मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मराठी माहिती |Marathi Bhasha Swardhan Pandarwada Marathi Mahiti
प्रस्तावना
मित्रांनो ,आज आपण 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक १४ जानेवारी , २०२४ते २८ जानेवारी २०२४ '(Marathi Bhasha Swardhan Pandarwada Sajara Kanya Babat Marathi Mahiti)या कालावधीतच्या दरम्यान साजरा करणे करणे बाबत महाराष्ट्र शासन, मराठी भाषा ,विभाग मुंबई . या विभागाने दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण आपण आज आपल्या लेखांच्या माध्यमातून करणार आहे.
शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यासाठी शासन स्तरावरून याबाबत संदर्भीय शासन निर्णय मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक मभापं-२०१९/प्र.क्र.१११/भाषा-२, दिनांक १८ सप्टेंबर २०२०या प्रमाणे निर्गमित झालेला होता. १८डिसेंबर २०२० चा शासन निर्णय मराठी भाषेचा संदर्भ शासन निर्णय आवश्यक वाचा.

|Marathi Bhasha Swardhan Pandharwada Marathi Mahiti |
संदर्भ शासन निर्णय ची लिंक
आपल्या माहितीसाठी देण्यात आली आहे. संदर्भीय शासन निर्णयाची लिंक पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. आपण ही लिंक डाऊनलोड करून संदर्भीय शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात प्राप्त करू शकता.
संदर्भीय शासन निर्णय मराठी भाषा पंधरवाडा साजरा PDF
शासन निर्णया बाबत सविस्तर माहिती
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णया बाबत सविस्तर माहितीचा अभ्यास आपण या लेखात करणार आहोत.
शासन निर्णयाची प्रस्तावना
"मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक १४ जानेवारी , २०२४ते २८ जानेवारी २०२४ "(Marathi Bhasha Swardhan Pandarwada Sajara Kanya Babat Marathi Mahiti" ) महाराष्ट्र राज्यातील अधिपत्याखाली असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये तसेच राज्यातील सर्व महामंडळे आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील कार्यरत असणारे सर्व कार्यालये, सर्व महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारे उपक्रम, सर्व खाजगी बँका आणि व्यापारी बँका तसेच सर्व शैक्षणिक संस्था त्याचबरोबर विद्यापीठे आणि महाविद्यालय केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली करत असणारे उपरोक्त मंडळे महाराष्ट्रातील पण केंद्र सरकारच्या आदेशान्वये कार्य करणारे मंडळे यांच्या आस्थापनेवरील सर्व कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.
खाजगी व निम खाजगी विभाग
महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या खाजगी व निम खाजगी विभागात काम करणाऱ्या संस्था व मंडळे आणि कार्यालये यांनी शासन निर्णयाप्रमाणे दिनांक १४ जानेवारी २०२४ते २८ दिनांक, २ जानेवारी २०२४ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाने निर्गमित केलेल्या १८ डिसेंबर २०२३ नुसार महाराष्ट्राची राजभाषा मराठी असल्यामुळे मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त सर्व कार्यालयातून करण्यात येण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देऊन त्या भाषेचा महाराष्ट्रात सर्व कार्यालयात व्यवहार मराठीतून होण्यासाठी दरवर्षी मराठी विभागाकडून "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी ,२०२४या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्र शासनाच्या भाषा
दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसालाबादप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित केला आहे कारण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त सर्व कार्यालयामधून"मराठी भाषा संवर्धन पंधरवडा"साजरा करण्यासाठी शासन स्तरावरून शासन निर्णय निर्गमित करून सूचना देण्यात आल्या आहेत.
शासन निर्णय निर्गमित करून सूचना देण्यात आलेल्या सूचनेनुसार सन २०२३ -२०२४यावर्षी देखील मराठी भाषेच्या संदर्भामधील विविध उपक्रम व कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आपापल्या कार्यालयातून आयोजित करण्यासाठी सर्व कार्यालयांना रीतशीर नियमानुसार शासन निर्णय निर्गमित करून सर्व कार्यालयांना सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यामुळे शासनाने" मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा "करण्याचा शासन निर्णय व त्या संबंधाने परिपत्रक निर्गमित केले आहेत."मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक १४ जानेवारी , २०२४ते २८ जानेवारी २०२४ " (Marathi Bhasha Swardhan Pandarwada Sajara Kanya Babat Marathi Mahiti)
महाराष्ट्र शासन निर्णय परिपत्रकाचे स्पष्टीकरण
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक १४ जानेवारी , २०२४ते २८ जानेवारी २०२४ Marathi Bhasha Swardhan Pandarwada Sajara Kanya Babat Marathi Mahitiमहाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग मुंबई. या विभागाने दिनांक १९ डिसेंबर २०२३रोजी मंगळवारी महाराष्ट्र राज्याच्या संकेतस्थळावर शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाप्रमाणे यावर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अतिशय उत्कृष्ट ,सुयोग्य आणि अतिशय उत्तम विविध कार्यक्रम आयोजित करून दिनांक १४ जानेवारी,२०२४ ते २८ जानेवारी, २०२४ या कालावधीत विविध प्रकारचे समारंभ पूर्वक नियोजन करून नियोजन करून साजरा करण्यात यावा.
