे सोयरे आणि सर्व सगेसोयरे विचारात घेण्यात येणार आहे.

अर्जदाराने अशा प्रकारचे शपथ पत्र पुरावा म्हणून शासनाला सादर केल्यास उपलब्ध माहिती करून दिल्यास किंवा त्यासंबंधी गृह चौकशी करून मिळवलेल्या नागरिकांच्या नोंदी रक्त संबंधाचा पुरावा आणि सदस्यांचे शपथ पत्र नियमानुसार 2012 च्यानुसार विचारात घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल असे राजपत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

कोणत्याही मराठा समाजातील मराठा बांधवाला कुणबी समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत त्या नोंदीच्या आधारे आणि त्याच्या नात्यागोत्यातील सग्यसोय-यांना नोंदीच्या आधारे सर्व बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल.

याच नियमात असेही स्पष्ट म्हटले आहेत की, मराठा व्यक्तीला त्याच्या कुणबी समाजाची नोंद सापडली आहे त्यांचे जात कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येऊन त्या नोंदीच्या आधारे त्यांच्या सर्वच सगेसोयरे यांना गंगोतासी लग्नाच्या किंवा होणाऱ्या सोयरी सोयरकी होतात त्या सर्व नातेवाईकांना सजातीय सोयरीक म्हणून जात प्रमाणपत्राचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास त्याची गृह तपासणी करून त्यांनाही कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल किंवा देण्यात येईल. " Maratha Aarakshan Marathi Information "राज पत्रामध्ये अशी स्पष्ट केले आहे की, राजा राजा अंतर्गत कुणबी समाजाची नोंद प्राप्त करणाऱ्या नागरिकांच्या सजातीय झालेल्या वेळातून तयार झालेल्या नातेवाईका ंच्या संबंधामधील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर सर्व बाबतीत तपासणी करून सर्व तरतुदीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सदर विवाह जातीय आहे असा पुरावा प्राप्त झाल्यास त्या संबंधातील सर्व प्रकारचे पुरावे प्राप्त होतात अर्ज दाखल केल्यानंतर पुराव्याची पूर्तता झाल्यास कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

उपरोक्त दर्शविलेल्या स्पष्टीकरणांमध्ये ज्या नोंदी घेण्यात आले आहेत त्या नोंदी सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गासाठी लागू राहतील. म्हणजेच राजपत्रात स्पष्ट केल्याप्रमाणे कुणबी समाजासह इतर सर्व मागास जमाती ,भटक्या जमाती सर्व प्रकारचे मागासवर्ग यांच्यासाठी सुद्धा हे राजपत्र महत्त्वाचे आहेत. कारण त्यांनाही ह्या अटी लागू राहणार आहे.  " Maratha Aarakshan Marathi Information "

राजपत्रातील नियम क्रमांक 16 ते स्पष्टीकरण

(ज) कुणबी समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी उपलब्ध झालेल्या किंवा असलेल्या सर्व पुराव्याचा विचार करून पडताळणी समितीच्या निर्णयाची जात प्रमाणपत्र वैद्यता म्हणजे व्हॅलिडीटी ची साक्षांकित प्रत कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल किंवा संबंधित अर्जदाराने रक्त संबंधातील आपल्या वडिलांचे किंवा आपल्या सख्या काकांचे किंवा चुलत्यांचे तसेच वडीलाकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे किंवा सगे सोयरे यांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सारांश

कुणबी समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी आपल्या नातेवाईकातील किंवा कोणत्याही रक्ताच्या नात्यातील पुरावे उपलब्ध झाल्यास प्रमाणपत्र देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी वरील सर्व राजपत्रातील संपूर्ण स्पष्टीकरण विचारात घेऊन जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करून कुणबी समाजाला जात प्रमाणपत्राचा न्याय दिला आहे त्यामुळे आता कुणबी जात प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी त्वरित कागदांचे पुरावे जमा करण्याचे काम सुरू करून अर्जदाराने आपले राजपत्रात स्पष्टीकरण केल्याप्रमाणे तरतुदीनुसार जात प्रमाणपत्र प्राप्त करावे करिता राजपत्र निर्गमित केले आहेत.

FAQ

1) 26 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र कोणत्या कारणासाठी निर्गमित केले आहे?

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी राजपत्र निर्गमित केले आहेत.

2) दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी कोणत्या विभागाने महाराष्ट्र शासन राजपत्र निर्गमित केले आहे?

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

3) मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

आपल्या जातीचे नातेगोत्यांचे आणि रक्त संबंधाचे पुरावे उपलब्ध करून द्यावे लागतील.

4) महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये एकूण किती विभाग केले आहेत.

मुख्य दोन विभाग आणि कलम ज तसेच उपनियम नियम क्रमांक पाच किंवा नियम क्रमांक क्रमशः नोंदवलेल्या नोंदी देण्यात आल्या आहेत.

5) 26 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या राजपत्राद्वारे कोणत्या समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे लेख वाचू शकता.

 तणावाचे व्यवस्थापन  मराठी माहिती 

अधिक माहितीसाठी आमचा खालील व्हिडिओ पहा.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation