Type Here to Get Search Results !

तणावाचे व्यवस्थापन मराठी माहिती | Stress Management information in marathi

 तणावाचे व्यवस्थापन  मराठी माहिती | Stress Management  information in marathi 

आधुनिक युगात प्रत्येक व्यक्तीला जीवन जगतानातान तणाव यांना  तोंड द्यावे लागते. मानवासमोर तणाव ही फार मोठी यक्ष समस्या आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे.

व्यक्तीला तणाव येण्याचे अनेक कारणे असू शकतात. कोणत्याही परिस्थितीत तणाव हा कविता येत नाही.फक्त कमी अधिक प्रमाणात तणाव येत असतोच.

तणावाचे व्यवस्थापन  मराठी माहिती
तणावाचे व्यवस्थापन  मराठी माहिती

ताण तनाव (toc)

तणाव येण्याची अनेक कारणे असली तरी मानसिक समस्या हे प्रमुख कारण आहे त्यामुळे व्यक्ती चिडचिड करतोघाबरून जातोएखाद्या आजाराने सुद्धा तणाव येऊ शकतोतणावामुळे तर हृदयविकाराचा झटका येणे यासारख्या गोष्टी घडू शकतातविद्यार्थी सुद्धा अनेक वेळेस मनावर परीक्षेचा तणाव घेऊन अभ्यासाचा तणाव घेऊन आत्महत्या करण्याची उदाहरणे सुद्धा दिसून आले आहेत आणि याबाबत अनेक वृत्तपत्र अनेक लेख  अनेकांच्या भाषणातून तणाव या विषयावर मत प्रतिपादन केले जातेतणावामुळे माणसांमध्ये नकारात्मक दृष्टी तयार होते . इतना मुक्तीची प्रक्रिया सोप्या  सकारात्मक पद्धतीने नीट समजावून घेणे आवश्यक आहेत.

ताण तणावाचा अर्थ

 

 प्रत्यक्षात ताण तणाव हे दोन शब्द आहेत दोन्हीही शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे तो अर्थ आपणास समजून घ्यायचा आहे.

आयुष्यामध्ये ताण आवश्यक असून ताणा मुळे चांगल्या गोष्टी होतात. गितारांच्या तारांमध्ये ताण असेल तर ती चांगली असते. ताणातून चांगल्या गोष्टी घडतात. जीवन जगताना ताण सकारात्मक पाहिजे. मात्र तणावातून नकारात्मक गोष्टी घडतात. म्हणूनच आपल्याला ताण आणि तणाव याचा अर्थ समजणे आवश्यक आहे.

"ताण " हा परिणाम ज्या एका किंवा अनेक घटकामुळे निर्माण होतो त्यास "तानके "असे म्हणतात.

लाझारस,फोकन टेलर या प्रसिद्ध विचारवंताच्या मते त्यांनी ताणाजी केलेली व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.

व्याख्या- ज्यांच्यामुळे शारीरिक मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा घडून येण्याचा धोका संभवतो अशा घटने द्वारे उद्भवणारी प्रक्रिया म्हणजे ताण होय आणि त्या प्रक्रियेचा होणारा परिणाम म्हणजे तणाव होय.

     याचा असा अर्थ सिद्ध होतो की,प्रथम ताण निर्माण होऊन त्याचा परिणाम किंवा ताणाचे रूपांतर तणावात होते.

 

ताणाचे स्वरूप:-


ताणही एक अशी प्रक्रिया आहे की, उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या प्रक्रियातुन तणाव निर्माण होतो. तीन महत्त्वाच्या घटकामुळे ताण तणाव निर्माण होणारी परिस्थिती निर्माण होते त्यातूनच विचित्र कार्य होते. मग कोणते हानिकारक कार्य होते हे नेमके सांगणे कठीण आहे


ताणाचे तीन घटक 

) संतुलित स्थिती 

) असंतुलित स्थिती 

) तणावाचे परिणाम.

व्यक्तीच्या संतुलित स्थितीवर असंतुलित स्तितीचा परिणाम निर्माण होऊन त्यातूनच ताण निर्माण होतो.


उदाहरण:- 


शाळेतील मुख्याध्यापकांची संतुलित स्थिती ताणविरहित असताना शिक्षकाकडून जर एखादे गैरवर्तन घडल्यास इतर कारणामुळे तणावजन्य परिस्थिती निर्माण होऊन तान निर्माण होतो. त्यामुळेच व्यक्तीच्या असंतुलित स्थितीत तानाचे परिणाम दिसून येतात त्यातूनच वेगवेगळ्या घटना घडतात. उदाहरणार्थ: शारीरिक आजार होणे, चिडचिडेपणा तसेच रक्तदाब वाढणे आणि मधुमेह यासारखे रोगही होऊ शकतात.

