ई-कुबेर शालार्थ प्रणाली मराठी माहिती | E-Kuber shalarth Pranali Marathi Mahiti
![]() |
E-Kuber shalarth Pranali Marathi Mahiti |
प्रस्तावना
' ई- कुबेर शालार्थ प्रणाली ' ( E - Kuber Shalarth Pranali ) ही अतिशय महत्त्वाची योजना महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई 32 या विभागाने दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून अमलात आणली आहेत.या शालार्थ प्रणाली योजना मार्फत शिक्षकांचे वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यासाठी सुरू केली आहे. शासनाने यासाठी स्टॅन्ड बँक ऑफ इंडिया या बँकेची निवड केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या मार्फत (Cash Management Project) Manjeet) म्हणजेच सीएमपी योजना सुरू करून या योजने मार्फत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा जमा करणारी योजना शासन निर्णयाद्वारे अंमलात आणली आहेत. याच योजनेला म्हणतात." ई -कुबरशालार्थ प्रणाली मराठी माहिती " E-Kuber ". E-Kuber shalarth Pranali Marathi Mahiti
E-Kuber shalarth Pranali Marathi Mahiti(toc)
शासन निर्णयाचे संदर्भ
महाराष्ट्र शासनाने E - Kuber Shalarth Pranali हा निर्णय निर्गमित करण्यासाठी एकूण सहा संदर्भ विचारात घेऊन शासन निर्णय निर्गमित केला आहे. सर्व शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी संदर्भाचे अवलोकन करावे.
1)संदर्भ क्रमांक 2 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे परिपत्रक दिनांक 25 जून ,1973. चा शासन निर्णय.
2) संदर्भ क्रमांक 2 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे परिपत्रक दिनांक 3 ऑगस्ट, 2012 चा शासन निर्णय.
3) संदर्भ क्रमांक 3 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे परिपत्रक दिनांक 7 नोव्हेंबर, 2012 चा शासन निर्णय.
4) संदर्भ क्रमांक 4 वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 22 जानेवारी, 2013. शासन निर्णय
5) संदर्भ क्रमांक 5 वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 11 मार्च, 2020 शासन निर्णय.
6) संदर्भ क्रमांक 6 वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 चा शासन निर्णय.
वरील उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णय बाबत आज आपण माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करणार आहेत.
शासन निर्णयाची प्रस्तावना
1) " E-Kuber shalarth Pranali Marathi Mahiti " " ई -कुबेर शालार्थ प्रणाली मराठी माहिती " प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील सर्व खाजगी अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक आणि जिल्हा परिषद विभाग त्याचबरोबर नगरपालिका आणि महानगरपालिका आस्थापना अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर यांचे वेतन अदा करण्यासाठी प्रथम वेतना स कोषागार विभागाची म्हणजेच ट्रेझरी ची मान्यता मिळाल्यानंतर कोषागार विभागामध्ये वेतनाचा चेक किंवा ड्रॉप किंवा धनादेश तयार होऊन तो शाळेच्या (EFT account )संयुक्त खात्यात जमा करण्यात आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या कपाती वजा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्याची पद्धत आतापर्यंत आयोजित असल्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन किंवा पगार तसेच भत्ते अदा करण्यामध्ये फार मोठा विलंब होत होता. कर्मचाऱ्याला वेतन मिळण्याबाबत होणाऱ्या विलंबामुळे संदर्भ क्रमांक 2 नुसार महाराष्ट्र राज्यातील खाजगी अनुदानित आणि सर्व व्यवस्थापनांच्या शासकीय आस्थापना वर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते एका विशिष्ट इलेक्ट्रॉनिक्स निधी वितरण प्रणाली अंतर्गत अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकारात पुढील ॲप आहेत. (ESS/ EFT/ NEFT)
2))संदर्भ क्रमांक 2 नुसार कार्यवाही
E - Kuber Shalarth Pranaliसंदर्भ क्रमांक संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वये कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन करण्यासाठी संगणकीय शासन प्रणाली लागू करण्यात आली. या योजनेमार्फत जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अदा करण्यात येतात . शालार्थ प्रणाली मध्ये प्रथम शाळा ऑनलाइन बिल सादर करायची नंतर वेतन पक्का मार्फत ट्रेझरी कडे पाठवून ट्रेझरी ची मान्यता मिळाल्यानंतर अनेक टप्प्यातून आम्ही भिन्न भिन्न पद्धतीतून कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कपात करून कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन व भत्ते जमा करण्यास फार मोठा विलंब होत होता. यासाठी शासनाने "सेवार्थ" प्रणालीच्या धरतीवर शालार्थ संगणकीय प्रणाली लागू केली होती. ऑनलाइन शालार्थ प्रणाली मध्येही सुद्धा वेतनास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले.
