मराठी भाषा गौरव दिन मराठी माहिती | Marathi Bhasha Gaurav Din Marathi Mahiti
![]() |
|Marathi Bhasha Gaurav Din Marathi Mahiti |
प्रस्तावना
मित्रांनो, आज आपण ' मराठी भाषा गौरव दिन मराठी माहिती ' 'Marathi Bhasha Gaurav Din Marathi Mahiti'या विषयावर सविस्तर माहिती या लेखातून अभ्यास करणार आहोत. कारण "मराठी भाषा " ही महाराष्ट्राची " राजभाषा" आहेत. दरवर्षी "मराठी भाषा गौरव दिन"२७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो." आपल्या महाराष्ट्रातील मराठी "ज्येष्ठ कवी वि .वा .शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज "यांचा जन्मदिन "मराठी भाषा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. म्हणून याबाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखातून स्पष्टपणे खालील प्रमाणे नमूद करणार आहे.
![]() |
Marathi Bhasha Gaurav Din Marathi Mahiti |
Marathi Bhasha Gaurav Din Marathi Mahiti(toc)
मराठी भाषा गौरव दिन" सविस्तर माहिती
महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी वि .वा .शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दिनांक १७ फेब्रुवारी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन "म्हणून साजरा करणे बाबत ,महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांनी दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला आहे. या अधिकृत शासन निर्णयानुसार साजरा करण्याचे सर्व नियम संपूर्ण अटी नमूद करण्यात आले आहेत. त्या संदर्भामध्ये शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खाली दर्शविल्याप्रमाणे संदर्भ विचारात घेऊन शासन निर्णय निर्गमित केला आहे. "Marathi Bhasha Gaurav Din Marathi Mahiti "
शासन निर्णय संदर्भ
खाली दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयासाठी तीन संदर्भ विचारात घेऊन "मराठी भाषा गौरव दिन "साजरा करण्याबाबत संदर्भानुसार संपूर्ण विचार करून खालील तीन संदर्भ आवश्यक पाहणे गरजेचे आहे.
१)संदर्भ क्रमांक एक मराठी भाषा विभागाचे दिनांक २१ जानेवारी, २०१३ चे परिपत्रक आवश्यक वाचा.
२) संदर्भ क्रमांक दोन मराठी भाषा विभागाचे दिनांक २४ जून ,२०२२ चे परिपत्रक आवश्यक वाचा.
३) संदर्भ क्रमांक तीन मराठी भाषा विभागाचे दिनांक २३ नोव्हेंबर, २०२२ चे परिपत्रक आवश्यक वाचा. हे संदर्भीय तीन परिपत्रक वाचल्यानंतर आपणा सर्व कल्पना येईल. या तीन संदर्भानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार" मराठी भाषा गौरव दिन "साजरा करण्यात येणार आहेत. निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे या लेखात स्पष्टपणे नमूद केलेले आहेत." Marathi Bhasha Gaurav Din Marathi Mahiti"
शासन निर्णय किंवा शासन परिपत्रक स्पष्टीकरण
१)महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी वि . वा. शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मराठी भाषेला ज्ञानभाषा प्राप्त करून देण्यासाठी सतत आपल्या लेखनातून कार्य केले." मराठी भाषा" ही महाराष्ट्राची ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र कठीण परिश्रम करून"मराठी भाषेला" ज्ञानभाषा म्हणून दर्जा प्राप्त करून दिला आहे. याबाबत संदर्भ क्रमांक एक मध्ये नमूद केल्या प्रमाणे दिनांक २१ जानेवारी, २०१३ च्या शासन निर्णयात संपूर्ण माहिती देण्यात आली आहेत. तेव्हापासून या शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग आणि कार्यालय यांना मराठी भाषा दिन साजरा करण्याबाबत शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे स्पष्टपणे सूचना नमूद केल्या आहेत. "Marathi Bhasha Gaurav Din Marathi Mahiti"
२) आपल्या महाराष्ट्राच्या मराठी ज्ञान भाषेचा प्रचार प्रसार जतन आणि संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा विभागाने शासन निर्णय दिनांक २४ जून २०२२संदर्भानुसार विविध कार्यक्रम राबवण्या बाबत आणि विशिष्ट कार्यक्रम आयोजित करण्याबाबत संपूर्ण माहिती संदर्भीय शासन निर्णयात दिल्याप्रमाणे मराठी भाषा विभाग व त्या विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना सदर विभागाच्या आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्पष्टपणे देण्यात आल्या आहेत. आपापल्या विभागामध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
३) महाराष्ट्रातील परंपरागत मराठी संस्कृती व आधुनिक काळातील तंत्रज्ञानाची जोड एकत्र करून विविध माध्यमाच्या मधून मराठी भाषेचा प्रचार प्रसार जतन आणि संवर्धन करण्यासाठी मराठी भाषेचा प्रचार प्रसार विषयक विविध स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विभागातर्फे "मराठी भाषा गौरव दिन "साजरा करण्यासाठी पुढील प्रमाणे स्पष्ट स्वरूपात सूचना देण्यात आल्या आहेत. त्या सूचना विचारत घेऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे .हा मुख्य हेतू आहे. संबंधित शासन निर्णयातील सूचना खालील प्रमाणे देण्यात येत आहेत.