सुयोग्य कार्यक्रम
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांना खालील प्रमाणे सूचनाही देण्यात येत आहेत आणि दिलेल्या सूचनेप्रमाणे सुयोग्य कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाने शासन निर्णयानुसार पुढील प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत.
मराठी भाषेसंबंधी निरनिराळ्या प्रकारचे सुयोग्य कार्यक्रम खाली दर्शविल्याप्रमाणे आयोजित साहित्य वितरण पुरस्कार यांचे आयोजन करणे यामध्ये खालील प्रमाणे कार्यक्रम नियोजन करून यशस्वी कार्यक्रम घेणे
अ) महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांनी करावयांचे कार्यक्रम
१)विविध परिसंवाद/मराठी वाड्:म्या संबंधी परिसंवाद/व्याख्याने/कार्यशाळा/शिबिरे/कवी संमेलने/मराठी एकांकिका/बाल नाट्ये/नाटके/पुस्तक प्रकाशन समारंभ/साहित्य पुरस्कार वितरण२) मराठी भाषेत निबंध/प्रश्नमंजुषा/कथाकथन/चारोळी लेखन/कथालेखन/कविता लेखन/हस्ताक्षर/शुद्धलेखन/वक्तृत्व/घोषवाक्य/अभिवाचन/वादविवाद/अंताक्षरी/शब्दकोडी/मराठी साहित्य संबंधित पुस्तकाचे रसग्रहण/समीक्षण/परिच्छेद अनुवाद इत्यादी स्पर्धा घेणे.
३) मराठी वाचन संस्कृती वाढावी या दृष्टीने मराठी भाषेतील अभिजात ग्रंथाचा परिचय करून देण्यासाठी मराठी भाषेतील नामवंत तज्ञ व्यक्ती किंवा लेखक किंवा वक्ते यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन ,परिसंवाद आणि कार्यशाळा यांचे आयोजन करावे.
४) ग्रंथ प्रदर्शन ,ग्रंथ दिंडी, कथाकथन, काव्यवाचन, माहितीपट इत्यादी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे.
५) वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी असणाऱ्या मराठी व्यक्तीचा सत्कार करून त्यांच्या मुलाखती बाबत नियोजित कार्यक्रम राबवणे.
६) मराठी भाषिक लोकांना सुलभ पद्धतीने मराठी भाषेचा परिचय करून देण्याच्या दृष्टिकोनातून कार्यशाळा आयोजित करून त्या कार्यशाळेत मराठी विषयाचे ज्ञान देऊन स्पर्धा आयोजन करणे.
७) मराठी भाषेतील विविध प्रसारमाध्यमाच्या साह्याने मराठी माणसापर्यंत मराठी भाषेचा ज्ञान व संवर्धन व विकास यासंदर्भात मीडिया मार्फत प्रसार करणे आणि संदेश प्रसारित करावेत. डिजिटल युगामध्ये भरपूर प्रसार माध्यमे आहेत त्या सर्व माध्यमाद्वारे मराठी भाषेचा प्रसार करणे.
८)स्वतःहून स्व: प्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्तीने मराठी भाषेचा प्रचार प्रसार व विकास यासाठी स्वतः विविध मार्गाच्या सहाय्याने आणि स्वयंप्रेरणे काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्या कार्यास प्रसंग देऊन त्यांचा गौरव व सत्कार करणे.
९) युनिकोड मराठीचा टंकलेखना करता जास्तीत जास्त वापर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतः स्वयंप्रेरणेने संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे.