3) संदर्भ क्रमांक चार नुसार कार्यवाही
E - Kuber Shalarth Pranaliसंदर्भ क्रमांक चार नुसार पुढील माहिती नमूद करण्यात आली आहे.सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन आणि भत्ते संबंधित कर्मचाऱ्याला आदा करताना फार मोठा विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तसेच कोषागरा कडून होणारे प्रदाने, आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यामार्फत ई- प्रणाली द्वारे वापर करून थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे शक्य असल्यामुळे संदर्भ क्रमांक चार नुसार शासन निर्णयाला अनुसरून निर्गमित झालेला शासन निर्णयाचा आधार घेऊन आदान व लेखा कार्यालय यांच्यामार्फत लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात येत होता. यासाठी जी प्रणाली वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी वापरण्यात येत होती. त्या प्रणालीला सीएमपी प्रणाली असे म्हणतात. CMP या प्रणालीचा वापर करून सर्व वेतन व भत्ते स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत काही विभागांमध्ये ही प्रणाली वगळण्यात आली आहेत. शासन निर्णयानुसार अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई, कोषागार कार्यालय , नागपूर व मराठवाडा विभागातील कोषागार कार्यालय सर्व वगळता कोषागार व उपकोषागार यांच्यामार्फत होणारी सर्व वेतन व भत्त्याचे प्रदाने स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत वेतन व भत्ते अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यानुसार कार्य निश्चिती सुद्धा निश्चित केली आहेत.
संदर्भ क्रमांक पाच नुसार कार्यवाही
E - Kuber Shalarth Pranaliमहाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या संदर्भीय क्रमांक पाच यासंदर्भाचा आधार घेऊन महाराष्ट्र शासन निर्णया द्वारे लाभार्थ्यांचे वेतन व भत्ते थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई तसेच नागपूर कोषागार कार्यालया कडील सर्व प्रकारची वेतन व भत्ते अनुदान करण्यासाठी नवीन प्रणाली सुरू केली आहे.
या नवीन प्रणाली साठी सर्व प्रकारची आदाने आणि प्रदाने आहरण व संवितरण अधिकारी यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याबाबत प्रणाली ई -कुबेर अमलात आणली असून या प्रणाली द्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची निवड करण्यात आली आहेत. यापुढे आता कर्मचाऱ्यांच्या थेट खात्यात वेतन व भत्ते तसेच प्रदाने आणि आदाने स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत जमा होणार आहेत.
संदर्भ क्रमांक सहा नुसार कार्यवाही
E - Kuber Shalarth Pranaliशासन निर्णयातील संदर्भ क्रमांक सहा नुसार शासन निर्णय निर्गमित केलेल्या पद्धतीनुसार आता कारण व संवितरण अधिकारी यांच्या मार्फत तयार केलेल्या भेयकाच्या प्राधिकार पत्राच्या आधारे कोषागार कार्यालयाकडून मध्यस्थ पद्धतीने म्हणजेच त्रयस्थ पद्धतीने आदाताच्या खात्यात सीएमपी CMP या प्रणाली द्वारे थेट रक्कम अदा करण्यात येत असल्याने आणि कर्मचाऱ्याला त्वरित विना विलंब वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी सदरची कारवाही आहरण व संवितरण अधिकारी तसेच कोषागार विभागामार्फत कार्यालयाने द्यावयाच्या दक्षता पूर्वक सूचना आणि काही आवश्यक पाटीच्या आधारे सूचना निर्गमित केल्या आहेत.
4) शासन निर्णयातील प्रस्तावनेत दर्शविलेल्या विभाग तीन मध्ये उपरोक्त संदर्भात अन्वये उपरोक्त सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हा परिषद मधील तसेच खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षक उत्तर कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट पगार जमा करण्यासाठी सीएमपी प्रणाली अमलात आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहेत संबंधित शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहू या.