शासन निर्णयातील सूचना
१) महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यावर्षी ३५० या राज्यभिषेकां चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारा मराठी माणसाच्या मनात रुजवण्यासाठी"३५० वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचारावर आधारित मराठी भाषेत उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या बाबत "मराठी भाषा गौरव दिन"कार्यक्रमांमध्ये चर्चासत्र, व्याख्यान ,परिसंवाद आणि साहित्यांचे अभिवाचन विविध कार्यक्रमाचे आयोजन करून "मराठी भाषा गौरव दिन "साजरा करावा.
२) मराठी भाषा विभाग आणि या विभागांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व विभागाने एकत्रित येऊन तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून मराठी भाषेची वाटचाल व प्रगती याबाबत संपूर्ण माहिती क्षेत्रीय कार्यालयाने एकत्रित येऊन एकत्रितपणे विविध माध्यमाच्या स्वरूपा तून प्रसारित करण्यात यावी.
३) महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मराठी भाषा व साहित्य तसेच प्रचार आणि प्रसार व संवर्धन करण्यासाठी सतत कार्यरत राहून स्थानिक पातळीवर मराठी भाषा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मराठी भाषा बाबत संवर्धक, संशोधक लेखक साहित्यिक याबाबतीत संबंधित जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्या स्तरावर आयोजित करणे.
४) मराठी भाषा विभागाने आपल्या स्तरावरून आपल्या चारही विभागांमध्ये मराठी भाषेच्या बाबतीत मराठी भाषा अधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मार्फत त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्ह्यात मराठी भाषेचे जतन प्रचार प्रसार व संवर्धन वर्षभर करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संपूर्ण कार्यक्रम आयोजन करून वर्षभर हा कार्यक्रम महाराष्ट्रीयन मराठी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करण्याच्या बाबतीत सर्व सूचना मराठी विभागाकडून देण्यात याव्यात.
५) विविध प्रसार माध्यमाच्या साह्याने मराठी भाषेचा प्रचार, प्रसार ,जतन आणि संवर्धन करण्यात यावा त्याचबरोबर विविध स्पर्धा तसेच पुस्तके आणि मराठी कोश यांच्यावर चर्चा करून अनेक ठिकाणी परिसंवाद आणि व्याख्याने आयोजित करण्यात यावी. हे संपूर्ण काम प्रसारमाध्यमाच्या मार्फत आयोजित करण्यात यावेत
६) मराठी भाषा विभागाने काळाची गरज ओळखून ऑनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त चर्चासत्रे तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करत असताना महाराष्ट्रीयन तरुण पिढीला रोजगार रोजगाराभिमुख जास्तीत जास्त उपक्रम घेऊन सर्व शासकीय कार्यालयामार्फत याबाबतीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे किंवा करावे. ऑनलाइन पद्धतीने शक्य तेवढे उपक्रम घेण्यात यावे.
७) महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ, मुंबई, राज्य मराठी विभाग संस्था ,मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई, मराठी भाषा संचालनालय मुंबई, आणि मराठी भाषेविषयी असणाऱ्या सर्व संस्थेने वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन तयार करून वेळापत्रक तयार करावे आणि वेळापत्रकाप्रमाणे वर्षभर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार तसेच संवर्धन करावे व त्या संबंधित असणारा संपूर्ण अहवाल शासनास सादर करण्यात यावा.
८) मराठी भाषा विषयक महाराष्ट्र स्थापन झालेल्या सर्व संस्थेने ऑनलाइन पद्धतीने विविध तज्ञांच्या मदतीने ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून मराठी भाषेचे जतन ,प्रचार ,प्रसार आणि संवर्धन करावे.
९) महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत विविध प्रसारमाध्यमा च्या द्वारे संबंधित मराठी भाषा विभागाने आपल्या संकेतस्थळावरून तसेच अनेक प्रसार माध्यमाच्या मार्फत मराठी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करावी. यासाठी आपणास आकाशवाणी दूरदर्शन, व्हाट्सअप ,ट्यूटर ,फेसबुक, नेटवर्क, एफएम रेडिओ आणि स्थानिक नेट केबल नेटवर्क तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रावरून मराठी भाषेबद्दल जागृती निर्माण करणे अत्यंत प्रभावशाली कार्यक्रम घेता येईल.
१०) आपल्या महाराष्ट्राच्या मातृभाषेची माहिती तसेच समाज जीवनातील मराठीचे स्थान आणि भाषांचे व्यक्तिगत स्वरूप लक्षात घेऊन विचार मंथन पूर्वक कार्यक्रम अनेक विचारवंताचे विचार संकलित करून त्यासाठी "मानसशास्त्र व शिक्षण शास्त्र "या विषयातील विचारमंथन कार्यक्रम आयोजित करणे
११) मराठी भाषेचा सकस विकास व नव्या माहितीच्या आधारे आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान यावर आधारित असणाऱ्या मराठी पुस्तके वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अनेक मराठी संस्थेने राज्यभर हा कार्यक्रम आयोजित करावा.
१२) जनसंपर्क महासंचालय च्या मार्फत आकाशवाणी व दूरदर्शन वरून अनेक मराठी भाषिक मान्यवरांच्या मुलाखती व परिसंवाद आयोजित करावे.
१३) मराठी साहित्या बाबत आणि मराठी कोश याबाबत ऑनलाईन पद्धतीने विचारवंता चे आणि साहित्यिकांचे व्याख्याने चर्चासत्र परिसंवाद आणि कार्यशाळा तसेच अनेक साहित्यिकांच्या मुलाखतींचे तंत्र आयोजित करावे.
१४) ऑनलाइन पद्धतीने मराठी प्रचार आणि प्रसारासाठी उपक्रम म्हणजेच नवीन कृती संशोधन मराठीतून अभिनव कल्पना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
१५) महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबत प्रचार आणि प्रसार करून त्यासंबंधी कार्यालयात मराठीचा वापर कसा करावा या संबंधाने चर्चासत्र आणि परिसंवाद त्याचबरोबर कार्यशाळा आणि त्या कार्यशाळांमध्ये मराठी भाषेच्या प्रचार बाबत योग्य कार्यक्रमाचे सादरीकरण करून मराठीचे संवर्धन करावे.
१६) इंटरनेट व सोशल मीडियाच्या मार्फत मराठी भाषेच्या संबंधित तंत्रज्ञान व मराठी भाषेबद्दल तज्ञ व्यक्तीचे व्याख्याने आणि सादरीकरण त्याचबरोबर जागतिक इंटरनेट वर मराठी कार्यक्रम कसे आयोजित करता येईल त्यासाठी प्रयत्न करणे आणि मराठीत चा प्रचार आणि प्रसार करावा .
१७) मराठी भाषा बाबत मराठी भाषेचे शब्द भंडार आणि नवीन पर्याय शब्द निर्मिती तसेच शब्दकोडे याबाबतच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे.
१८) सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धा आणि मराठी सुलेखन या संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
१९) मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने निर्माण केलेल्या अनेक मराठी भाषिक संस्थें ना आणि त्या संस्थेने निर्माण केलेल्या विविध प्रकल्पांना भेटी देण्याचे कार्यक्रम आयोजन करण्यात यावे.