प्रसिद्ध विचारवंत हॅरीस पोल यांच्या मते जवळजवळ जगातील 50 टक्के व्यक्ती एका आठवड्यातून एक किंवा दोन वेळा प्रांत परिस्थितीत जगत असतात

 

 

ताणांचे पैलू :-


1) तानके (Stressors):-


शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत शाळेच्या वार्षिक तपासणीच्या वेळी निर्माण होणारा ताण शाळेतील प्रत्येक घटकावर म्हणजेच मुख्याध्यापकापासून तर संस्था चालकापर्यंत निर्माण होतो. तणावग्रस्त परिस्थितीत शाळेची तपासणी होते.


2) ताण (Stress-Struin):-


या ताणांचे सुचक मानसिक, शारीरिक, वर्तनात्मक असून त्याचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. उदाहरणार्थ:-शाळेत विद्यार्थ्यांची प्रगती नसल्यामुळे त्याच्या मनावर होणारा परिणाम.

 

ताणाचे प्रकार ( kind of stress):-

1) सकारात्मक ताण:-

व्यक्तीच्या जीवनात चांगल्या घटना घडल्यानंतर त्याच्या मनावर होणारा ताण म्हणजे सकारात्मक ताण होय.


2) नकारात्मक ताण:-

व्यक्तीच्या जीवनात दुःखद घटना घडल्यानंतर किंवा वाईट घटना घडल्यानंतर त्याच्या मनावर निर्माण होणारा ताण म्हणजे नकारात्मक ताण होय.

 

ताणाची कारणे ( Effect of Stress):-


ताणाजी मुख्य दोन कारणे आहेत.


1) बाह्य कारणे:-

या प्रकारचा तणाव दहा किंवा पाच टक्के असतो उदाहरणार्थ:-कामाचा बोजा तसेच नोकरीच्या ठिकाणी भांडणे आणि जिथे काम करत आहे तेथे गटबाजीचे राजकारण यामुळे ताण येतो.


2) अंतर्गत कारणे:-

या प्रकारच्या तणावामध्ये जवळजवळ 90 ते 95 टक्के वाटा अंतर्गत कारणाचा असतो. जीवन जगताना अचानक माणसाच्या मनावर वर्तनावर परिणाम होऊन मनाची अंतर्गत स्थिती बदलते त्यामुळे या प्रकारच्या ताणामुळे व्यक्ती विपरीत परिस्थितीत वागत असतो.


उदाहरणार्थ:- 

आत्मविश्वासाचा अभाव, लाजणे आणि न्यूनगंड निर्माण करणे आलेल्या अपयशामुळे होळेपणा व्यक्त करून नकारात

 

्मक भूमिका घेतली जाते. या तणावाचे प्रसंग आणि काही सर्वच प्रसंगाचे वर्णन करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊन विद्यार्थ्यांना लिहून आणण्यास सांगितले विद्यार्थ्याने गृहपाठ लिहून आणता वर्गात आला शिक्षकाने त्याबद्दल शिक्षा केल्यास त्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन मुले शाळाबाह्य होऊ शकतात.

ताण तणावाचे परिणाम:-
 

सर्व क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यापासून तर कर्मचाऱ्यापर्यंत तसेच अधिकारी वर्ग आणि राजकारणी राजकर्ते या सर्व क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तीवर ताण आल्याशिवाय राहत नाही. ताण आल्यानंतर त्याचा परिणाम फार वाईट होतो. हेही जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून ताणतणावाचे परिणाम माहीत असणे आवश्यक आहे ते परिणाम खाली दर्शविल्याप्रमाणे आहेत

1) ताण आल्यामुळे व्यक्ती एकलकोंडा बनतो.

2) स्वतः स्वतःशी बोलत असतो.

3) अस्वस्थ होतो.

5) चिडपणा निर्माण होतो

6 शारीरिक आणि मानसिक प्रकृती बिघडते.

7 तणावग्रस्त व्यक्तीकडून गैरकृत्य होऊ शकते.

8 तणावामुळे अनुकूल परिस्थितीतून प्रतिकूल परिस्थितीत वर्तन करतो.

9 तणाव निर्माण झाल्यामुळे व्यक्ती चे वर्तन संपूर्णपणे बदलते त्या वर्तनाप्रमाणे विपरीत परिस्थितीत कार्य करत असतो आणि असे कार्यकर्त्यांना त्याच्या हातातून अनेक चुका होऊ शकतात.

10 तणाव निर्माण झाल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अपयश येते आणि आलेल्या अपेक्षामुळे तो कदाचित आत्महत्या पर्यंत जाऊन पोहोचू शकतो एवढा मोठा परिणाम होतो.

11 तणावामुळे व्यक्ती व्यसनाधीन होतो आणि त्याला अनेक व्यसन सुद्धा जोडू शकतात उदाहरणार्थ दारूचे व्यसन लागणे, सिगारेटचे बेसन लागणे ,तंबाखूचे व्यसन लागणे ,हे नियमित सेवन केल्यामुळे कर्करोगासारखा रोगही सुद्धा होऊ शकतो.