१०) महाराष्ट्रात मराठीचा प्रचार व प्रसार हा विशिष्ट उद्दिष्ट रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी मिळाले विषय घेऊन तशा स्वरूपाचे अन्य कार्यक्रम राबवणे. या अंतर्गत पुढील कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे. यासंदर्भामधील खालील कार्यक्रम आयोजन करणे
१) अनुवादलेखन२) व्यवसायाभिमुख लेखन ३) पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया ४) स्व - प्रकाशन५)ई-बुक ६) ऑनलाइन पुस्तक विक्री ७) लेखक प्रकाशन करार ८) संहिता लेखन ९) विकिपीडिया कार्यशाळा १०) डॉक्युमेंटरी लेखन किंवा शॉर्ट फिल्म
११) मराठी वाचन संस्कृतीची जोपासण्यासाठी सर्वांनी मराठी साहित्य स्वयंस्पृतिने वाचणे पुस्तके विकत घेणे आणि इतरांना भेट देणे यासारखे उपक्रम राबवणे.
१२) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुस्तकाची जत्रा आयोजित करून लोकांना स्वस्त दरात किंवा नि:शुल्क पुस्तके भेट म्हणून देणे आणि मराठीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जत्रेतील महत्त्वाचे पुस्तकाबाबतचे स्टॉल लावणे.
१३) महाराष्ट्र राज्यात संपूर्ण शासकीय कामकाज १००% मराठी भाषेतून करून मराठी भाषेचा प्रचार करणे तसेच केंद्र शासनातील अधिपत्याखालील कार्यालयात त्रिसूत्रीय कार्यक्रम आयोजित करणे तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी भाषा समिती मार्फत विविध उपक्रम राबवून या संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम आदेश आणि अधिनियम संबंधिताच्या निदर्शनास आणावे.
१४) महाराष्ट्रातील सर्व संस्थांनी समाज माध्यमावर आधारित "मराठी वाचन कट्टा "निर्मिती करून त्या मार्फत मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे.
१५) महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी भाषेचा राज दर्जा आणि प्रचार तसेच प्रसार व विकास करण्यासाठी विविध कार्यक्रम आपापल्या स्तरावर राबवण्यात यावे.
१६) महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयाने मराठी भाषा विकास संस्थेच्या समन्वयाने मराठी भाषेला राज दर्जा प्राप्त करून देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन नियोजनात्मक पद्धतीने करून पंधरवाडा साजरा करणे.
ब) आयोजन व कार्यवाही
शासन निर्णयातील अ विभागात दिलेले विविध अनुक्रमे एक ते १६कार्यक्रमाचे आयोजन व कार्यवाही राज्यस्तरावर साहित्य संस्थेच्या मदतीने योग्य प्रकारे कार्यवाही करावी त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम राबवण्यासाठी शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे ३६ जिल्ह्यामध्ये राज्यस्तरावरील मराठी भाषेचा गौरव व भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात यावा. त्यासाठी राज्य मराठी विकास संस्था यांनी शासन निर्णयात दर्शविलेल्या प्रमाणे सर्व जिल्ह्यांचे कार्यक्रम आयोजित करावे.
एक ते सहा विभाग
शासन निर्णयात अनुक्रमे एक ते सहा विभाग तयार करून त्यानुसार दुसऱ्या स्तंभामध्ये दर्शविल्याप्रमाणे साहित्य संस्थांना यांनी योग्य कार्यवाही करण्यासाठी तक्त्यातील स्तंभ क्रमांक तीन मध्ये दर्शविल्याप्रमाणे साहित्य संस्थेच्या अंतर्गत जिल्ह्याची विभागणी चे वर्गीकरण करून देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे योग्य कार्यक्रमाचे जिल्हा निहाय वेगवेगळ्या संस्थेने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करून मराठी भाषेचे संवर्धन करण्यात यावे. |"Marathi Bhasha Swardhan Pandarwada Sajara Kanya Babat Marathi Mahiti "
उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे "अ "आणि "ब"विभागात दर्शविल्याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करणे.
क) शासन निर्णयातील उर्वरित विभाग
1)मराठी माणूस जर प्रदेशात
महाराष्ट्रातील मराठी माणूस जर प्रदेशात असेल तर तेथे त्यांनी या शासन निर्णयाप्रमाणे "अ "मध्ये दर्शविल्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करावे.