२०) प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीने स्वयं:मप्रेरणेनकाम करून मराठी भाषेचा प्रचार ,प्रसार, जतन व संवर्धन करताना यासाठी विविध मार्गाने तसेच विविध व्यक्ती आणि संस्था यांच्या कार्यास प्रोहसन देण्यासाठी त्यांच्या या कार्याचा गौरव व सत्कार करण्याबाबत कार्यक्रम आयोजित करावा.
२१) महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाने वर्षभर विविध कार्यशाळेचे आयोजन करून मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आजच्या संकेतस्थळावर मराठी भाषे संबंधीच्या नोंदी वाढवण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहणे आणि विश्वकोश मधील नोंदी अद्यावत करण्याचे काम करावे.
२२) महाराष्ट्र राज्याच्या अधिकार कक्षेतील सर्व कार्यालयाने आपले शासकीय कामकाज 100% मराठीतून आवश्यक करावे त्याचप्रमाणे महाराष्ट्र भाषा अधिनियम १९६४ नुसार वर्जित प्रेरणेने काही बाबी वगळता सर्व कामकाज मराठीतून करावे. महाराष्ट्रात काही केंद्र सरकारच्या कार्यालयात किंवा क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्रिभाषा सूत्र ही वापरण्यास विचार करण्यात यावा.
२३) मराठी भाषेच्या संकेतस्थळावर त्याचबरोबर अनेक क्षेत्रीय संकेतस्थळावर व भाषा संचालनालयाने आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळांनी मोबाईलच्या द्वारे उपयोजन करून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी विविध कार्यक्रमातून मराठी माध्यमाचा वापर करून सर्व कार्यक्रम मराठीतून मोबाईल द्वारे प्रसारित करावे.
२४) उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे सूचना क्रमांक ०१ ते २३ चा वापर करताना महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्र राज्य मराठी संस्कृती मंडळ मुंबई, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, भाषा संचालनालय मुंबई आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई यांनी शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे सूचना क्रमांक २४ मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संबंधित संस्थेला मदत करावी यासाठी कलम क्रमांक २४ मध्ये ०६ भाग दर्शविले असून या ०६ भागाचे विभाजन वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी आयोजित केले आहे. त्याप्रमाणे तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे,३६ जिल्ह्याचे वर्गीकरण केले असून त्या वर्गीकरण प्रमाणे कार्यक्रम , साहित्य वाटप आणि मदत करण्याचे आयोजन करावे.
२५) महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या शासन निर्णयामध्ये वर दर्शविलेल्या सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी भाषा संचालनालय, मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई आणि मराठी विकास संस्था मुंबई यांनी सूचना क्रमांक २४ मध्ये दर्शविलेल्या तक्त्याप्रमाणे संबंधित संस्थेला साहित्याची मदत देण्यात येईल.
२६) महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र मंत्रालयातील सर्व विभाग त्याचबरोबर विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधितांचे सहकार्य घेऊन ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस शासन निर्णयात निर्गमित केलेल्या अटी आणि नियमानुसार" मराठी भाषा गौरव दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करावा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सहभागी करून घ्यावे. करिता महाराष्ट्र शासनाने १९ डिसेंबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहेत.
सारांश
महाराष्ट्र शासन मराठी राजभाषा विभागातर्फे कमीत केलेल्या शासन निर्णयाच्या आधारे शासन निर्णयात दर्शविलेल्या सूचना ०१ ते २६ दर्शविल्याप्रमाणे "मराठी भाषा गौरव दिन " संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्याच्या दृष्टीने अधिकृत केला आहे. या शासन निर्णयाप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा अहवाल तयार करून शासनास सादर करावा.
FAQ
१) वि वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस काय म्हणून साजरा केला जातो?
"मराठी भाषा दिन" म्हणून साजरा केला जातो.
२) मराठी भाषा दिन दरवर्षी कोणत्या दिनांक साजरा करण्यात येतो?
२७ फेब्रुवारी.
३) महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी किती संदर्भ घेतले आहेत?
०३ संदर्भ.
४) वि. वा. शिरवाडकर यांचे उर्फ नांव काय आहे?
कुसुमाग्रज.
५) वि वा शिरवाडकर यांच्या लाडक्या बहिणीचे नांव सांगा?
कुसुम.
अधिक माहितीसाठी आपण आमचे आवश्यक खालील लेख वाचा.