ई-ऑफिस प्रणालीच्या वापरा संदर्भात मराठी माहिती | E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti
प्रस्तावना
मित्रांनो,आजच्या आधुनिक डिजिटल युगात संगणक वापर व ऑनलाइन पद्धतीने कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी शासनाच्या विचाराधीन ही बाब असल्यामुळे शासनाने ई-ऑफिस कार्यप्रणालीच्या वापरा संदर्भात| E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti सविस्तर या प्रस्तावावर अभ्यास करून महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये ई- प्रणालीचा वापर होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
मित्रांनो,आपण ई-ऑफिस कार्यप्रणालीच्या संदर्भातील शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहू या.| " E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti"यासंदर्भामध्ये सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाबाबत सविस्तर माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे. माहिती आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी माहिती आवश्यक शेअर करा.
ई -ऑफिस कार्य प्रणालीच्या संदर्भामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना माहिती अद्यावत प्राप्त करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्यामुळे त्या संदर्भाने शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहेत. शासन निर्णयाचे स्पष्टीकरण मित्रांनो, आपण पुढील प्रमाणे पाहू या.
E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti
E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti(toc)
ई- ऑफिस कार्यप्रणालीच्या संदर्भात मराठी माहिती
मित्रांनो ,आज ' ई- ऑफिस कार्यप्रणालीच्या संदर्भात मराठी माहिती '| E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti ''सामान्य प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई -32 ,यांनी दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या महत्त्वाच्या शासन निर्णयांचे स्पष्टीकरण करत आहोत. आजच्या आधुनिक युगात सर्वत्र कार्यालयामध्ये संगणकाचा वापर करण्यात येत आहे. कार्यालयाचे कामकाज व शासन आदेश ऑनलाईन पद्धतीने विविध संगणकीय ॲपच्या मार्फत पूर्ण करण्यात येत आहेत त्यामुळे या संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना अद्यावत माहिती प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांनी संबंधित शासन निर्णय योग्य कार्यवाहीस्तव निर्गमित केला आहे. "ई- ऑफिस कार्यप्रणालीच्या वापरासंदर्भात"शासन परिपत्रक निर्गमित केले आहेत." E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti"
शासन परिपत्रकांचे संदर्भ
सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात खालील प्रमाणे विविध संदर्भ वापरून त्या संदर्भाच्या आधारे शासन निर्णय निर्गमित केला आहे.खालील दर्शविल्याप्रमाणे तीन संदर्भासहित शासन निर्णय
महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यालयामध्ये ई-ऑफिस कार्यप्रणाली च्या संदर्भामध्ये |" E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti "शासन निर्णय निर्गमित करताना शासनाने तीन संदर्भ विचारात घेऊन शासन निर्णय निर्गमित केला आहे. या संदर्भातील पहिला संदर्भ हा शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-2023/प्र.क्र.02/(र. व का.) दिनांक 2 फेब्रुवारी, 2023 विचारात घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा संदर्भ शासन परिपत्रक क्रमांक: मातंस 2022/प्र.क्र.62/से-1/39, दिनांक 22फेब्रुवारी, 2022 हा संदर्भ क्रमांक दोन विचारात घेऊन शासन निर्णय निर्गमित करताना तिसरा संदर्भ आणखी विचारात घेऊन संदर्भ क्रमांक तीन नुसार शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण- 2023/प्र.क्र.2/18(र.व का.), दिनांक 27 मार्च, 2023 च्या संदर्भात नुसार ऑफिस कार्यप्रणाच्या वापरा संदर्भात अद्यावत शासन निर्णय निर्गमित केला आहे. E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti
शासन परिपत्रक स्पष्टीकरण
शासन निर्णय
उपरोक्त तीनसंदर्भाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मुंबई, 32 .यांनी हा शासन निर्णय निर्गमित करण्याचे मुख्य कार्य म्हणजे सर्व शासकीय ऑफिसमध्ये अद्यावत संगणकाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी हा शासन निर्णय आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रासह अनेक घटक राज्यात संपूर्ण कार्य ऑनलाइन द्वारे पूर्ण केले जात आहेत. म्हणून महाराष्ट्र राज्याने आपल्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांमध्ये दैनिक कामकाज ऑनलाईन करण्यासाठी आणि संगणकाचा जास्तीत जास्त वापर करून आपले कामकाज अद्यावत व गतिमान व्हावे ह्या दृष्टीने कामकाजात सुसूत्रता यावी.
ई-ऑफिस प्रणाली अतिशय प्रभावी वापर
आपल्या ऑफिस मधील किंवा कार्यालयामधील सर्व अभिलेखे आणि दस्तऐवज सुरक्षित असावी म्हणून त्याचप्रमाणे ऑफिस मधील सर्व निर्णय अतिशय गतिशील करण्याच्या दृष्टिकोनातून सुलभता यावी म्हणून सामान्य प्रशासन विभागाने याकरिता आपल्या अधिपत्याखालील मंत्रालयीन विभागामध्ये आणि त्यांच्या क्षत्रिय कार्यालयामधील सर्व शासकीय कामकाज ऑनलाइन पद्धतीने संगणकाचा वापर करून ई-ऑफिस प्रणाली अतिशय प्रभावी वापर करून सदर ई प्रणाली गतिमान करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती उपरोक्त संदर्भीय परिपत्रकाप्रमाणे सर्व विभागांना देण्यात आली आहे. उपरोक्त तीन संदर्भाच्या अनुषंगाने प्रभावीपणे दिलेल्या शासन आदेशानुसार सर्व मंत्रालयीन विभागांना सूचना या शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत.
आदेश वजा निर्देश विशिष्ट निकष
शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर या शासन निर्णयाचा आदेश दिनांक 01एप्रिल 2023 नुसार विशिष्ट निकषाच्या द्वारे कार्यालयात व कामकाजात योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी शासन निर्णयात निश्चित कार्यपद्धती चे सुस्पष्ट शब्दात आदेश व जा सूचना देण्यात आले आहे.शासन नियमानुसार ई-ऑफिस प्रणाली बाबत शासन स्तरावर अंमलबजावणी करण्याकरिता सात महिन्यापेक्षा अधिक काळ संपल्यानंतर मंत्रालयीन काही विभागांमध्ये अनेक प्रकारच्या भौतिक (physical) नाश्त्या किंवा फाइल्स हार्ड कॉपी मध्ये तयार करण्यात आल्या असून त्या फाईल किंवा नसत्या ई-ऑफिस प्रणालीवर विविध विभागामार्फत त्यांच्या स्तरावर अपलोड करण्याचे कार्य सुरू असल्याचे दिसून आले आहेत.
सामान्य प्रशासन वित्त आणि विधी व न्याय
सामान्यपणे महत्त्वाचे असणारे विभाग सामान्य प्रशासन वित्त आणि विधी व न्याय इत्यादी विभागाने त्यांच्याकडे तयार करण्यात आलेल्या नसत्या योग्य अभिप्रायर्थ संबंधित विभागाकडे प्राप्त करून देण्यात आल्या असून तयार झालेल्या नसत्या इ प्रणाली ऑफिस द्वारे स्विकारणे आवश्यक असून आपलं अपलोड करणे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालयीन अनेक विभागांना खाली दर्शविल्याप्रमाणे आदेश वजा निर्देश देण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्र राज्य शासकीय स्तरावरील सर्व विभागांमध्ये सर्व मंत्रालयीन काम शंभर टक्के ई-ऑफिस प्रणाली E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti मध्ये संपूर्ण नस्ती हिरव्या सीटवर तयार करून संपूर्ण फाईल डिजिटल सिग्नेचर किंवा ई सिग्नेचर च्या माध्यमातून यापुढे सादर करण्यात याव्यात. शासकीय स्तरावरील सर्व मंत्रालय विभागांमध्ये भौतिक नस्ती नियमानुसार तयार करून त्या सर्व नस्ती ई-ऑफिस प्रणालीवर अपलोड करण्याच्या कार्यपद्धतीचा कोणत्याही परिस्थितीत विलंब करण्यात येऊ नये. या संदर्भाने उपरोक्त पद्धतीनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आलू पालन अहवाल मुख्यमंत्री सचिवालयास सादर करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी या शासन निर्णयाद्वारे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार शासन निर्णयानुसार उपरोक्त पद्धतीने कार्यवाही करून कार्यवाही केल्याबाबतचा अहवाल व त्या अहवालाचे अनुपालन त्वरित सामान्य प्रशासन विभाग यांना त्वरित सादर सादर करावा.
ई - ऑफिस प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या टपालांवर योग्य कार्यवाही
मंत्रालयीन विभागाने तयार केलेला फिजिकली न नस्ती,ई ऑफिस प्रणालीवर प्राप्त झालेल्या दैनंदिन टपाला बाबत अनेक विभाग कार्यवाही करत नसल्याचे बाब शासनास निदर्शनास आली आहेत. यासंदर्भामध्ये अनेक जण योग्य तो पाठपुरावा करीत असून विविध विभागाकडून त्या आवश्यक असणारा प्रतिसाद मिळत नसल्या बाबतच्या तक्रारी विभागांना प्राप्त होत आहेत. निर्धारित ठरवून दिलेल्या कालावधीत ई - ऑफिस प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या टपालांवर योग्य कार्यवाही करून संबंधित अर्जदारास केलेल्या अर्जास योग्य उत्तर देणे आवश्यक आहे. यासंदर्भामध्ये विविध विभागातील सचिवांनी आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकारी वर्गांना या शासन निर्णयाच्या संबंधाने आवश्यक त्या सूचना सचिव स्तरामार्फत देण्यात याव्यात.
प्रतिबंध अधिनियम, 2005 या अधिनियम नुसार योग्य कार्यवाही
ई-ऑफिस प्रणाली बाबत करावयाच्या सूचना शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे प्रकरणांवार ठराविक मुदतीत कार्यवाही शासन निर्णयाप्रमाणे केली नसल्यास संबंधित शासकीय कार्य पार पडताना म्हणजेच शासकीय कर्तव्य पार पाडताना याबाबत विलंब झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि संबंधिताविरुद्ध प्रतिबंध अधिनियम, 2005 या अधिनियम नुसार योग्य ती कार्यवाही करावी असेही असे निर्देश देण्यात आले आहेत. E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi Mahiti
शासन निर्णयाचा सारांश
उपरोक्त पद्धतीने शासन निर्णयात दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर विविध अधिकारी आणि कर्मचारी यांनी जास्तीत जास्त पद्धतीने ई-ऑफिस प्रणालीचा वापर करावा. यासंदर्भामध्ये महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका ,2023 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यालयीन स्तरावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले दैनंदिन कामकाज ई -ऑफिस प्रणाली मध्ये सर्व नियम व कार्य बाबत स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंत्रालय स्तरावर या कार्यपुस्तिकेचा वापर करून त्यानुसार सर्व विभागाने शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे कार्यवाही करावी यासाठी दिनांक 18 डिसेंबर ,2023 रोजी सामान्य प्रशासन विभागाने ई-ऑफिस कार्यप्रणालीच्या वापरासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे.
शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध करून देण्यात आला आहेत. मधीच शासन निर्णयाचा संगणक संकेतांक 20231218170415807 असून उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल सहीने महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाच्या नावे शासन निर्णय निर्गमित केला आहेत. व या शासन निर्णयाच्या प्रत विविध 15 विभागांच्या सचिवांना योग्य कार्यवाहीस्तव सादर करण्यात आल्या आहेत. उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे शासन निर्णयाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत. E -office karyapranalichya Wapara Sandhabat Marathi संबंधित शासन निर्णयाबाबत आपणास तांत्रिक अडचण आल्यास अथवा शासन निर्णयात काही त्रुटी आढळून आल्यास ब्लॉगरला ब्लॉग पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना, अभिप्राय, तक्रारी, प्रतिक्रिया आणि त्रुटी आवश्यक कळवा. आपण केलेल्या प्रतिक्रिया आणि त्रुटी योग्य असल्यास संबंधित लेख त्वरित अद्यावत करण्यात येईल व आपणास कळविण्यात येईल.
संबंधित या शासन निर्णयाची लिंक या ठिकाणी खाली दर्शविलेल्या लिंक द्वारे शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.
शासन निर्णयाची लिंक
FAQ
1) ई ऑफिस कार्यप्रणालीच्या वापरा संबंधात कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे?
समान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य ,मुंबई -32.
2) हा संबंधित शासन निर्णय कोणत्या दिनांकास निर्गमित करण्यात आला?
18 डिसेंबर, 2023 रोजी निर्गमित करण्यात आला
3) या संबंधित शासन निर्णयासाठी किती संदर्भाचा आधार घेण्यात आला आहे?
तीन संदर्भाचा आधार घेण्यात आला आहे.
4) हा शासन निर्णय निर्गमित करण्याचा उद्देश काय आहे?
आधुनिक डिजिटल युगात संगणकीय प्रणाली मार्फत सर्व नस्ती अपलोड करणे व ऑनलाईन पद्धतीने काम करणे.
5) या शासन निर्णयाचे मुख्य निर्देश कोणी दिले आहेत?
माननीय महोदय मुख्यमंत्री यांनी ई -ऑफिस प्रणाली वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख वाचू शकता.