2) मोबाईल,इंटरनेट माध्यम
शाळा आणि महाविद्यालयांनी भाषा संचालनालय च्या मार्फत मराठी विश्वकोश मंडळ निर्मिती प्रमाणे मोबाईलच्या मार्फत योग्य मराठी माणूस जर प्रदेशात सुरू करून विद्यार्थ्यांपर्यंत मराठी भाषांचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील चारही क्षेत्रीय कार्यालयात करण्यात यावी व त्याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करावे. इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा मराठीचे संवर्धन व जतन करावे
3)परिच्छेद ब मध्ये दर्शविल्याप्रमाणे साहित्य संस्थांची मदत
महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाने मराठी भाषेचा प्रचार व प्रसाराचे निर्धारित शासन निर्णय दर्शवलेले कार्यक्रम तसेच महसूल विभागाने जिल्हास्तरावरील राबवण्यासाठी संबंधित विभागास निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय दिनांक २४/०६/२०२२ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे योग्य कार्यवाही करून सदर कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नियोजन व आयोजन करून मराठी भाषा संचालनालय ,मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ,मुंबई आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,मुंबई त्याचबरोबर राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांनी शासन निर्णयातील परिच्छेद ब मध्ये दर्शविल्याप्रमाणे साहित्य संस्थांची मदत घेता येईल व मराठी भाषेचे संवर्धन करता येईल. " Marathi Bhasha Swardhan Pandarwada Sajara Kanya Babat Marathi Mahiti"
ड) आयोजन आणि नियोजन
महाराष्ट्र राज्याने आपल्या अधिकार क्षेत्रातील अधिपत्याखाली कार्यक्षेत्रात वर दर्शविल्याप्रमाणे म्हणजे शासन निर्णयाप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करून पंधरवाडा साजरा करणे. दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणे बाबत शासन निर्णयातील दुसऱ्या विभागात दर्शविल्याप्रमाणे अ,आ,इ,ई,उ,ऊ,ए,ऐ या उपमुद्याच्या आधारे योग्य प्रकारे सेवा विविध कार्यालयाला पुरवण्यात याव्या याचे संपूर्ण वर्णन शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे पहावे. या शासन निर्णयाची लिंक पीडीएफ स्वरूपात देण्यात येणार आहे.
इ) आर्थिक तरतुदीतून निधी
या कार्यक्रमासाठी येणारा संपूर्ण खर्च संबंधित विभागाने आपल्या कार्यालयाच्या किंवा विभागाच्या मार्फत कार्यालयाने मंजूर केलेल्या खर्चा प्रमाणे आर्थिक तरतुदीतून निधी अदा करावा.
४) शासन निर्णयातील विभाग एक ते तीन मध्ये उपरोक्तपणे दर्शविल्याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम यशस्वी करणे आणि कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजेच पंधरवाडा साजरा केल्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाचा अहवाल संबंधित विभागास सादर करण्यात यावा
सारांश
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक १४ जानेवारी , २०२४ते २८ जानेवारी २०२४ Marathi Bhasha Swardhan Pandarwada Sajara Kanya Babat Marathi Mahitiदरवर्षीप्रमाणे याही वर्षी सालाबादप्रमाणे मराठी भाषेचा गौरव तसेच संवर्धन प्रचार आणि प्रसार शासन निर्णयात दर्शविलेल्या नियमानुसार योग्य कार्यवाही करून संपूर्ण अहवाल शेवटी महाराष्ट्र शासनाला शासकीय स्तरावर सादर करणे गरजेचे आहेत करिता आपण या शासन निर्णयाचे संपूर्णपणे सविस्तर स्पष्टीकरण उपरोक्त नियमानुसार केले आहेत.
शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या संकेतस्थळावर राज्यपालाच्या नावे महाराष्ट्राचे आवर सचिव यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित करून योग्य कार्यवाहीस्तव निर्गमित केला आहे.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक १४ जानेवारी , २०२४ते २८ जानेवारी २०२४ Marathi Bhasha Swardhan Pandarwada Sajara Kanya Babat Marathi Mahiti
संबंधित शासन निर्णय याची लिंक खालील प्रमाणे देण्यात आली असून आपणास आवश्यकता वाटल्यास डाऊनलोड करून पीडीएफ स्वरूपात प्राप्त करू शकता.
शासन निर्णय लिंक
महाराष्ट्र शासन निर्णय भाषा विभागशासन निर्णय
FAQ
१) दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा केव्हा साजरा करण्यात येतो?
दिनांक १४ जानेवारी ते २८जानेवारी ,२०२४ या कालावधीत साजरा करण्यात येतो.
२) हा पंधरवडा साजरा करण्याचा शासन निर्णय कोणत्या विभागामार्फत निर्गमित करण्यात आला?
महाराष्ट्र शासन भाषा विभाग ,मुंबई
३) मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्याचा शासन निर्णय कोणत्या दिवशी निर्गमित करण्यात आला आहे?
१९ डिसेंबर २०२३
४) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे?
मराठी.
५) महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील कार्यालयात किती भाषा वापरासाठी निश्चित करण्यात आल्या आहे?
तीन भाषा निश्चित करण्यात आल्या आहेत
त्रिभाषीय सूत्राचा वापर केंद्र सरकारच्या कार्यालयाने आपल्या कार्यालयात दैनिक व्यवहार करताना वापरण्यास परवानगी आहे.