लहुजी राघोजी साळवे मराठी माहिती | Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti
प्रस्तावना
मित्रांनो, आज आपण ' आद्य क्रांतिवीर वस्ताद लहुजी राघोजी साळवे ' (Aady Kranti Veer Vastad Lahuji Raghavji Salve ) यांची पुण्यतिथी दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोज शनिवारी असल्यामुळे त्या संबंधाने या लेखात सविस्तर माहिती पाहूया. लहुजी साळवे यांना अनेक नावांनी संबोधण्यात आले आहेत. आद्य क्रांतिवीर त्याचबरोबर क्रांती गुरु तसेच वस्ताद साळवे आणि लहुजी बुवा मांग या नावाने संबोधण्यात आले आहेत. वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिवीर आणि क्रांतीचे जनक म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे त्यांना लहुजी राघोजी साळवे यांनी वासुदेव बळवंत फडके यांना गुरु मानले त्याचबरोबर त्यांचे राजकीय गुरू म्हणून लोकमान्य टिळक हे होते. लहुजी साळवे यांच्या जीवनावर जर कोणाचा मोठा प्रभाव पडला असेल तर तो प्रभाव म्हणजे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या विचाराचा प्रभाव पडलेला होता. म्हणून आज आपण या लेखामध्ये आद्य क्रांतिवीर लहुजी राघोजी साळवे यांच्याबाबत सविस्तर माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करणार आहोत. " Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti "
![]() |
Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti |
Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti(toc)
जीवन परिचय
' Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti ' ' लहुजी राघोजी साळवे ' यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी नारायणपूर येथे झाला . महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात सासवड जवळ असणाऱ्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचा जन्म झाला होता. नारायणपूर हे त्यांचे जन्मगाव. या जन्म गावात नारायण पेठ मध्ये मांग वाड्यात धर्माने हिंदू असणाऱ्या मांग कुटुंबात त्यांचा जन्म झाल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या वडिलांचे नांव राघोजी साळवे असे होते तर त्यांच्या आईचे नांव विठाबाई साळवे असे होते. लहुजी राघोजी साळवे यांचे संपूर्ण शूरवीर होते. त्यांचे सर्व पूर्वज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम करणारे शूरवीर पुरुष होऊन गेले. पुरंदर किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी ही लहानपणापासून तर मृत्यूपर्यंत लहुजी साळवे यांच्या आजोबाकडे सोपवली होती. साळवे कुटुंबांनी अनेक लढाया मध्ये सहभाग घेऊन लढाया जिंकल्याही सुद्धा. म्हणून मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या कुटुंबाला फार मोठी पदवी दिली होती. त्यांच्या पूर्वजांना देण्यात आलेली पदवी " राऊत "ही पदवी दिली होती." Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti "
सैनिकी प्रशिक्षण
'Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti ' 'आद्य क्रांतिवीर लहुजी राघोजी साळवे 'हे शूरवीर तर होतेच पण त्यामध्ये तरबेज होण्यासाठी त्यांनी स्वतःचे प्रशिक्षण स्वतःच सुरू केले. दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी करणे, घोडेश्वर होऊन घोड्यावरून युद्ध करणे. अचूक नेम धरून बंदूक चालवणे . त्याचबरोबर योग्य निशाणा धरून अचूक मारा मारणे यासारखे प्रशिक्षण प्राप्त केले. प्रत्येक व्यक्तीला सैनिकी प्रशिक्षण आवश्यक असते असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी तरुणांसाठी सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या तयारीने 1822 मध्ये वर्गाची तालीम सुरू केली. हा वर्ग त्यांनी पुणे येथील रास्ता पेठ मध्ये सुरू केला. इथे तरुणांना युद्ध कला कौशल्याचे डावपेच आणि कला गुण त्याचबरोबर सैनिकासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे प्रशिक्षण हे सर्व धर्मीय लोकांसाठी समाजातील युवक प्रशिक्षण केंद्रात दाखल होत होते. या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात सर्व जाती पंथ आणि धर्मांचे लोक प्रशिक्षण घेऊ लागले. या प्रशिक्षण केंद्राचे नाविन्य म्हणजे या केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे सुद्धा या तालमीच्या आखाड्यात उतरून प्रशिक्षण पूर्ण करू पूर्ण केले. नंतर या प्रशिक्षण केंद्रात प्रामुख्याने उपस्थिती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर आणि चाफेकर बंधू हे सुद्धा या तालीम केंद्रात नियमित भेट देऊन सैनिकी प्रशिक्षण घेऊ घेतले." Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti "
लहुजी राघोजी साळवे यां मोठा आघात व परिणाम
' Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti ' ब्रिटिश सत्तेने म्हणजे इंग्रजांनी भारतामध्ये त्यांच्या वसाहतीची दहशत सुरू केली. अनेक क्रांतिवीरांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने बक्षीसही सुद्धा ठेवले. अनेक क्रांतिवीरांना पकडून तुरुंगात पाठवण्यात आले आणि काळ्यापाण्याच्या शिक्षाही सुद्धा दिल्या. यातच मुख्य म्हणजे एके दिवशी वासुदेव बळवंत फडके यांना " "देवरगावडगा"या गावातील बुद्धविहार मध्ये झोपलेले असताना अचानक रात्री इंग्रजांनी त्यांना पकडले तो दिवस होता 20 जुलै 1879 चा. वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यात आणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. या खटल्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांना साथ नोव्हेंबर 879 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या गोष्टीचा फार मोठा परिणाम लहुजी राघोजी साळवे यांच्यावर आघात आणि परिणाम झाला. असंख्य क्रांतिवीरांची धरपकड सुरू झाली त्यामुळे भारतीय तरुण इंग्रजांच्या भीतीने अनेक गावागावात लपून भूमिगत झाले." Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti "
लहुजी राघोजी साळवे यांचे कार्य
' Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti 'महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लहुजी राघोजी साळवे हे आद्य क्रांतिवीर असल्यामुळे त्यांनी क्रांतीचे कार्य सुरू केले. क्रांतीचे कार्य सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे1 818 मध्ये पुण्यातील पेशवाईचा शेवट झाला. पेशवाईच्या शेवटच्या लढाईमध्ये लहुजी साळवे यांच्या वडिलांना युद्धभूमीवर वीरमरण आले. व त्यांच्या वडिलांचा शेवट झाला. या गोष्टीमुळे'लहुजी साळवे' यांनी फार मोठ्या जोराने क्रांतीचे पर्व सुरू केले आणि एक मोठी गर्जना ठोकली. ती गर्जना अशी होती की,,"शनिवार वाड्यावर पुन्हा भगवा ध्वज फडकवीन,."असे म्हणणारे शूरवीर होते. 'लहुजी साळवे वस्ताद 'म्हणून पुढे आले क्रांतीचा झेंडा आपल्या हातात घेतला. त्यांनी जीवनभर पेशवाईच्या शेवट नंतर अठराशे अठरा साल पासून 1881 पर्यंत आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेऊन सशस्त्र सेना घडवणारे एक महान धाडसी नेतृत्व असणारे वस्ताद म्हणून पुण्यामध्ये त्यांनी मोठे कार्य केले. त्या कार्यामुळे आद्य क्रांतिगुरू वीर लखोजी साळवे अर्थात लहुजी वस्ताद इंग्रजा विरुद्ध लढले. ज्या ठिकाणापासून त्यांनी शपथ घेतली होती की,"शनिवार वाड्यावर पुन्हा भगवा उभारेन!"ते ठिकाण साधे सोपे नव्हते म्हणूनच इंग्रजही सुद्धा शनिवार वाड्यावर चाल करून त्यांनी संपूर्णपणे 1818 मध्ये पेशवाई विरुद्ध लढाई जिंकली तिथेच पेशव्यांचा शेवट झाला आणि लहुजी वस्ताद चे कार्य सुरू झाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लहुजी साळवे यांचे योगदान फार मोठे होते. पुणे येथील वास्तव्यात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी आपल्या प्रशिक्षण केंद्रात शिक्षक म्हणून काम करून तरुणांना लढाईचे शिक्षण दिले. 19 ३१ मध्ये लहुजी वस्ताद यांनी इंग्रजा विरुद्ध क्रांतिवीर उमाजी नाईक यांना लढाईमध्ये फार मोठे सहकार्य केले. त्याचप्रमाणे त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या 1857 च्या उठावात लहुजी वस्ताद म्हणून सक्रिय राहून कार्यकर्ते व सैनिक नियोजन आणि उठाव याबाबत त्यांचे कार्य अठराशे सत्तावनच्या उठावात उल्लेखनीय आहे एवढेच नाही तर पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना संरक्षण दिले. सावित्रीबाई फुले यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे दिल्यामुळे तेही कार्य उल्लेखनीय आहेत.ब्रिटिश राज्याची वसाहत आणि साम्राज्य संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी इंग्रजा विरुद्ध 1818 पासून ते1 881 एवढ्या प्रदीर्घकाळ कालखंड पाहता सशस्त्र कार्यकर्ते तयार करून इंग्रजा विरुद्ध लढा दिला. त्यांना आद्यक्रांतीगुरु या उपाधीने त्यांचा गौरव करण्यात आला. वासुदेव बळवंत फडके यांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यात म्हणजे तेरा महिन्यातच दिनांक 17 फेब्रुवारी 1881 रोजी त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे वारस कोणीच नाही कारण त्यांनी विवाह केला नव्हता आणि त्यांना पuत्नीही नव्हती.त्यांचे घर म्हणजे एक साधी झोपडी होती. त्यांनी कधीच आपल्या घरदारांचा विचार केला नाही. त्यांचे राहते घर हे पुण्यातील संगमवाडी येथे आहे. त्याच घरात त्यांचे शेवटी निधन झाले. त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांची समाधी संगम पुलावर आद्य क्रांतिगुरू लहुजी समाधी आहेत. भविष्यात सरकार तेथे स्वातंत्र्यलढ्याचे पंचतीर्थ स्मारक उभारणार अशी शासनाने घोषणा केली आहे." Lahuji Raghavji Salve Marathi Mahiti "
सारांश
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान आद्य क्रांतिगुरू म्हणून लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मोलाचे सशस्त्र क्रांतीचे पर्व उभारले. त्यांच्या आजोबा-पंजोबापासून त्यांचे घराणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे शूरवीर म्हणून कार्य करत होते. त्यामुळे लहुजी राघोजी साळवे मुळातच शूरवीर घराण्यात जन्म होऊन महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय मोलाचे महान कार्य भारत मातेला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केले. मरेपर्यंत त्यांचे कार्य सुरू होते. त्यांच्या कार्यास सलाम करून आजच्या लेखात पूर्णविराम देत आहे. कोणी लेक वाचल्यानंतर आपणास काही त्रुटी आढळून आल्यास लेखकाशी संपर्क साधावा व त्रुटीची सूचना करावी योग्य ते बदल पुराव्यानिशी खरे असल्यास लेखात बदल करण्यात येईल. 17 फेब्रुवारी 2024 ला त्यांची पुण्यतिथी असल्यामुळे हा लेख लिहिण्याचे प्रयोजन पूर्ण केले. हा लेख पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे लेखक सदैव ऋणी आहेत आणि राहील धन्यवाद! जय महाराष्ट्र !जय हिंद !वंदे मातरम!
1) लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म केव्हा झाला होता?
14 नोव्हेंबर 1794
2) "आद्य क्रांतिगुरू" ही उपाधी कोणास प्राप्त झाली?
लहुजी राघोजी साळवे.
3) लहुजी राघोजी साळवे यांच्या आईचे नाव सांगा ?
विठाबाई.
4) "शनिवार वाड्यावर पुन्हा भगवा उभारेल!" असे उद्गार कोणी काढले होते?
लहुजी साळवे वस्ताद.
5) लहुजी राघोजी साळवे यांचे निधन केव्हा झाले ?
17 फेब्रुवारी 1881.
अधिक माहितीसाठी आपण खालील लेख आवश्यक वाचा.
वासुदेव बळवंत फडके मराठी माहिती