शासन निर्णय स्पष्टीकरण
1)E - Kuber Shalarth Pranaliमहाराष्ट्रातील जिल्हा परिषद आस्थापनेवरील सर्व शिक्षक तसेच खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील आस्थापनावर कार्यरत असणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ,जानेवारी 2024 हे पगार ज्या जिल्ह्यांमध्ये ई-कुबेर E-Kuber प्रणाली सुरू असेल त्या जिल्ह्यात सर्व शिक्षकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी लाभार्थींच्या खात्यात ई- कुबेर E-KUBER प्रणाली द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन व भत्ते जमा करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. " E-Kuber shalarth Pranali Marathi
Mahiti "
2) E - Kuber Shalarth Pranaliभारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये ज्या जिल्ह्यात कुबेर योजना कार्यान्वित झाली असेल त्या जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार सीएमपी प्रणाली मार्फत म्हणजेच कुबेर प्रणाली मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. हे संपूर्ण काम स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी पूर्ण करण्यासाठी या शासन निर्णयात दर्शविलेल्या "परिशिष्ट अ "मध्ये देण्यात येणाऱ्या सर्व सूचनाचे काटेकोरपणे पालन सर्व आरण व सवितरण अधिकारी आणि त्या संदर्भातील सर्व कोषागार अधिकारी यांनी अचूक सूचनेचे पालन करण्याचे बंधन तसेच जबाबदारी आहरण व सवितरण अधिकारी यांच्यावर असल्यामुळे "परिशिष्ट अ" सूचनेचे पालन करावे." E-Kuber shalarth Pranali Marathi Mahiti "
3) E - Kuber Shalarth Pranaliसदरच्या शासन निर्णया नुसार महाराष्ट्र राज्य वित्त विभागाच्या सहमतीने व अनौपचारिक संदर्भ क्रमांक 2021/224/कोषागार प्रशासन विभाग पाच या संदर्भानुसार दिनांक 2 डिसेंबर 2021 या शासन निर्णयाचा आधार घेऊन ग्रामविकास विभागाच्या समतीने संदर्भ क्रमांक 1/2023 यासंदर्भानुसार शासन निर्णयाचा आधार घेऊन तसेच वित्त विभाग क्रमांक सहा दिनांक 25 नोव्हेंबर 2023 शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या शासन निर्णयाचा आधार घेऊन योग्य ती कार्यप्रणाली अमलात आणावी.
4)E - Kuber Shalarth Pranali सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्यासाठी निर्गमित केला आहेत . सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय आपण www.maharashtra.gov.in डाऊनलोड करू शकता. या शासन निर्णयाचा संकेतांक 2024 01041830541321 हा असून महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव यांच्या डिजिटल सहीने राज्यपालाच्या नावे प्रमाणित करण्यात आला आहे त्यानंतर या शासन निर्णयाची माहितीस्तव संबंधित सर्व विभागांना जवळजवळ 21 विभागाला प्रतिलिपी करण्यात आल्या आहेत.
सारांश
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 4 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयास योग्य कार्यवाही स्तव "परिशिष्ट अ" मध्ये शासन निर्णयाच्या अटी आणि नियम सोबत जोडलेल्या आहेत त्या सर्व अटी आपण शासन निर्णय डाउनलोड केल्यानंतर त्याचा संपूर्ण अभ्यास करून वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी कोषागार विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनासाठी सूचना अनुक्रमे एक ते 18 सूचना स्पष्टपणे नमूद केल्या आहेत म्हणून संबंधितांनी या 18 सूचनांचा परिशिष्ट अ प्रमाणे अभ्यास करून योग्य कार्यवाही करून आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नियमानुसार प्रमाणित केल्याप्रमाणे सीएमपी प्रणाली मार्फत सर्व प्रक्रिया अमलात आणून प्रत्येक प्रधानासाठी स्वतंत्र UTR क्रमांकाच्या आधार घेऊन संबंधित लाभ धारकांना म्हणजेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ंचे वेतन त्यांच्या योग्य खाते क्रमांक ची चौकशी करून तफावत असल्यास दुरुस्त करून लाभार्थीच्या खात्यात थेट ई -कुबेर E -Kuber प्रणाली मार्फत पगार जमा करावे. शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे परिशिष्ट अ मधील सूचनेचे काटेकोरपणे पालन करणे कोषागार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांना बंधनकारक आहे. मित्रांनो आपण शासन निर्णयासह परिशिष्ट अ सोबत लिंक डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची पीडीएफ साठी पुढील प्रमाणे लिंक देत आहोत. आपण ही लिंक डाऊनलोड करून त्याची पीडीएफ सुद्धा आपल्या माहितीसाठी अवगत करू शकता. करिता आपण संपूर्ण महत्त्वाची माहिती स्पष्टपणे या लेखात उपरोक्तपणे किंवा वर दर्शविल्याप्रमाणे नमूद केली आहेत.
शासन निर्णय लिंक पीडीएफ स्वरूपात खाली दर्शविल्याप्रमाणे आहेत.
लिंक
FAQ
1) कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पगार जमा करणाऱ्या प्रणालीचे नांव सांगा?
E-Kuber
2) महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांचे थेट पगार बँक खात्यात जमा करण्यासाठी कोणत्या बँकेची निवड केली आहे?
स्टेट बँक ऑफ इंडिया.
3) थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्यासाठी कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला?
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग.
4) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय कोणत्या दिनांक आला आहे?
4 जानेवारी, 2024.
5) हा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी शासनाने किती संदर्भ शासन निर्णय विचारात घेऊन शासन निर्णय निर्गमित केला आहे?
शासनाने सहा संदर्भ विचारात घेऊन शासन निर्णय निर्गमित केला आहे.
अधिक माहितीसाठी आपण आमचे लेख वाचू शकता.