शाळा स्थलांतर नवीन धोरण मराठी माहिती | Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti
प्रस्तावना
मित्रांनो, आज आपण 'शाळा स्थलांतर नवीन धोरण मराठी माहिती ' ' Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti ' या विषयावर लेख लिहिण्यासाठी हाती घेतला असून आजच्या आधुनिक युगात अनेक शाळेचे अनेक कारणामुळे स्थलांतर करणे भाग पडते त्यामुळे या विषयावर संपूर्ण माहिती संस्थाचालकांना , मुख्याध्यापक आणि पालक तसेच विद्यार्थ्यांना स्पष्ट माहिती प्राप्त करून देण्यासाठी या लेखातून संपूर्ण माहिती सविस्तर स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे सदर माहितीचा उपयोग जनहिताच्या कल्याणासाठी आहे. म्हणून या विषयावर आपण आज लेख लिहीत आहे.
शाळा स्थलांतर सुधारणा बाबत नवीन धोरण
"शाळा स्थलांतर नवीन धोरण मराठी माहिती " " Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti" आजच्या आधुनिक डिजिटल युगात अनेक शाळांचे स्थलांतर काही विशिष्ट कारणाने करण्या बाबत शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. शाळा स्थलांतर सुधारणा बाबत नवीन शासन निर्णय आहेत. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 28 जुलै 2021 रोजी राज्यातील शाळांच्या स्थलांतर धोरणात सुधारणा करण्याबाबत निर्गमित केला असून या नवीन नियमानुसार शाळेचे आता स्थलांतर करण्यात येते. म्हणून आपणास या शासन निर्णयाची पार्श्वभूमी व संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक असल्यामुळे संबंधित शासन निर्णयावर आपण हा लेख खालील प्रमाणे लिहिण्यासाठी घेतला आहे." Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti "
![]() |
Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti |
Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti(toc)
"Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti"आता शाळा स्थलांतर या नवीन शासन निर्णयानुसार शासनाचे रूल्स अँड रेगुलेशन पाळून करण्यात येते. यासंबंधी अनेक संस्थांना शाळा स्थलांतर करण्यासाठी निर्गमित झालेल्या दिनांकापासून पुढे या शासन निर्णयानुसार स्थलांतर प्रस्ताव तयार करून सादर करणे आवश्यक आहे. करिता संबंधित संस्थेस शाळा स्थलांतर करण्याबाबत योग्य प्रकारची माहिती शासन निर्णयाचा स्पष्ट करणे आवश्यक असल्यामुळे या शासन निर्णयावर हा लेख लिहिण्यात येत आहे.
मित्रांनो! महाराष्ट्र शासनाने शाळा स्थलांतर करण्याबाबतच्या राज्यातील शाळांच्या स्थलांतर धोरणात सुधारणा करण्याबाबत दिनांक 28 जुलै 2021 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करू या.संबंधित शासन निर्णयासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आपल्याच विभागातील जुने चार संदर्भ विचारात घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत चा विचार करून संबंधित शासन निर्णय संदर्भासह दिला आहे."Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti"
शासन निर्णयाची प्रस्तावना
"Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti"महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शाळेचे जाळे फार दूरवर पसरलेले आहेत. मुलांना दर्जेदार शिक्षण देणे हे शासनाचे ध्येय असल्यामुळे शालेय शिक्षण विभागामार्फत अनेक निर्णय नियमित दररोज घेतले जातात. त्या निर्णयातील एक बाब म्हणून हा एक शासन निर्णय आहे. सर्व प्रकारच्या व्यवस्थापनामार्फत राज्यात जवळजवळ एक लाख दहा हजार शाळा शासकीय शासन निर्णयाच्या अस्तित्वात असलेल्या अनुदान स्वरूपात कार्यरत आहेत.विविध प्रकारचे व्यवस्थापन, अनेक स्वरूपाचे माध्यम तसेच वेगवेगळ्या अनुदानाच्या पद्धतीवर शासनाच्या ठराविक विविध नमुन्यात योग्य कार्यपद्धती नुसार शाळा सुरू आहे. संबंधित शाळा चालवण्यासाठी शाळा संहिता सुद्धा अस्तित्वात आहे आणि त्यानुसार शाळा चालवली जाते. परंतु अनेक कारणामुळे जर शाळा शासन धोरणाच्या निर्णयानुसार चालत नसेल तर संबंधित शाळेचे स्थलांतर मग ती कोणत्याही माध्यमाची शाळा असो किंवा कोणत्याही व्यवस्थापनाची शाळा असो किंवा कोणत्याही अनुदान तत्त्वावर चालवण्यात येणारी शाळा असेल तर त्या शाळेचे योग्य प्रकारे स्थलांतर होण्यासाठी सुधारणा करणे गरजेचे होते. अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येते. शाळेचा विकास होत नाही. शाळेची इमारत जीर्ण होते. भौतिक सुविधेप्रमाणे सुविधा उपलब्ध होत नसेल पर्यायाने सांगायचे म्हणजे शासनाच्या नियमानुसार शाळा चालत नसेल तर अनेक लोकप्रतिनिधी कडून किंवा नागरिकाकडून शाळेच्या संबंधी अनेक तक्रारी निर्माण होतात व अनेक शाळा अनुदाना अभावी चालवणे शक्य नसल्यामुळे , जागेची कमतरता असल्यामुळे आणि शहरीकरणाकडे पालकांची ओढ असल्यामुळे शाळेचे स्थलांतर बाबत राज्याच्या शाळांच्या स्थलांतर धोरणात सुधारणा करणे बाबतची बाब विचाराधीन होती म्हणून शासन निर्णय काय आहे? ते सविस्तर समजावून घेऊ. Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti
शाळा स्थलांतर शासन निर्णय"Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti"
प्रस्तावनेमध्ये दिलेल्या संपूर्ण मुद्द्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शाळा स्थलांतरांचे नियम अटी व निकष स्पष्ट केले.
अ) शाळा स्थलांतर नियम अटी व निकष"Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti"
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्थलांतर खाली दर्शविलेल्या मुद्द्यानुसार होते. इतर कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर शासनाच्या परवानगीशिवाय करता येत नाही. शाळा स्थलांतर पुढील गोष्टी उद्भवल्यास होते.
१) शाळेची इमारत जीर्ण व धोकेदायक असेल तर
२) शाळेवर नैसर्गिक आपत्ती तसेच प्रकल्पग्रस्त बाधित झाल्यास व पूर्वतस्थितीत सुरू करणे शक्य नसल्यास
३) भौतिक सुविधेचा असलेल्या शाळेतून स्वतःच्या स्वयंपूर्ण मालकीच्या इमारतीत स्थलांतर
४) विद्यार्थी संख्येत वाढ होत असल्यामुळे आपल्या पडणाऱ्या भौतिक सुविधेमुळे शाळेचे स्थलांतर होऊ शकते.
५) जागेच्या मालकाकडून भाडेपट्टा करार संपुष्टात आल्यास स्थलांतर होऊ शकते.
६) भाड्याच्या इमारतीतून स्वतःच्या मालकीच्या जागे त संस्थेच्या मालकीच्या असणाऱ्या जागेत जाण्याची गरज भासल्यास स्थलांतर होऊ शकते.
आ) शाळा स्थलांतरासाठी आवश्यक पूरक बाबी:"Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti"
१) सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
२) सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतराबाबत प्रमाणपत्र.
३) बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम, 2009 च्या निकषानुसार
४) अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळांच्या बाबतीत शिक्षकाचे समायोजन व रिक्त पदे भरण्याच्या बाबीवर आधारित स्थलांतर
५) स्थानिक स्वराज्य संस्थेचे न हरकत प्रमाणपत्र
६) नवीन जागेत स्थलांतर जेथे करावयाची असेल तेथे RTE act नुसार सर्व पुरावे तसेच गुणवत्तेत वहाड असल्याबाबतचे पुरावे नव्या ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध असल्याबाबत शाळेचा नकाशा व छायाचित्रे व फोटो उपलब्ध करून देणे. Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti
इ) स्थलांतर बाबत महत्वपूर्ण बाबी:-"Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti"
शिक्षक व शिक्षक उत्तर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी व तात्पुरत्या सेवेतील स्थलांतराच्या ठिकाणी सामावून घेण्याच्या अटीवर तसेच ज्या ठिकाणी स्थलांतर होईल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाची खात्रीला एक सोय उपलब्ध करून देणे. स्थलांतरित जागेमध्ये कोणत्याही प्रकारची कोणत्याही घटकाच्या दृष्टिकोनातून गैरसोय होणार नाही व भौतिक सुविधेचा तसेच गुणवत्तात्मक दर्जा वाढेल याचा विचार करून त्या ठिकाणी स्थलांतर करताना ज्या जागेत स्थलांतर करावयाचे आहे ते ठिकाण आपल्या पूर्वीच्या शाळेपासून ठराविक किलोमीटरच्या अंतरावर असणे आवश्यक आहे. प्राथमिक शाळेचे स्थलांतरासाठी पाच किलोमीटर तर माध्यमिक शाळेसाठी दहा किलोमीटर आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये 20 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असू नये असाही निकष आहे तरच स्थलांतर करण्यास परवानगी दिली जाते. स्थलांतर व हस्तांतर या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अतिशय डोंगराळ भागात दुर्गम, आदिवासी विभाग किंवा नक्षलग्रस्त विभागात स्थलांतर करण्यासाठी उपरोक्त निकषांमध्ये सूट देण्याचा अधिकार शासनास आहे. अपवादात्मक परिस्थितीत उपरोक्त नियमात सूट देण्याचा अधिकार शासनास राहील. स्थलांतर झाल्यानंतर विद्यार्थी पटसंख्या व सरासरी हजरी यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. शाळेचे स्थलांतर होत असताना शाळा जर अनुदानित असेल आणि तिचे स्थलांतर केले असल्यास ज्या गावातून स्थलांतर केले किंवा ठिकाणाहून स्थलांतर केले त्या ठिकाणी अन्य अनुदानित शाळा उपलब्ध असणे गरजेचे आहेत. स्थलांतर करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग यांनी संपूर्ण तपासणी करून परिशिष्ट एक मध्ये दर्शविलेल्या सूचीनुसार तपासणी करून त्याबाबतचा संपूर्ण तपासणी प्रस्ताव ठराविक नमुन्यात परिशिष्ट मध्ये विभागीय उपसंचालक यांच्याकडे सादर करावा. त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालकाने स्वतःच्या स्पष्ट शब्दात स्वयं स्पष्ट अभिप्रासह प्रस्ताव शासनास सादर करणे बंधनकारक राहील आणि त्यानंतर स्थलांतर बाबत निर्णय शासन स्तरावरून घेण्यात येईल. Shala Sthalantar Navin Dhorn Marathi Mahiti
ई) सारांश
उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे अ ते इ यामध्ये दर्शविलेल्या बाबीनुसार संपूर्ण शाळा स्थलांतर करण्याचा अंतिम अधिकार शासनास आहे. या लेखात आपण फक्त शाळा स्थलांतर बाबत माहिती पाहिली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फक्त विशिष्ट परिस्थितीत स्थलांतर कसे केले जाते याबाबत शासन निर्णयात बघितले. याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो म्हणजे शाळा हस्तांतरण. येथे या मुद्द्याचा आपण विचार करणार नाही कारण शाळा हस्तांतरण बाबत वेगळा शासन निर्णय आहेत म्हणूनच स्थलांतर आणि हस्तांतर बाबी समजावून सांगण्यासाठी संबंधित लेख पूर्ण केला आहे.
FAQ
1) शाळा स्थलांतर म्हणजे काय?
शासनाच्या आदेशाने एका जागेतून दुसऱ्या जागेत शाळेचे स्थलांतर करणे होय.
2) शाळा स्थलांतर धोरणात सुधारणा याबाबत शासनाच्या कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला?
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन ,मुंबई- 3)
3) राज्यातील शाळांच्या दोनात सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय कोणत्या दिनांक निर्गमित झाला?
28 जुलै 2021
4) स्थलांतर धोरणात सुधारणा करण्यासाठी किती संदर्भ विचारात घेतले आहेत?
चार
5)या शासन निर्णयात काय अपवाद आहे?
नक्षलग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि आदिवासी विभाग या विभागातील शाळा अपवादात्मक परिस्थितीत शासन निर्णयानुसार सूट देण्यात आले आहेत.
अधिक सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी शासन निर्णय PDf डाउनलोड करा.
शासन निर्णय
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.
शाळा हस्तांतरण बाबत शासन निर्णय.