12 आपण वर्तमानपत्रातून अनेक बातम्या वाचतो शेतकऱ्यांची आत्महत्या विद्यार्थ्यांची आत्महत्या किंवा एखाद्या समाजातील व्यक्तीची हत्या याचाही परिणाम हा तणावामुळेच होतो.

13 आजच्या जगात तणावामुळे अनेक वाईट कृत्य अनैतिक कृती सुद्धा व्यक्तीच्या हातातून घडू शकतात .

14 तणावाचा परिणाम महाभयंकर असतो. त्यातून काय घडेल? कसे घडेल? हे सांगता येत नाही. मात्र घडते हे खरे यात तिळमात्र शंका नाही.

15 समाजातील तणावामुळे 50% लोक तणावग्रस्त झाल्यामुळे स्वतः आत्महत्या करतात.

म्हणूनच आत्महत्या होऊ नये विचित्र परिस्थितीत वाईट कृत्य घडू नये म्हणून ताणतणावाचे व्यवस्थापन याचा अभ्यास करणे समजावून घेणे हे अत्यंत आवश्यक असल्यामुळे या विषयावर सांगाल तेवढी माहिती कमी होते. सारांश स्पष्ट एका वाक्यात सांगता येईल की तणावाचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होऊन आयुष्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही म्हणूनच तणाव मुक्त राहून जीवन जगणे हे आवश्यक आहे म्हणूनच आपण व्यवस्थापन पाहणार आहोत.

 

 ताणतणावाचे लक्षणे:-

) शारीरिक लक्षणे:-झोप लागणे.


) मानसिक लक्षणे:-आत्मविश्वासाचा अभाव.


) गंभीर तणावाची लक्षणे:-नैराश्य आणि भीती वाटणे.


) अल्पकालीन गंभीर तणावांची लक्षणे:-उच्च रक्तदाब.


) गंभीर तणाव तीव्र लक्षणे:-हिंसक आणि आत्महत्येची वृत्ती

 

 ताणतणावाचे व्यवस्थापन:-

जीवनात येणारे ताण तणावाचे व्यवस्थापन हे व्यक्तीला स्वतःच करावी लागेल तरच तो व्यक्ती तणाव मुक्त होऊ शकतो म्हणून तणावाचे व्यवस्थापनाचे मार्ग पाहणे भाग आहे.


1) व्यवस्थापन तंत्र:-व्यक्तीने जेणेकरून अशा तंत्राचा वापर करावा की आपल्या भावना इच्छा आणि आकांक्षा यावर नियंत्रण ठेवावे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही प्रमाणात यामुळे तणाव कमी होऊ शकतो.


2) सभोवतालची परिस्थिती बदलणे.


3) आधुनिक जीवनशैलीमध्ये स्वतःला जाणून घेण्याची क्षमता ओळखून त्याप्रमाणे कार्य करणे.


4) मनावर आलेले दुःख वेशीला टांगणे.


5) सहनशीलता वाढवणे.


6) जीवन जगण्याच्या जीवन प्रणालीत बदल करणे.


7) योग आणि ध्यानधारणा करणे.


8) विपश्यना करणे.


9) विविध छंद जोपासणे.


10) प्रार्थना म्हणणे.


11) हास्ययोग करणे.


12) व्यायाम करणे.


13) खेळ खेळणे.


14) विरंगुळा टाळणे.

 

 सारांश:-

मानवाच्या जीवनात येणारे ताण तणाव त्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपण ज्या क्षेत्रात काम करत आहे त्या क्षेत्रामधून कोणत्याही प्रकारचा तान येऊ देता शांत वातावरणामध्ये विशिष्ट कौशल्याने काम करून तणावमुक्त राहणे. आपल्या शालेय जीवनात येणाऱ्या सर्व प्रसंगाला प्रतिकारक शक्ती निर्माण करून जिद्दीने संघर्ष करणे आणि तणाव मुक्त होऊन यशस्वी होण्यासाठी हा लेख ताण तणावाचे व्यवस्थापन दूर करून यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग शोधण्यासाठी लिहिण्यात आला आहे.


|अधिक माहितीसाठी Active Education अर्थात YT वरील live stream video पहा.

  Active Education Video


FAQ

1.  ताणावाची व्याख्या कोणी   

केली?

    लाझारस,फोकन व टोकण.

2. ताणाचे किती घटक आहे?

     3

3. ताणाचे किती प्रकार आहे?

     2

4. तानाचे किती कारणे आहे?

      2

5. जगातील किती टक्के लोक 

     तणावाखाली जगतात?

      50%


आमचे इतर लेख


नवीन शैक्षणिक धोरण


स्वातंत्र्यसैनिक गोविंद भाई श्रॉफ


अनुकंपा धोरण संपूर्ण माहिती 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation