Type Here to Get Search Results !

DC1_अपडेट

 DC1_अपडेट



बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षक संघटनेनी आज रोजी पर्यंत केलेले पत्रव्यवहार खालील बटन वर क्लिक करून बघू शकता
_____________________________________

दि. 23/02/2026
   आज शिक्षण समिती अध्यक्ष सन्मा. श्रीम. राजेश्री शिरवडकर यांची भेट घेऊन DCPS संदर्भातील प्रलंबित प्रश्नांची सविस्तर माहिती देण्यात आली आणि तपशीलवार चर्चेसाठी वेळ देण्याची विनंती करण्यात आली. आपल्या संघटनेच्या भेटीपूर्वी माध्यमिक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बजेट संदर्भात त्यांची बैठक झालेली होती. तरीदेखील त्यांनी विषय गांभीर्याने ऐकून सकारात्मक प्रतिसाद देत पुढील चर्चेसाठी वेळ देण्यास होकार दिला.
यानंतर विरोधी पक्ष प्रमुख तथा माजी महापौर सन्मा. श्रीमती किशोरी पेडणेकर यांची भेट घेण्यात आली. त्यांनीही DCPS विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची हमी दिली.
त्यानंतर *कोकण विभाग शिक्षक आमदार तथा संघटनेचे सल्लागार सन्मा. श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर* यांनी दिलेल्या नियोजित वेळेनुसार त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) सन्मा. श्री अविनाश ढाकणे साहेब यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. DCPS संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर त्यांनी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सन्मा. श्रीमती सुजाता खरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच या विषयात वैयक्तिक लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
सदर बैठकीस संघर्ष संघटनेचे उपाध्यक्ष श्री स्वप्निल जगताप सर, श्री रवींद्र पाटील, श्री मिलिंद साठे तसेच संघटनेच्या महिला विभाग प्रमुख श्रीमती तनुजा चव्हाण मॅडम उपस्थित होते. ठरलेल्या वेळेत सर्व जण मनपा मुख्य कार्यालयात उपस्थित राहून विषयाचा पाठपुरावा करण्यात आला.
           *मात्र, विषयाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता प्रशासनाकडून अपेक्षित पातळीवर दिसून येत नाही.* पालिका स्तरावर अनेक घटकांमध्ये अंमलबजावणीत संभ्रम आहे.
      *सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यांची रक्कम NPS खात्यात वर्ग करण्याचा उल्लेख प्रशासनाच्या प्रस्तावात आहे. परंतु शासनाचे योगदान नेमके कोणत्या स्वरूपात, किती टक्केवारीने, कोणत्या कालमर्यादेत आणि कोणत्या आर्थिक पद्धतीने जमा केले जाईल, याबाबत अधिकृत स्पष्टता उपलब्ध नाही. अनेक महत्त्वाचे मुद्दे अद्याप अनुत्तरित आहेत* .
             संघटना या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. शिक्षकांच्या न्याय्य हितासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. पुढील घडामोडींबाबत माहिती वेळोवेळी कळविण्यात येईल.



बृहन्मुंबई मनपा माध्यमिक शिक्षक संघर्ष संघटना

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आज दिनांक 18.02.2026 रोजी संध्याकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका नवनियुक्त महापौर सन्मा. श्रीमती रितू तावडे मॅडम यांच्या दालनात कोकण विभाग शिक्षक आमदार सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर तसेच संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.
       DC1 योजना प्रशासनाच्या अनास्थेमुळे अनेक वर्षे प्रलंबित राहिल्याने शिक्षकांच्या अंशदायी पेन्शनवर होत असलेल्या प्रतिकूल आर्थिक परिणामाचा तसेच सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते तात्काळ संबंधित योजनेत वर्ग करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 
     महापौर महोदया यांनी लवकरच शिक्षण समिती अध्यक्ष व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महापौर दालनातच विशेष बैठक आयोजित करण्याचे सूचित केले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*प्रिय सहकारी बंधू-भगिनींनो* ,

    DCPS/NPS अंमलबजावणी, सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते, शासनाचे योगदान तसेच तथाकथित DC-1 योजनेच्या संदर्भात आज दिनांक 16.02.2025 रोजी सन्माननीय शिक्षणाधिकारी श्रीमती खरे मॅडम, उपशिक्षणाधिकारी खैर मॅडम व लिपिक श्री फुले यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वरील निवेदन विषय समजून घेण्यासाठी संघर्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
     चर्चेदरम्यान प्रशासनाने कडून dc 1 प्रभावित करणारे महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. 
       सद्य स्थितीत आपल्याला परिपत्रक प्राप्त झाल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करून संघटनेची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत संयम राखून अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे हीच सध्याची भूमिका आहे.
      सदर DC-1 योजना कार्यान्वित होणे महत्त्वाचे असल्याने, योजना लागू झाल्यानंतर तिच्या तरतुदी, संभाव्य त्रुटी व शिक्षकांवर होणारा परिणाम याचा संघटना स्तरावर अभ्यास करून आवश्यक पुढील नियोजन आखण्यात येईल. कोणताही निर्णय घाईघाईने न घेता, कागदपत्रांच्या आधारेच भूमिका निश्चित केली जाईल.
     याच अनुषंगाने *कोकण विभाग शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्यासोबत AMC बैठकीत* पुढील दोन दिवसात निश्चित आहे. त्यात रूपरेषा ठरवून विषय अधिक स्पष्ट करून घेण्याचे नियोजन आहे.
      *प्रशासनाच्या संकेतांनुसार परिपत्रक या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या वेतन इनपुटमध्ये कपातीची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.* त्यामुळे कोणतीही अधिकृत माहिती मिळाल्यास ती त्वरित आपणापर्यंत पोहोचवण्यात येईल.
संघटना या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा केला जात आहे. आपल्या सर्वांच्या न्याय्य हितासाठी संघटना तत्परतेने कार्यरत आहे. कृपया अफवांवर विश्वास न ठेवता केवळ संघटनेच्या अधिकृत संदेशांवरच विश्वास ठेवावा.

बृहन्मुंबई मनपा माध्यमिक शिक्षक संघर्ष संघटना

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
20 फेब्रुवारी 2026
*पाठपुराव्याबाबत माहिती* 
       या विषयासंदर्भात संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालय, उप आयुक्त (शिक्षण), आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगर) यांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन विषयाचे गांभीर्य  व स्मरण निवेदन देण्यात आले.
           तसेच, या विषयावर मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेबाबत वकिलांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 27 मार्च 2025 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेला याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी स्पष्ट  कालमर्यादा दिली होती. परंतू पालिकेकडून अद्याप उत्तर दाखल करण्यात आलेले नाही. ही बाब न्यायालयाच्या आदेशांचे पालन न झाल्याची (non-compliance of Court directions) असल्याचे न्यायालयाच्या रेकॉर्डला आणण्यासाठी वकिलामार्फत *Affidavit of Non-Compliance दाखल करण्यासाठी  व सदर कायदेशीर भाषेत न्यायालयाने दिलेली कालमर्यादा व विलंबाची नोंद  करण्यात येणार . यासोबतच न्यायालयाकडे आवश्यक व योग्य निर्देश ( *appropriate directions* ) देण्याची मागणी करण्यात येईल.

       या संदर्भातील पुढील घडामोडी शिक्षकांना वेळोवेळी कळविण्यात येतील.



बृहन्मुंबई मनपा माध्यमिक शिक्षक संघर्ष संघटना 
व 
याचिकाकर्ता समूह

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.